Wednesday, 1 January 2020

2020 या वर्षात 5 खासदार तर 29 आमदारांच्या पदांसाठी होणार निवडणुका

2020 नव्या वर्षात 5 खासदार तर 29 आमदारांच्या पदांसाठी होणार निवडणुका

राज्यात नव्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम

5
5
8
महाराष्ट्र राज्याच्या राजकीय दृष्टीने 2019 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणून गाजले आहे. लोकसभा पाठोपाठ सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील सत्तासंघर्षामुळे राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदललेली असून या पार्श्वभूमीवर आगामी काळात म्हणजेच येत्या 2020 नव्या वर्षात होणाऱ्या निवडणुकांना विशेषतः महत्व प्राप्त झालेले आहे. राज्यातील सत्तासंघर्षामुळे भाजप व शिवसेनेतील ताटातूट आणि सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी इतर घटक पक्ष अशा महाविकास आघाडीचा झालेला उदय महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक मानला जात आहे. 2020 नव्या वर्षात 5 खासदार तर 29 आमदारांच्या पदांसाठी होणार निवडणुका होणार आहेत. तर राज्यात नव्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम असणार आहे. यामध्ये 5 महापालिका, 81 नगरपरिषद, नगरपंचायती व 8 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका आणि 2020 नव्या वर्षात राज्यभरातील 14376 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका देखील होणार आहेत. 

राज्यसभेच्या 5 जागा रिक्त होणार; या जागांवर होणार निवडणुका

राज्यसभेच्या 5 खासदारांचा कार्यकाल 2020 मध्ये संपुष्टात येणार असून त्यांच्या जागांवर नूतन वर्षात निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि राष्ट्रवादीचे खासदार मजीद मेमन यांचा कार्यकाल मुदत संपत आहे. तसेच भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे व भाजपचे खासदार अमर साबळे यांच्यासह आरपीआयचे नेते व मंत्री रामदास आठवले यांचा देखील कार्यकाल 2 एप्रिल 2020 मध्ये संपुष्टात येणार आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रातून 13 सदस्य राज्यसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. यामध्ये भाजप-5, राष्ट्रवादी-2, कॉंग्रेस-2, आरपीआय-1, अपक्ष-1, राष्ट्रपती नियुक्त मध्ये भाजप-1 व कॉंग्रेस-1 असे पक्षीय बलाबल आहे. राज्यातील 13 सदस्यांपैकी प्रत्येकी 5 जणांचे 2020 आणि 2022 तर उर्वरित 3 सदस्यांचा कार्यकाल 2024 मध्ये संपुष्टात येणार आहे. 

29 विधानपरिषदेच्या जागांवर 2020 या नूतन वर्षात निवडणुका होणार

2020 या नूतन वर्षात 29 विधानपरिषदेच्या जागांवर निवडणुका होणार आहेत यामध्ये राज्यपालांद्वारे नामनियुक्त असलेल्या 12 जागांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 2 राज्यपालांद्वारे नामनियुक्त जागा रिक्त असून येत्या 2020 या नूतन वर्षात 10 जागा रिक्त होत असल्याने या 12 जागांचा समावेश आहे. तर उर्वरित जागांचा कार्यकाल संपुष्टात येणार आहे अशा विधानसभा सदस्यांद्वारा निवडल्या जाणाऱ्या 8 जागा रिक्त होणार आहेत. तर अमरावती पदवीधर-1, औरंगाबाद पदवीधर-1, नागपूर पदवीधर-1, पुणे विभाग शिक्षक-1 यांचा कार्यकाल संपुष्टात येणार असल्याने रिक्त होणार असून विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानपरिषदेचे 7 सदस्य पद रिक्त झालेल्या आहेत. बाॅम्बे सायमल्टेनियस मेंबरशिप अॅक्ट १९५७ अन्वये दुसऱ्या सभागृहाचा सदस्य होताच पहिल्या सभागृहाचे सदस्यत्व आपोआप रद्द होते. त्यामुळे विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांचे परिषदेचे सदस्यत्व रद्द होते. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत 78 सदस्य आहेत. महाराष्ट्र विधिमंडळात 289 आमदार विधानसभेचे आहेत तर 78 सदस्य संख्या ही विधानपरिषदेची आहे. सध्या 11 नोव्हेंबर 2019 च्या विधानपरिषदेच्या संखेप्रमाणे पक्षीय बलाबल भाजप 22, शिवसेना 12, राष्ट्रवादी काँग्रेस 14, काँग्रेस 13, लोकभारती पक्ष 1, शेकाप 1, पीपल्स रिपबिलकन पार्टी 1, रासप 1, अपक्ष 6, रिक्त 7, असे आहे. 
मतदारसंघ तपशील
जागांची संख्या
विधानसभा सदस्यांद्वारा
8
राज्यपालांद्वारे नामनियुक्ती
10
अमरावती पदवीधर
1
औरंगाबाद पदवीधर
1
नागपूर पदवीधर
1
पुणे विभाग शिक्षक
1
रिक्त
7
एकूण
29

