Saturday 3 November 2018

भाजपकडून अटल संकल्प महासंमेलनात अजितदादा पवार यांच्या अटकेची संकल्पना

भाजप-सेना युतीचे मुख्यमंत्र्यांचे संकेत;स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांची उठाठेव अनाठायी!



सिंचन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांनी वर्तवले. ते पिंपरी-चिंचवड येथील आयोजित अटल संकल्प महासंमेलनात अटक संकल्पनेबाबत बोलले. यापूर्वीही जेलमधील अनेक बराकी रिकाम्या असल्याचे वक्तव्य भाजप नेत्यांनी केले होते तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोषी असतील तर निश्चित अटक होऊ शकते असे मत व्यक्त केले होते. निवडणुकीपूर्वी अटकेची कारवाई होऊ शकते अशी चर्चा करून राष्ट्रवादी मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निवडणूक जिंकण्याबाबतचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचे अशा वारंवार केलेल्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. मात्र निवडणूकपूर्वी सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना अटकेची कारवाई झाली नाही तर भाजपला मतदानातून मतदार निश्चित अटकाव करतील यामध्ये शंका वाटत नाही. दरम्यान राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेला देखील या अटल संकल्प महासंमेलनातून मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी मोटारीतून प्रवासादरम्यान सर्व समाधान केल्याने त्यांचा सूर बदलला असून विकासासाठी कोणालाही पाठींबा देऊ असे वक्तव्य करून संभाव्ययुती बाबत संकेत दिले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील आयोजित अटल संकल्प महासंमेलनासाठी स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांचे कष्ट वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

....तर मावळ आणि शिरूरमधून भाजपचे खासदार निवडून आणू – मुख्यमंत्री

युती संपली म्हणून भाजपने मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात सभा आयोजित केलेली नाही, तर या दोन्ही मतदारसंघात नरेंद्र मोदींना पाठिंबा देणारेच खासदार निवडून आणण्यासाठी ही सभा आयोजित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मित्रपक्षांनी मोदींना पाठिंबा दिला, तर या दोन्ही मतदारसंघातून दिल्लीला त्यांचे दोन खासदार पाठवू. अन्यथा आमचे खासदार निवडून आणू, असा इशारा त्यांनी सेनेला दिला. निगडी, प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, दिलीप कांबळे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आमदार चंद्रकांत हाळवणकर, प्रशांत ठाकूर, बाबुराव पाचार्णे, योगेश टिळेकर, खासदार अमर साबळे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, महापौर राहुल जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह मावळ आणि शिरूर मतदारसंघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मावळ आणि शिरूरसाठी मदनलाल धिंग्रा मैदानावर कोणाच्या विरोधात भाजपने सभा घेतलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी कोण आहे, हे समजण्यासाठी ही सभा आहे. मावळ आणि शिरूरमध्ये सभा घेतोय याचा अर्थ युती संपली का?, असा प्रश्न काहींना पडला आहे. या दोन्ही मतदारसंघात नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार निवडून आणण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे. २०१४ मध्ये मोदी लाट होती म्हणून खासदार निवडून आणले म्हणणाऱ्यांना २०१९ मध्ये आम्ही सुनामी आणण्यासाठीच ही सभा घेतली आहे. आगामी निवडणुकीत मावळ आणि शिरूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार निवडून आणले जातील. मित्रपक्षांनी मोदींना पाठिंबा दिला, तर त्यांचे खासदार पाठवू. अन्यथा आमचे खासदार निवडून आणू. मोदींना पंतप्रधान करणे ही देशाची आवश्यकता आहे. त्यांच्यासारखे कणखर नेतृत्व देशाला हवे आहे. त्यामुळे त्यांना जे पाठिंबा देतील, त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असेच खासदार निवडून आणायचे असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपचे खुले आव्हान आहे. त्यांनी एका व्यासपीठावर यावे. तुमचे १५ वर्षांचे राजकारण आमची चार वर्षाची सत्ता. या चार वर्षात आम्ही उजवे ठरलो नाहीत, तर निवडणुकीला सामोरे जाणार नाही. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे ५० हजार कोटी रुपये जमा केले. काँग्रेस-राष्ट्रवादीने ८ हजार कोटी दिले होते. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सिंचनाच्या नावावर स्वतःची घरे आणि तिजोरी भरली. भाजप सरकारने शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून दिला. रस्ते आणि सिंचन क्षेत्रात सरकारने मोठ्या प्रमाणात काम केले. तुम्ही तिजोऱ्या भरण्यासाठी जनतेचे पैसे लाटले आणि आम्हाला विचारता तुम्ही काय केले?, असा सवाल त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला केला. अनधिकृत बांधकामांबाबत न्यायालयाने दिलेला निकाल हा आरक्षणाच्या जागेवरील बांधकामांबाबत दिला आहे. आरक्षणाच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे नियमित करायचे असेल, तर शेजारीच आरक्षणासाठी दुसरी जागा उपलब्ध असण्याचा कायदा भाजप सरकारने केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील एकाही अनधिकृत बांधकामाला हात लावला जाणार नाही. शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे नियमित केल्याशिवाय भाजप सरकार स्वस्थ बसणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार पिंपरी-चिंचवडसाठी १५ वर्षात आयुक्तालय सुरू करू शकले नाही. भाजप सरकारने अवघ्या चार वर्षांत पोलिस आयुक्तालय सुरू केले. शहरात मेट्रोचे काम सुरू केले. शास्तीकर रद्दे केला. शहराचा पाण्याचा प्रश्नही भाजप सरकार निश्चितपणे सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, पिंपरी-चिंचवडचे अनेक प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित होते. राज्यात भाजपची सत्ता येताच गेल्या चार वर्षांत मी स्वतः आणि आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा करून प्रलंबित असलेले ९० टक्के प्रश्न सोडवले आहेत. शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची मागणी होत होती. ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली. पुढील दहा वर्षांत शहराला पाणी समस्येला सामोरे जावे लागणार नाही यासाठी पवना, इंद्रायणी आणि भामा-आसखेड या तीन धरणातून अतिरिक्त पाण्याचा कोटा मंजूर केला. अमृत योजनेअंतर्गत शहरासाठी ३०० कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मिळवून दिले. शहराचा स्मार्ट सिटी योजनेतही समावेश केला. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यातून सर्वात जास्त निधी पिंपरी-चिंचवडला दिला. या येजनेअंतर्गत शहरात सुमारे २० हजार घरे उभारण्यात येणार आहेत. मोशी कचरा डेपोच्या भोवती बफर झोनची हद्द १०० मीटरपर्यंत आणले. नागपूरसारखेच पिंपरी-चिंचवडमध्येही मेट्रोचे काम वेगाने व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून काम प्रगतीपथावर आणले. शहरासाठी वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध करून दिले. शहराचे काही मोजकेच प्रश्न आता प्रलंबित राहिले आहेत. शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एफएसआयचे धोरण करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याचा विचार करावा. नदी सुधार प्रकल्पामुळे शहरातील नद्यांचे पुनरूज्जीवन होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नदी सुधार प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी प्राधान्याने मार्गी लावावा. पुण्यासारखेच पिंपरी-चिंचवड शहर एज्युकेशन हब व्हावे यासाठी प्राधिकरणामार्फत जागा उपलब्ध करून द्यावी. हिंजवडीतील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी एलिव्हेटेड मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच सलग उड्डाणपुलांमुळेदेखील हा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांत लक्ष घालावा. शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी पवना जलवाहिनीचा प्रश्न समजुतीने सोडवण्यासाठी मावळमधील भूमीपुत्रांना विश्वासात घ्यावे. त्यांच्या संमतीनेच पवना जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लावावा. महापालिका निवडणुकीवेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप नेतृत्वाने माझ्यावर आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आली. आता मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि पक्षाने आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवावा. या दोन्ही मतदारसंघाचे खासदार हे भाजपचेच असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार बाळा भेगडे, प्रशांत ठाकूर, सुरेश हाळवणकर, महेश लांडगे यांनीही मनोगत व्यक्त केले.
==============================


