Thursday 22 November 2018

उमेदवाराकडून मतदारांना चप्पल भेट! ..नाही तर झोडून काढा अजब प्रचार

तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018

जिंकल्यानंतर काम केले नाही तर चप्पलने मारा! हटके प्रचार




देशातल्या पाच राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरु आहे. यात तेलंगणमधल्या अकुला हनुमंत या अपक्ष उमेदवाराने आपल्या हटके प्रचाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तेलंगणच्या जगतियाल जिल्ह्यातील कोरुतला विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे अकुला हनुमंत हातात चप्पल घेऊन दारोदार प्रचारासाठी फिरत आहेत.निवडणूक जिंकल्यानंतर मी तुमचे काम केले नाही तर मला चप्पलने झोडून काढा असे त्यांनी आपल्या मतदारांना सांगितले आहे. आपल्या शब्दावर मतदारांनी विश्वास ठेवावा यासाठी प्रचारा दरम्यान ते मतदारांच्या हातात चप्पलही देत आहेत. हनुमंत यांच्या प्रचाराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अन्य राजकरण्यांनीही हनुमंत यांचे अनुकरण करावे अशी लोकांमध्ये चर्चा आहे. मतदारसंघात विकास करु शकलो नाही तर राजीनामा देईन असे त्यांनी मतदारांना सांगितले आहे. मी चांगले काम करु शकलो नाही तर मतदारांना मला चप्पलने झोडून काढण्याचा पूर्ण अधिकार आहे असे हनुमंत यांनी सांगितले. तेलंगण राष्ट्र समितीचे वरिष्ठ नेते आणि आमदार के. विद्यासागर राव कोरुतला विधानसभेचे प्रतिनिधीत्व करतात. या मतदारसंघामध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे. तेलंगणमध्ये ७ डिसेंबरला मतदान होणार आहे.


तेलंगणातील 4 गर्भश्रीमंत उमेदवार, 700 कोटींपेक्षा जास्त अधिकृत संपत्ती

तेलंगणात विधानसभेच्या निवडणुकांचा जोर चांगलाच वाढला आहे. तर जवळपास सर्वच पक्षांच्या उमेदवारांची घोषणाही झाली आहे. आता, उमेदवारांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील गर्भश्रीमंत उमेदवारांची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये येथील 4 उमेदवारांची अधिकृतपणे एकूण संपत्ती 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे हे चारही उमेदवार चार वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. 

तेलंगणात विधानसभेच्या 119 जागांसाठी 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी 19 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत. त्यामुळे उमेदवारांची सर्वच माहिती अधिकृतपणे निवडणूक आयोगाकडे आली आहे. त्यानुसार 4 उमेदवारांची अधिकृत संपत्ती तब्बल 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. 

1. के राजगोपाल रेड्डी (काँग्रेस) - राजगोपाल रेड्डी यांची एकूण संपत्ती 300 कोटी रुपये आहे. ते तेलंगणातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. रेड्डी यांनी मुनुगोडे विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शपथपत्रामध्ये त्यांनी आपली संपत्ती 314 कोटी असल्याचे जाहीर केले आह. रेड्डी हे 2009 ते 2014 पर्यंत खासदार होते. तर, सध्या ते तेलंगणात विधानपरिषेदेच आमदार आहेत. 

2. मरी जनार्दन रेड्डी (टीआरएस)- मरी जनादर्न रेड्डी यांची एकूण संपत्ती 161 कोटी रुपये आहेत. टीआरएस पक्षाचे नेते असलेल्या मरी जनार्दन रेड्डी हे तेलंगणातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत नेते आहेत. गतवर्षीच्या निवडणुकांवेळी त्यांची एकूण संपत्ती 111 कोटी रुपये एवढी होती. मरी जनार्दन रेड्डी आणि त्यांच्या पत्नी मरी जमुना रेड्डी हे दोघेही उद्योजक आहेत. त्यांचे गतवर्षीचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 कोटी रुपये आहे. 

