Tuesday 27 November 2018

निवडणुक खर्च खासगी कंपनीच्या ‘ट्रू व्होटर’ मोबाईल अ‍ॅपद्वारे भरण्याची उमेदवारांना जाचक अट

अ‍ॅप वापरण्यासाठी सक्ती; निवडणूक आयोगाच्या वतीने अ‍ॅप डेव्हलपरकडून अपात्रतेची उमेदवारांना भीती!


महापालिका निवडणुकीतील उमेदवारांना निवडणुक खर्च मोबाईल अ‍ॅपद्वारे भरण्याचे घातलेली अट चुकीची असून, सदर सक्ती त्वरित रद्द करण्याची मागणी पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेने राज्य निवडणुक आयोगाकडे केली आहे. अशा स्वरुपाची मागणी देखील अ‍ॅड. प्रसन्ना जोशी यांनी राज्य निवडणुक आयुक्‍त जे.एस. सहारिया यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. यापूर्वीच प्राब या संस्थेने मागणी करूनही आयोगाने दाखल घेतली नाही. धुळे व अहमदनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकांना पुन्हा उमेदवारांना निवडणुक खर्च मोबाईल अ‍ॅपद्वारे भरण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक खर्च सादर करण्याच्या मूळ उद्देशाच्या विरोधी ही कृती आहे. मुळात ही सक्ती राज्य निवडणुक आयोगापेक्षा ‘ट्रू व्होटर’ नावाच्या अड्रॉइड प्रणाली विकसक आयोगाच्या माध्यमातून करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.अहमदनगर येथे निवडणूक आयोगाच्या वतीने अ‍ॅप डेव्हलपरने बिनदिक्कत अपात्रतेबद्दल बोलून उमेदवारांच्या मनात भीती उत्पन्न केली आहे. नियमबाह्य नाहक भीती निर्माण करणे ही कृती लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला जात आहे. नुकतेच अ‍ॅड. प्रसन्ना जोशी यांनी निवेदन दिले असून यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च भरण्याबाबत आदेश काढला आहे. या आदेशानुसार उमेदवारांना निवडणूक प्रचाराचा खर्च ‘ट्रू व्होटर’ नावाच्या अड्रॉइड प्रणालीवर चालणार्‍या मोबाईल अ‍ॅपद्वारे भरणे बंधनकारक केले आहे. याबाबत 28 सप्टेंबर मनपा आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे  खर्च सादर न केल्यास त्यांस 6 वर्षाकरीता अपात्र ठरविण्यात येईल, मार्गदर्शनपर शिबिरात सांगण्यात आल्यामुळे सर्वच उमेदवार व निवडणूक अधिकारी यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.या अ‍ॅपद्वारे खर्च सादर न केल्यास अपात्र ठरविणे हे 1995 च्या मूळ आदेशात नमूद केलेले नाही. तसेच अधिसूचना काढून त्यात कोणतीही दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या वतीने अ‍ॅप डेव्हलपरने बिनदिक्कत अपात्रतेबद्दल बोलून उमेदवारांच्या मनात भीती उत्पन्न करणे बेकायदेशीर आहेच मात्र स्थानिक पातळीवरील लोकशाहीस घातक असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असले तरी तो अ‍ॅपद्वारेच भरावा असे बंधन घालणे हे समाजातील कमकुवत घटकांना मारक आहे. आज 50% जागा महिलांकरिता राखीव असून त्यातील बहुतेक जागांवर गृहिणी उमेदवारी भरतात, तसेच अंध, अपंग, अशिक्षित, मागास घटकांना निवडणूक प्रक्रिया समजून घेतानाच वेळ लागत असून त्यात पुन्हा अ‍ॅपचा हट्ट धरल्यास त्यांना आपल्या मतदारांपर्यंत पोहोचणे कठीण आहे. सर्व उमेदवारांकडे अँड्रॉइड फोन असणे शक्य नाही. त्यामुळे मुळात कायद्यात तरतूद नसताना अशाप्रकारे खर्च सादर करण्याचा हट्ट करणे आणि तो अ‍ॅपद्वारेच सादर करणे हे लोकशाहीस मारक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने तातडीने आपल्या आदेशात दुरुस्ती करून उमेदवारांना पारंपरिक पद्धतीने खर्च सादर करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी अ‍ॅड. जोशी यांनी केली आहे. महापालिका निवडणूक लढवत असणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्च हा 'ट्रू व्होटर अॅप'ऐवजी पारंपारिक पद्धतीने सादर करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा याप्रकरणी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून दाद मागावी लागेल, असा इशारा अॅड. प्रसन्ना जोशी यांनी दिला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ व त्याअंतर्गत केलेले निवडणूक नियम पाहता उमेदवारांनी आपला दैनंदिन खर्च सादर करावा, याबाबत कुठेही तरतूद आढळून येत नाही. मात्र, राज्य निवडणूक आयुक्तांच्या १० फेब्रुवारी १९९५च्या आदेशामध्ये आयोगाने विहित केलेल्या नमुन्यात दैनंदिन खर्च सादर करावा, असे नमूद केले आहे. निवडणुकीत मतदारांवर होणारा धनशक्तीचा प्रभाव कमी करणे या मूलभूत व तर्कसंगत उद्देश त्यामागे होता. त्या आदेशानंतर वीस वर्षानंतर आयोगाने हे अॅप विकसित केले असून त्यामध्ये खर्च सादर करणे बंधनकारक केले आहे. अॅपद्वारे खर्च सादर न केल्यास अपात्र ठरविणे हे १९९५ च्या मूळ आदेशात नमूद केलेले नाही. तसेच अधिसूचना काढून त्यात कोणतीही दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित शिबिरात अपात्रतेबद्दल बोलून उमेदवारांच्या मनात भीती उत्पन्न करणे बेकायदेशीर आहेच. तसेच उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असले तरी तो अॅपद्वारे भरावा, असे बंधन घालणे हे समाजातील कमकुवत घटकांना मारक आहे. त्यामुळे निवडणूक खर्च भरण्याबाबत केलेले नियम शिथिल करून सर्व उमेदवारांना पारंपारिक पद्धतीने कायद्याच्या अधिन राहून निवडणूक खर्च सादर करण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. 


