Friday, 2 November 2018

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७ आमदारांच्या पॅन कार्ड तपशिलात विसंगती

पॅन कार्ड तपशील देणे बंधनकारक असूनही भाजपच्या २ व शिवसेनेचा 1 अशा तीन आमदारांनी दिला नाही 





====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) अहवाल



माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७ आमदारांच्या पॅन कार्ड तपशिलात विसंगती आढळून आली आहे. पुन्हा निवडून आलेल्या महाराष्ट्रातील आमदारांपैकी ७ आमदारांच्या २००९ आणि २०१४ मध्ये दिलेल्या पॅन कार्ड तपशिलात विसंगती आढळून आली. यात भाजपचे ५ आणि काँग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. पॅन कार्ड तपशील देणे बंधनकारक असूनही भाजपच्या २ व शिवसेनेचा 1 अशा तीन आमदार आमदारांनी दिला नाही. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) अहवाल नुकताच सादर केला आहे यामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2014 विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात AFQPP7385J असा पॅन कार्ड तपशिल दिलेला आहे. तर 2009 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात AFQPP6385J असा पॅन कार्ड तपशिल दिलेला आहे. तसेच 2004 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात AFQPP6385J असा पॅन कार्ड तपशिल दिलेला आहे. मागील दोन निवडणूक प्रतिज्ञापत्रात 6385 असून 2014 विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 7385 अशी तपशिलात विसंगती आहे. दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश असून त्यांचे वार्षिक उत्पन्न ३८ कोटींपेक्षा जास्त आहे. भाजपचे आताचे मंत्री जयकुमार रावल (वार्षिक उत्पन्न ८ कोटींपेक्षा अधिक) आणि विजय देशमुख (४ कोटींपेक्षा अधिक), सुरेश हळवणकर (वार्षिक उत्पन्न ७ कोटींपेक्षा अधिक), कृष्णा खोपडे (वार्षिक उत्पन्न ३ कोटींपेक्षा अधिक) आणि किसन राठोड (वार्षिक उत्पन्न ७ कोटींपेक्षा अधिक) तर काँग्रेसच्या निर्मला गावित (वार्षिक उत्पन्न ३ कोटींपेक्षा अधिक) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पैठणचे शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे ज्यांची वार्षिक संपत्ती ११ कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांनी पॅन कार्ड तपशील दिलेला नसून शहादा येथील भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी (वार्षिक उत्पन्न १ कोटीपेक्षा अधिक) आणि भंडाऱ्याचे भाजपचे आमदार रामचंद्र अवसरे (वार्षिक उत्पन्न २७ लाखांपेक्षा अधिक) पॅन कार्ड तपशील दिलेला नाही.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवाराला अर्जासोबत उत्पन्नाचे शपथपत्र देताना पॅन कार्डची माहिती देणे बंधनकारक आहे, परंतु अजूनही देशभरातील ५४२ पैकी ७ खासदार आणि ४०८६ आमदारांपैकी १९९ आमदारांनी अजूनही आपले पॅन कार्ड तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केलेले नाहीत. यात काँग्रेस आघाडीवर असून काँग्रेसच्या ५१ आमदार आणि एका खासदाराने, तर भाजपच्या ४२ आमदारांनी पॅन कार्ड दिलेले नाही. तिसऱ्या क्रमांकावर सीपीआय असून त्यांच्या २५ आमदारांनी हा तपशील दिलेला नाही. महाराष्ट्रातून तीन आमदारांचाही यात समावेश असून त्यापैकी दोघे सत्ताधारी भाजप आणि एक जण शिवसेनेचा आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने सर्व खासदार व आमदारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रांचा अभ्यास करून एक अहवाल नुकताच सादर केला आहे. या अहवालानुसार बीजेडी आणि एआयडीएमकेच्या प्रत्येकी २ खासदारांनी, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि एआययूडीएफच्या प्रत्येकी एका खासदाराने पॅन कार्ड तपशील दिलेले नाहीत. खासदारांमध्ये तामिळनाडू, ओडिशाचे प्रत्येकी २, आसाम-मिझोराम आणि लक्ष्यद्वीपचा प्रत्येकी एक आहे. आमदारांच्या यादीत केरळचा क्रमांक सर्वात वर असून केरळच्या ३३ आमदारांनी पॅन कार्ड तपशील दिलेला नाही. त्याच्यानंतर मिझोराम (२८) आणि मध्य प्रदेश (१९) चा क्रमांक लागतो.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.