विधान परिषदेतील रिक्त झालेल्या 7 जागा खालीलप्रमाणे-

1. चंद्रकांत पाटील, भाजप (कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विजयी)
2. तानाजी सावंत, शिवसेना (परंड्या विधानसभा मतदारसंघातून विजयी)
3. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी (परळी विधानसभा मतदारसंघातून विजयी)
4. राहुल नार्वेकर, राष्ट्रवादी (कुलाब्या विधानसभा मतदारसंघातून विजयी)
5. अमरीश पटेल, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश (पक्षांतरामुळे परिषदेचा राजीनामा)
6. चंद्रकांत रघुवंशी, काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश (पक्षांतरामुळे राजीनामा)
7. रामराव वडकुते, राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश (पक्षांतरामुळे राजीनामा)

विधानपरिषदेतील 22 रिक्त होणाऱ्या जागा खालीलप्रमाणे-

1
2
3
4
5
6
7
8
9
भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या वरिष्ठ गृहाला विधान परिषद म्हणतात. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, आंध्रप्रदेशआणि तेलंगणा, ओडिशा या 8 घटक राज्यात द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान परिषदसुद्धा अस्तित्वात आहे. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत 78 सदस्य आहेत.

5 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका नव्या वर्षात 2020 मध्ये होणार 

नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर या 5 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका नव्या वर्षात 2020 मध्ये होणार आहेत. नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल ते मे 2020 या कालावधीत होणार आहेत तर वसई-विरार महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक जून -2020 होणार आहे. कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या 2 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका ऑक्टोबर- नोव्हेंबर - 2020 या कालावधीत होणार आहेत.

राज्यातील 81 नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 2020 नव्या वर्षात होणार

