Thursday 1 November 2018

धुळे व अहमदनगर महानगरपालिकेसाठी 9 डिसेंबरला मतदान

धुळे व अहमदनगर महानगरपालिकेसाठी 9 डिसेंबरला मतदान

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 

=====================================================================
 
धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होईल; तर  मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली. 
नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ), लोहा (नांदेड), मौदा (नागपूर), रिसोड (वाशीम), ब्रम्हपुरी (चंद्रपूर) आणि शेंदुर्णी (जळगाव) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान; तर 10 डिसेंबर 2018 रोजी मतमोजणी होईल.
धुळे महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे.  शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 46 हजार 94 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 29 हजार 569 आहे.  एकूण 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 37 जागा राखीव आहेत.  अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत. अहमदनगर महानगरपालिकेची मुदतदेखील 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 असून मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 56 हजार 719 आहे. एकूण 17 प्रभागातील 68 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 34 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत. दोन्ही महानगरपालिकांसाठी 13 नोव्हेंबर 2018 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 

=====================================================================

निवडणूक कार्यक्रम

·         नामनिर्देशनपत्रे दाखल करणे             : 13 ते 20 नोव्हेंबर 2018
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी                 : 22 नोव्हेंबर 2018
·         उमेदवारी मागे घेणे                           : 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत
·         निवडणूक‍ चिन्ह वाटप                      : 27 नोव्हेंबर 2018
·         मतदान                                           : 9 डिसेंबर 2018
·         मतमोजणी                                      : 10 डिसेंबर 2018
·         निकालाची राजपत्रात प्रसिद्धी             : 13 डिसेंबर 2018 पर्यंत

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 

=====================================================================

नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी 9 डिसेंबरला मतदान

 नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ), लोहा (नांदेड), मौदा (नागपूर), रिसोड (वाशीम), ब्रम्हपुरी (चंद्रपूर) आणि शेंदुर्णी (जळगाव) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान; तर 10 डिसेंबर 2018 रोजी मतमोजणी होईल सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यातील मौदा आणि शेंदुर्णी या दोन नगरपंचायती आहेत. उर्वरित सर्व नगरपरिषदा आहेत. नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 नोव्हेंबर 2018 या कालावधीत भरता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 नोव्हेंबर 2018 रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 29 नोव्हेंबर 2018 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=====================================================

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 

=====================================================================

धुळे महापालिकेतील विद्यमान नगरसेवक यादी खालीलप्रमाणे-

अहमदनगर महापालिकेतील विद्यमान पदाधिकारी यादी खालीलप्रमाणे-

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.