3. जी. योगानंद (भाजपा) - भारतीय जनता पक्षाचे तेलंगणातील उमेदवार असलेल्या जी योगानंद यांची एकूण संपत्ती 146 कोटी रुपये असून ते तेलंगणातील तिसऱ्या क्रमांकाचे गर्भश्रीमंत उमेदवार आहेत. हैदराबादच्या सेरीलिंगमपल्ली विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत. 

4. नामा नागेश्वर राव (टीडीपी) - नामा नागेश्वर राव हे तेलुगू देसम पक्षाचे नेते असून त्यांची एकूण संपत्ती 113 कोटी रुपये एवढी आहे. नागेश्वर राव यांनी खमाम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते चौथ्या क्रमांकाचे श्रींमत उमेदवार आहेत. सन 2009 ते 2014 पर्यंत ते लोकसभा खासदार म्हणूनही कार्यरत होते. विशेष म्हणजे देशातील श्रीमंत खासदारांच्या यादीत त्यांचे नाव आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी त्यांनी 338 कोटी रुपये संपत्ती असल्याचे जाहीर केलं होतं. राव हे मधुकॉन ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक आहेत. तसेच तेलंगणातील एक आघाडीचे उद्योजकही आहेत. 

तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018
तेलंगाणा विधानसभेची मध्यावधी निवडणूक  7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी निकाल लागेल. तेलंगाणामध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा आहे. येथे तेलंगाणा राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस-तेलुगू देसम यांची महाआघाडी अशी मुख्य लढत आहे. त्याशिवाय भाजपा आणि एमआयएम हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.तेलंगणातीलविधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट वाटपात महिलांना जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना तिकीट देताना आपला हात आखडता घेतला आहे. काँग्रेसकडून 100 उमेदवारांपैकी केवळ 11 महिलांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तर तेलंगणा राष्ट्र समितीने केवळ चारच महिलांना निवडणुकांच्या रिंगणात उतरवले आहे. सिद्दीपेठ जिल्ह्यातील तोगुटा गटातील सुमारे ४००० शेतकऱ्यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला (टीआरएस) मतदान न करण्याची शपथ घेतली आहे. गोदावरी नदीवर प्रस्तावित असलेल्या कलमेश्वर प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन करण्यास शेतकºयांचा विरोध आहे. सरकार मात्र या प्रकल्पासाठी आग्रही आहे.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



तेलंगणच्या जगतियाल जिल्ह्यातील कोरुतला विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे अकुला हनुमंत यांच्यासह २९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

SL NOCandidate NameParty
1Kalvakuntla Vidya Sagar RaoTelangana Rastra Samithi
2Gannarapu BhumaiahIndependent
3Kalvakuntla SarojaTelangana Rastra Samithi
4Kalvakuntla Vidya Sagar RaoTelangana Rastra Samithi
5Kalvakuntla SarojaTelangana Rastra Samithi
6J N VenkatBharatiya Janata Party
7Mohammad Rasheed KhanOthers
8Gannarapu BhumaiahIndependent
9Jangili SunithaBharatiya Janata Party
10Vemula Vikram ReddyIndependent
11J N VENKATBharatiya Janata Party
12Jyothidevi KomireddyIndian National Congress
13DAYYA RAGHUVEER KUMAROthers
14JUVVADI NARSINGA RAOIndian National Congress
15NAVANEETHA KRISHNA RAO JUVVADIIndian National Congress
16Jangili SunithaIndependent
17Juvvadi Narsinga RaoIndian National Congress
18Navaneetha Krishna RaoIndian National Congress
19Maddenapelli RamuluIndependent
20Arra Raja PrasadOthers
21Mohd. Rasheed KhanOthers
22Gannarapu BhoomaiahOthers
23Jagilam RameshIndependent
24Dayya Raghuveer KumarOthers
25Jyothidevi KomireddyIndian National Congress
26Limbadri PuppalaBahujan Samaj Party
27Akula HanmandluIndependent
28Kalvakuntla Vidyasagar RaoTelangana Rastra Samithi
29Vemula Vikram ReddyOthers

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.