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=====================================

खासगी कंपनीला "अॅप' माध्यमातून माहिती डेटा संकलन बाबत माहिती तंत्रज्ञान महासंचालनालयाच्या आदेशांचा राज्य निवडणूक आयोगाने भंग केला आहे का?


खासगी कंपनीला "अॅप' माध्यमातून माहिती डेटा संकलन व त्याचा वापराबाबत माहिती तंत्रज्ञान महासंचालनालयाच्या आदेशांचा राज्य निवडणूक आयोगाने भंग केला आहे का? याचे प्राथमिक दृष्टीकोनातून उत्तर होय असेच आहे. कारण केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात संगणक प्रणाली व वेबसाईट बनवणे/देखरेख/सिक्युरिटी/वापर/सर्वर/डेटा सुरक्षा बाबत केंद्र सरकारने एनआयसीला (National Informatics Centre Govt. of India )  याबाबत सर्व अधिकार व कार्यपद्धती निश्चित केलेली आहे. तसेच एनआयसीच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. राज्यातील सरकारच्या कोणत्याही विभागात संगणक प्रणाली व वेबसाईट बनवणे/देखरेख/सिक्युरिटी/वापर/सर्वर/डेटा सुरक्षा बाबत माहिती तंत्रज्ञान 
विभाग संचलन करीत आहे. राज्य निवडणूक आयोगाने अल्प अनुभव असलेल्या कंपनीला सदरील "अॅप' प्रणाली बनविण्याचे/विकसन करण्याचे काम कोणत्या निकषावर दिले याची माहिती उपलब्ध नाही. 'ट्रू व्होटर अॅप' प्रणालीचे सिक्युरिटी /वापर/सर्वर/डेटा सुरक्षा बाबत केंद्र सरकारने एनआयसीला (National Informatics Centre Govt. of India )  याबाबत सर्व अधिकार व कार्यपद्धती निकष पूर्ण केलेले आहेत का? याचे देखील उत्तर जाणून घेणे आवश्यक आहे. सदरील 'ट्रू व्होटर अॅप' प्रणालीचा डेटा एक खासगी कंपनी आपल्या सर्वरवर ठेवत असेल तर त्याची सुरक्षेची खात्री व इतर दुरुपयोग बाबत जबाबदारी देखील निश्चित करावी लागेल. सदर प्रणालीवरून डेटा दुरुपयोग झाला काय याची देखील चौकशी करणे आवश्यक आहे. कारण मतदानकेंद्र कुठे आहे हे पहाण्यासाठी मतदारांची वैयक्तीक माहीती संकलन केले जाते त्या माहितीची आवश्यकता कितपत आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने अ‍ॅप डेव्हलपरने अपात्रतेबद्दल बोलून उमेदवारांच्या मनात भीती बेकायदेशीर उत्पन्न करणे कितपत योग्य आहे. स्थानिक पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीस घातक निश्चितच घातक आहे. राज्य निवडणूक आयोगाने खासगी कंपनीला अशा स्वरूपाचे काम देण्यापेक्षा राज्य अथवा केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या अधिकृत विभागाला सदरील कार्य प्रणाली संचलन व देखरेखीखाली कार्यरत शासकीय संस्थांना देणे आवश्यक आहे. खासगी कंपनीच्या ‘ट्रू व्होटर’ नावाच्या अड्रॉइड प्रणालीच्या वापरण्यास प्रोत्साहन देण्याबाबत बहुतांश लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांना शंका आहेत. सदरील शंकाचे निरासरण राज्य निवडणूक आयोग करेल अशी आशा आहे. 