राज्यातील 81 नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 2020 नव्या वर्षात होणार असून यामध्ये कोकण विभागातील-8, पुणे विभागात-2, नाशिक विभागात-12, अमरावती विभागात-13, औरंगाबाद विभागात-16 तर नागपूर विभागात-30 नगरपरिषद व नगरपंचायतीचा समावेश आहे. यामध्ये फेब्रुवारी-2, एप्रिल-1, मे-7, जून-1, नोव्हेंबर-59, डिसें-9 नगरपरिषद/नगरपंचायतींचा समावेश आहे. एप्रिल-2020 मध्ये एका नगरपरिषद/नगरपंचायत, फेब्रुवारी-2020 मध्ये 2 नगरपरिषद/नगरपंचायत तर मे-2020 मध्ये 7 नगरपरिषद/नगरपंचायत आणि जून-2020 मध्ये एका नगरपरिषद/नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका 2020 नव्या वर्षात होणार आहे तसेच 2020 नव्या वर्षात सर्वाधिक 59 नगरपरिषद/नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत तर डिसेंबर-2020 मध्ये 9 नगरपरिषद/नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. नव्या वर्षातील फेब्रुवारी 2020 मध्ये Kanhan-Pimpari कन्हान पिंपरी नगरपरिषद, Gadchandur गडचंदूर नगरपरिषद या 2 नगरपरिषद/नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत तर एप्रिल 2020 मध्ये Bhadgaon भडगाव नगरपरिषदेसाठी मतदान होईल. मे 2020 मध्ये 7 नगरपरिषद/नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे- Ambernath अंबरनाथ नगरपरिषद, Kulgaon Badlapur कुळगाव बदलापूर नगरपरिषद, Rajgurunagar राजगुरूनगर नगरपरिषद, Kaij N.P. कैज नगरपरिषद, Bhokar भोकर नगरपरिषद, Mowad मवाड नगरपरिषद, Wadi वाडी नगरपरिषद यांचा समावेश आहे. तर जून 2020 मध्ये Varangaon वरणगाव नगरपरिषदेसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये 59 नगरपरिषद/नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे- Murbad N.P. मुरबाड नगरपरिषद, Shahapur N.P. शहापूर नगरपरिषद, Kasai-Dodamarg N.P. कसाई दोडामार्ग नगरपरिषद, VabhaveVaibhavwadi N.P. वाभावे वैभववाडी नगरपरिषद, Mandangad N.P. मंडणगड नगरपरिषद, Lanja N.P लांजा नगरपरिषद, Chakan चाकण नगरपरिषद, Chandwad चांदवड नगरपरिषद, Niphad N.P. निफाड नगरपरिषद, Peint N.P. पींट नगरपरिषद, Deola N.P. देवळा नगरपरिषद, Kalwan N.P. कळवण नगरपरिषद, Surgana N.P. सुरगाना नगरपरिषद, Sakri N.P.  साक्री नगरपरिषद, Akole N.P. अकोले नगरपरिषद, Karjat कर्जत नगरपरिषद, Parner पारनेर नगरपरिषद, Bhatkuli N.P. भातकुली नगरपरिषद, Tiosa N.P. तिवसा नगरपरिषद, Dharni N.P. धरणी नगरपरिषद, Nand. Khandeshwar N.P. नंद. खांदेश्वर नगरपरिषद, Sangrampur N.P. संग्रामपूर नगरपरिषद, Motala N.P. मोताळा नगरपरिषद, Mahagaon N.P. महागाव नगरपरिषद, Kalamb N.P. कळंब नगरपरिषद, Zari Jamani N.P. झरी जमानी नगरपरिषद, Babhulgaon N.P. बाभुळगाव नगरपरिषद, Ralegaon N.P. राळेगाव नगरपरिषद, Maregaon N.P. मारेगाव नगरपरिषद, Soygaon N.P. सोयगाव नगरपरिषद, Jalkot N.P. जळकोट नगरपरिषद, Chakur N.P. चाकूर नगरपरिषद, Devni N.P. देवणी नगरपरिषद, Shirur-Anantpal N.P. शिरूर अनंतपाल नगरपरिषद, Hingna N.P. हिंगणा नगरपरिषद, Kuhi N.P. कुही नगरपरिषद, Bhiwapur N.P. भिवापूर नगरपरिषद, Karanja N.P. कारंजा नगरपरिषद, Ashti N.P. आष्टी नगरपरिषद, Seloo N.P. सेलू नगरपरिषद, Samudrapur N.P. समुद्रपूर नगरपरिषद, Mohdi N.P. मोहदी नगरपरिषद, Lakhani N.P. लाखनी नगरपरिषद, Lakhandur N.P. लाखांदूर नगरपरिषद, Sadakarjuni N.P. सदाकर्जुनी नगरपरिषद, Arjuni N.P. अर्जुनी नगरपरिषद, Goregaon N.P. गोरेगाव नगरपरिषद, Deori N.P. देवरी नगरपरिषद, Chimoor चिमूर नगरपरिषद, Sawli N.P. सावळी नगरपरिषद, Pombhurna N.P. पोंभुर्णा नगरपरिषद, Bhamragad N.P. भामरागड नगरपरिषद, Sironcha N.P. सिरोंचा नगरपरिषद, Etapalli N.P. एटापल्ली नगरपरिषद, Chamorshi N.P. चामोर्शी नगरपरिषद, Korchi N.P. कोर्ची नगरपरिषद, Dhanora N.P. धानोरा नगरपरिषद, Kurkheda N.P. कुरखेडा नगरपरिषद, Aheri N.P. अहेरी नगरपरिषद यांचा समावेश आहे.  डिसेंबर 2020 मध्ये 9 नगरपरिषद/नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे- Badnapur N.P. बदनापूर नगरपरिषद, Ghansawangi N.P. घनसावंगी नगरपरिषद, Jafrabad N.P. जाफराबाद नगरपरिषद, Mantha N.P. मंथा नगरपरिषद,  Palam N.P. पालम नगरपरिषद, Shirur (Kasar) N.P. शिरूर (कासार) नगरपरिषद, Wadvani N.P. वडवणी नगरपरिषद, Patoda N.P. पाटोदा नगरपरिषद, Aashti N.P. आष्टी नगरपरिषद यांचा समावेश आहे.