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

निवडणुका आल्या की शिवसेना-भाजपाला राम आठवतो – अजित पवार


निवडणुका जवळ आल्या की चुनावी जुमले सुरु होतात. सूक्ष्म, लघु उद्योगाला ५९ मिनिटात एक कोटी कर्ज देणार सांगतात. हे इतकं कर्ज कसं देणार, शक्य तरी आहे का? निवडणुकीसाठी हे सर्व सुरु आहे. सत्तेत आल्यावर म्हणणार हा चुनावी जुमला होता. सरकारने नुसता दुष्काळ जाहीर केला. काहीच नियोजन नाही. भाजप सरकारचा भोंगळ कारभार सुरू आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.पिंपरीत नेत्यांना मंत्रीपद, महामंडळ याची आमिष दाखवली होती. पण काय मिळालं तुम्हाला दिसतंय. भाजप सरकार बनवाबनवी करत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बाधण्यामागे भाजपाच राजकारण आहे. निवडणूक जवळ आल्यावर राममंदिराचा मुद्दा काढला. समाजात धृवीकरण करायचय. निवडणुका आल्या की शिवसेना, भाजपाला राम आठवतो. आज पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. त्यावर अजित पवार यांनी टीका केली. हुकूमशाही पध्दतीने भाजप व राज्यकर्ते काम करत आहेत. चंद्रकात पाटील काय म्हणतात. राफेल बाबत सरकार कोर्टाला सांगतय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व गुप्तता ठेवण्यात आलीय. म्हणजे हे कोर्टाला सुरक्षा शिकवणार.शिवसेना थेट भाजपावर विखारी टीका करतेय तरी भाजप नेते शांत आहेत. काल झालेल्या बैठकीत ४८ जागांपैकी तीन चतुर्थांश जागांवर आघाडीचं एकमत झालंय. समविचारी पक्षांनी एकत्र येण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. अगदी प्रकाश आंबेडकर आमच्याबद्दल काही बोलले असले तरी आम्ही त्यांच्यासोबत पुन्हा चर्चेसाठी तयार आहोत असे अजित पवार म्हणाले.आता ज्या जागांवर एकमत झालंय, त्यापैकी काही जागा आम्ही मित्रपक्षांना देणार आहोत. मनसेला आघाडीत घेणार का? यावर समविचारी पक्ष एकत्र येतील असं सूचक विधान करत कालच्या बैठकीत मनसे बद्दल चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं. शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याने महाअघाडीत ते नसतील.मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे गाजर दाखवण्याच काम. जे सत्तेला हपापले आहेत. त्यांना गाजर आहे. भाजप शिवसेनेची आघाडी झाली किंवा नाही तरी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस युती होणार. गेल्या वेळेस युती नसल्याने त्याची किंमत सर्वाना मोजावी लागली असे अजित पवार म्हणाले.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.