Monday 26 November 2018

निवडणूक आयोगाच्या 'बूट' या चिन्हाचा उमेदवाराकडून मतदारांचे बूट पॉलिश करून सन्मान

बूटपॉलिश करुन मत मागण्याचा उमेदवाराचा अनोखा फंडा!



'बूट' हे मतदानचिन्ह असलेला हा उमेदवार चक्क लोकांचे बूट आणि चपला मोफत पॉलिश करुन देत आहे. निवडणूक आयोगाच्या 'बूट' या चिन्हाचा मतदारांचे बूट पॉलिश करून सन्मान देत असल्याची भावना व्यक्त करून बूटपॉलिश करुन मत मागण्याची शक्कल भोपाळमध्ये एका उमेदवाराने लढवली आहे. लोकांचे बूटपॉलिश करुन ‘हा’ उमेदवार मत मागतोय. निवडणूक आयोगाकडून बूट या चिन्हाचा पर्याय होता. परंतु, कोणीच हे चिन्ह घेण्यास तयार नव्हते. मी स्वत:हून हे चिन्ह घेतले. भोपाळमध्ये एका उमेदवाराने अशीच शक्कल लढवली आहे. 'बूट' हे मतदानचिन्ह असलेला हा उमेदवार चक्क लोकांचे बूट आणि चपला मोफत पॉलिश करुन देत आहे. मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरु आहे. विविध राजकीय पक्षांचे मोठे नेते प्रचारसभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढत आहेत. तर दुसरीकडे काही असे उमेदवार आहेत की, जे थेट लोकांमध्ये जाऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. प्रत्येकजण मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरताना दिसतोय. भोपाळमध्ये एका उमेदवाराने अशीच शक्कल लढवली आहे. ‘बूट’ हे मतदानचिन्ह असलेला हा उमेदवार चक्क लोकांचे बूट आणि चपला मोफत पॉलिश करुन देत आहे. सध्या भोपाळमध्ये हाच चर्चेचा विषय ठरला आहे. शरदसिंह कुमार असे उमेदवाराचे नाव असून ते राष्ट्रीय आमजन पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणूक लढत आहेत. आपल्या या अभिनव उपक्रमाबद्दल बोलताना शरदसिंह म्हणाले की, माझ्या मतदान चिन्ह हे बूट आहे. प्रचारासाठी मी लोकांचे बूट आणि चपला पॉलिश करुन देत आहे. निवडणूक आयोगाकडून बूट या चिन्हाचा पर्याय होता. परंतु, कोणीच हे चिन्ह घेण्यास तयार नव्हते. मी स्वत:हून हे चिन्ह घेतले. आता मी लोकांचे बूट पॉलिश करुन माझा प्रचार करत आहे. मी हा लोकांचा आशीर्वादच समजतो, असेही शरदसिंह सांगत आहेत. व्यवसायाने पेट्रोलपंप चालक असलेल्या शरदसिंह कुमार हे राष्ट्रीय आमजन पक्षाच्या वतीने मध्यप्रदेश मधील भोपाळ विधानसभा निवडणूक लढवीत आहेत. 


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.