नव्या वर्षात 8 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका; 5 जि.प. निवडणुका जानेवारीत

नागपूर जिल्हा परीषदेची 20 मार्च 2017 मध्ये व त्यानंतरच्या कालावधीत अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर उच्च न्यायालयात प्रलंबित रिट याचिकांमुळे निर्धारित वेळेत या जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित याचिका निकालात काढल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्याप्रमाणे नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 जानेवारीला मतदान होणार आहे. या व्यतिरिक नव्या वर्षात अन्य 3 जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. नागपूर विभागातील भंडारा व गोंदिया या 2 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका जुलै 2020 मध्ये होणार आहेत. आणि पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारी 2020 मध्ये प्रस्तावित आहेत. पालघर जिल्हा परिषदेची मुदत पुढील वर्षी 17 फेब्रुवारी 2020 मध्ये आणि त्या अंतर्गत येणार्‍या तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या पंचायत समित्यांची मुदत 15 फेब्रुवारीला संपणार असून त्यापूर्वी त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे बंधनकारक आहे. पालघर जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीकरीता प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५७, तर आठही पंचायत समित्यांची एकूण सदस्यसंख्या ११४ असणार आहे. याकरिता पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या सन २०११च्या जनगणनेवर आधारित जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या अधिसूचनेद्वारे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून सदस्य संख्या निश्चित केली आहे. पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका जानेवारी 2020 मध्ये होणार आहेत. 

2020 नव्या वर्षात राज्यभरातील 14376 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 

राज्यभरातील 14 हजार 376 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 2020 नव्या वर्षात होणार आहेत. यामध्ये विभागनिहाय कोकण विभाग- 824, पुणे विभाग- 2895, नाशिक विभाग- 2477, अमरावती विभाग- 2487, औरंगाबाद विभाग- 4134, नागपूर विभाग- 1559, एकूण- 14376 यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्हानिहाय राज्यातील 2020 नव्या वर्षात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पुढीलप्रमाणे ग्रामपंचायतीची संख्या दर्शवली आहे. यामध्ये नांदेड- 1011, यवतमाळ- 1002, सातारा- 893, जळगाव- 783, अहमदनगर- 779, पुणे- 758, सोलापूर- 660, चंद्रपूर- 655, नाशिक- 641, औरंगाबाद- 614, परभणी- 562, अमरावती- 554, बुलढाणा- 529, हिंगोली- 497, रत्नागिरी- 484, जालाना- 482, कोल्हापूर- 432, उस्मानाबाद- 431, लातूर- 408, गडचिरोली- 367, अकोला- 237, धुळे- 225, गोंदिया- 194, वाशिम- 165, ठाणे- 162, भंडारा- 155, सांगली- 152, नागपूर- 138, बीड- 129, रायगड- 104, सिंधुदुर्ग- 72, वर्धा- 50, नंदुरबार- 49, पालघर- 2 यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील 758 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहे. या निवडणुकीची पूर्वतयारी प्रशासनाने सुरू केली असून या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे काम येत्या 30 डिसेंबरपर्यंत प्रभाग रचना निश्‍चित करण्यात येत आहे. डिसेंबर 2020 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. जिल्ह्यात सुमारे 1400 ग्रामपंचायती आहे. पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. संबधित गावच्या तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळपाहणी करून प्रभाग रचना करण्याच्या सूचना राज्य निवडणुक आयोगाने यापूर्वीच दिलेल्या आहेत. तर तहसिलदार यांनी 10 जानेवारी 2020 पर्यंत प्रभाग रचनेच्या प्रारूपला मान्यता देण्यात यावी. या प्रभाग रचनेसंदर्भात नागरिकांच्या काही हरकती असतील तर त्या नोंदविण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. या हरकतींवर जिल्हाधिकारी सुनावणी घेणार आहे. तालुकानिहाय प्रभाग रचना करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे हवेली मधील 55 ग्रामपंचायती, आंबेगामधील 30, बारामतीमधील 49 ग्रामपंचायती, भोरमधील 74, दौंडमधील 50, इंदापूरमधील 61, जुन्नरमधील 67, मावळमधील 57, मुळशीमधील 45 ग्रामपंचायती, पुरंदरमधील 66, खेडमधील 91, शिरूरमधील 73 ग्रामपंचायती आणि वेल्हेमधील 31 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. मुदत संपणाऱ्या इतर ग्रामपंचायतींची निवडणूक तयारी दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे. तसेच इतर जिल्ह्यात देखील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची पूर्वतयारी प्रशासनाकडून सुरू आहे.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.