दिल्ली विधानसभेची निवडणूक ८ फेब्रुवारी रोजी मतदान
एकूण जागा - 7058 सर्वसाधारण, 12 एससी जागा
एकूण मतदान केंद्र - 13750
ठिकाणी मतदान होईल - 2689
निवडणुकीसाठी कर्मचारी आवश्यक - 90 हजार
एकूण मतदार - 1,46,92136
पुरुष मतदार - 8055686
महिला मतदार - 6635635
तिसरा लिंग - 815
एनआरआय मतदार - 489
सेवा मतदार - 11556
दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी या ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. एकाच टप्पात निवडणूक होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. २२ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेची मुदत संपणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुकीत १३७५० पोलिंग बूथवर जवळपास १.४६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना १४ जानेवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक अर्ज २१ जानेवारीपर्यंत दाखल करता येणार आहे. तर, २२ जानेवारी रोजी निवडणूक नामांकन अर्जाची छाननी करण्यात येणार असून २४ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान ८ फेब्रुवारी रोजी होणार असून ११ फेब्रुवारी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली. पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने जबरदस्त यश मिळवत ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवला. भाजपला तीन जागांवर यश मिळाले तर काँग्रेसला खातंही उघडता आले नव्हते. राज्यात सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाचे सरकार वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले. नायब राज्यपालांशी निर्णय घेण्यावरून वाद झाले होते. तर, केंद्र सरकार कामात अडथळा आणत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेकदा केला होता. दिल्लीतील जनतेची विकासाखाली फसवणूक झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर, राज्यात शिक्षण, आरोग्य क्षेत्रात प्रचंड सुधारणा झाली असल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. यंदाच्या निवडणुकीत 'आप'ला भाजपचे आव्हान असणार आहे. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 22 फेब्रुवारी 2020 रोजी संपणार आहे. 14 जानेवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी अधिसूचना जारी करण्यात येईल. निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख 21 जानेवारी असणार आहे. तसेच या उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होणार आहे. जर एखाद्या उमेदवारास अर्ज मागे घ्यायचा असेल तर त्याची शेवटची तारिख 24 जानेवारी असेल. या सर्व प्रक्रियेनंतर दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तसेच मतदानानंतर 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. 2015 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला बहुमत मिळाले होते. आम आदमी पार्टीने 67 जागांवर विजय मिळवला होता. तीन जागा भाजपच्या खात्यात गेल्या होत्या. काँग्रेसला मात्र एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. 2015 मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टिने 70 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. निवडणुकांच्या निकालामध्ये आम आदमी पार्टिला एकूण 54.34 टक्के मतं मिळाली होती. भाजपने 69 जागा या निवडणुकीत लढवल्या असून त्यांना 32.19 टक्के मते मिळाली होती. तसेच काँग्रेसने 70 जागांवर आपले उमेदवार उभे केले असून 9.65 टक्के मते मिळाली होती.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
====================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.