‘ट्रू व्होटर’ नावाच्या अड्रॉइड प्रणाली विकसक/संचालक व सदरील खासगी कंपनीचे इतर व्यवसाय माहिती-




राष्ट्रहित एज्युकेशन सोसायटीचे अभिनव कॉलेज ऑफ एज्युकेशन चिखली जि.बुलढाणा या संस्थेचे संचालक असलेले प्रा.  मुरलीधर. एस. भुतडा व सौ. आशाताई भुतडा आहेत. यांचीच अभिनव आय टी सोलुशन (Abhinav IT Solutions Pvt. Ltd ) या  नावे प्रा.लि. कंपनी आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचे विभागीय केंद्र अमरावती यांच्या अभ्यास केंद्र  क्रमांक १३१५६ नुसार संचालित राष्ट्रहित एज्युकेशन सोसायटीचे अभिनव कॉलेज ऑफ एज्युकेशन चिखली जि.बुलढाणा या  संस्थेच्या वतीने विविध व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई द्वारा  प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजक विकास अभियान अंतर्गत प्रशिक्षण देऊन स्वताच्या व्यवसायिक कंपनीमध्ये रोजगार देण्यात  येतो. केंद्र सरकारच्या कौशल्य व उद्योजक विकास अभियान अंतर्गत रोजगारांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार दिला तरच अशा  संस्थांना संपूर्ण अनुदान दिले जाते. यामुळे चक्रकार पद्धतीने उपक्रम राबविले जात आहेत. या मध्ये गैर आहे असा दावा करणे  चुकीचे होईल. मुरलीधर. एस. भुतडा हे Abhinav IT Solutions Pvt. Ltd व Bpb Ezee Education Private Limited या दोन  कंपनीचे संचालक आहेत. Abhinav IT Solutions Pvt. Ltd  या कंपनीचे कुटुंबातील सर्व सदस्य संचालक म्हणून कार्यरत आहेत. यामध्ये मुरलीधर. एस. भुतडा व त्यांची पत्नी सौ. आशाताई भुतडा तसेच त्यांची मुले अभिनव व पुजा संचालक आहेत. Abhinav IT Solutions Pvt. Ltd या कंपनी गेल्या काही वर्षापासून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठीचे 134 पेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबिलिटी, ई-कॉमर्स, डेटा Analytics, मोबाइल अॅप्स, ई-गव्हर्नन्स इत्यादीं सेवा देण्यात येतात. पुढील 4 "अॅप' सॉफ्टवेअर आहेत. 1.eZee Test App, 2.True Voter App, 3.eVidyalaya System, 4.Voyalab – DevOps Branch, या व्यावसायिक "अॅप' प्रणाली आहेत. विद्यार्थी यांची कल चाचणी घेण्यासह काही शिक्षण संस्थाशी निगडीत प्रणाली आहेत. या प्रणालीच्या माध्यमातून माहिती देखील संकलित होत असते. 






Abhinav It Solutions Private Limited कंपनी बाबत माहिती- 

Abhinav It Solutions Private Limited is a Private incorporated on 05 July 2013. It is classified as Non-govt company and is registered at Registrar of Companies, Pune. Its authorized share capital is Rs. 200,000 and its paid up capital is Rs. 100,000.It is inolved in Other computer related activities [for example maintenance of websites of other firms/ creation of multimedia presentations for other firms etc.]Abhinav It Solutions Private Limited's Corporate Identification Number is (CIN) U72900PN2013PTC148018 and its registration number is 148018.Its Email address is bhutadamurli@gmail.com and its registered address is OFFICE NO 31 DHANLAXMI PARK BANDAL DHANKUDE PLAZA KOTHRUD PUNE Pune MH 411029 IN 


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.