Tuesday 6 November 2018

कर्नाटक पोटनिवडणूक : काँग्रेस-जेडीएसचा जल्लोष, भाजपाला फटका

गेल्या चार वर्षातील लोकसभेच्या पोटनिवडणुकांमधील भाजपची दहावी हार; संख्याबळात घट

गेल्या चार वर्षात आतापर्यंत लोकसभेच्या ३० जागांवर पोटनिवडणुका झाल्या आहेत. या ३० पैकी १६ जागा भाजपच्या ताब्यात होत्या. त्यातील केवळ ६ जागांवर भाजपला विजय मिळविता आला असून १० जागांवर पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. त्यामुळे २०१४ मध्ये २८२ जागांवर विजय मिळविणाऱ्या भाजपची संख्या घटून २७२ इतकी झाली आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच भाजपला कर्नाटकमध्ये प्रचंड मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकात लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. या पाच पैकी केवळ एकाच जागेवर भाजपला विजय मिळवता आला असून चारही जागांवर काँग्रेस आणि जेडीयूने दणदणीत विजय मिळविल्याने भाजपसाठी ही धोक्याची घंटा असल्याचं मानलं जात आहे. कर्नाटकातील बेल्लारी, शिमोगा आणि मांड्या या लोकसभा मतदारसंघापैकी बेल्लारी आणि शिमोगा लोकसभा सीट भाजपच्या ताब्यात होती. तर मांड्याची सीट जेडीएसकडे होती. आज झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत बी.एस. येडियुरप्पा यांचे चिरंजीव बी. वाय. राघवेंद्र येडियुरप्पा शिमोगातून विजयी झाले आहेत. तर भाजपच्या ताब्यात असलेला बेल्लारी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यात काँग्रेसला यश आलं आहे. मांड्यातून जेडीएसचे उमेदवार एलआर सिवाराम्मे गौडा विजयी झाले आहेत.  राम नगर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची पत्नी अनिता कुमारस्वामी विजयी झाल्या आहेत. तर जामखंडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आनंद न्यामागौडा यांनी विजय मिळविला आहे. 


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================











कर्नाटकात झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडीला मोठं यश मिळालं आहे. भाजपाची या निवडणुकीत पिछेहाट झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे. बल्लारी लोकसभा मतदारसंघ आणि जामखांडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मांडया लोकसभा आणि रामानागारा विधानसभा मतदारसंघातून जेडीएस उमेदवाराने विजय मिळवला आहे. रामानगरम विधानसभा मतदारसंघातून जे़डीएस उमेदवार अनिता कुमारस्वामी १ लाख ९ हजार १३७ मतांनी विजयी झाल्या आहेत. अनित कुमारस्वामी यांना १ लाख २५ हजार ४३ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवाराला फक्त १५ हजार ९०६ मते मिळाली. अनिता मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पत्नी आहेत.जमाखांदी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आनंद एस नयामगौडा ३९,४८० मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. त्यांना ९६ हजार ९६८ मते मिळाली तर भाजपा उमेदवार श्रीकांत कुलकर्णी यांना ५७,४९२ मते मिळाली.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.