Wednesday, 14 November 2018

खडसेंच्या बंगल्यावरून विनोद तावडेंचा लाचखोरीसाठी आ.गोटे यांना फोन!

भाजप आमदारांना आमदार गोटे यांचे ७ पानी खुले पत्र;

राजकारणात जातीचा अडसर असल्याचा ५० वर्षांनी साक्षात्कार



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================
आ.धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषद निवडणुकीत विनोद तावडेंनी मतासाठी आमदारांना पैसे वाटले, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावरून तत्कालीन मुंबई भाजप अध्यक्ष विनोद तावडें यांनी फोन करून पैसे कुठे पाठवू असे विचारले असा खळबळजनक आरोप आमदार अनिल गोटे यांनी पत्राद्वारे केला आहे. आ.धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषद निवडणुकीत मतासाठी लाचखोरी झाल्याची कबुली या पत्रात व्यक्त केलेली आहे. तर या आरोपासह अनेक आरोप करून खुलासे त्यांनी पत्रात केले आहेत. जन्माने ओबीसी धनगर असल्याचा दोष असावा मराठा असतो तर अशी वागणूक मिळाली नसती असे नमूद करून गेली 30-40 वर्ष राजकारण केल्यानंतर आता राजकारणात जातीचा अडसर असल्याचा साक्षात्कार झाल्याचा दावा पत्रात केला आहे. आमदार अनिल गोटे यांनी ७ पानी खुले पत्र भाजप आमदारांना दि. १३ नोव्हेंबर २०१८ रोजी पाठवले आहे. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे नमूद केले आहे.
आमदार अनिल गोटे यांनी भाजपच्या आमदारांना पत्र लिहून पक्षावर अनेक खळबळजनक आरोप केलेत. धुळ्यातल्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्याने संतापलेल्या गोटे यांनी आमदारकी आणि भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीष महाजन यांच्याशी त्यांचा वादही झाला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या सर्व आमदारांन पत्र लिहूनं अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. भाजपमध्ये छोटा राजन आणि दाऊदशी संबंधीत गुंडाना प्रवेश दिला जातो, विधानपरिषद निवडणुकीत विनोद तावडेंनी पैसे वाटले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांचं सरकार पाडण्याचा डाव फसला. भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना किंमत नाही असे अनेक आरोप आपल्या सात पानी पत्रात केले आहेत. आ.गोटेंच्या या लेटर बॉम्बमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.गेली 30 वर्ष राजकारणात मला विरोध करणाऱ्या, दाऊद, छोटा राजन यांच्या सारख्यांना माझी सुपारी देणाऱ्या गुंडांना रावसाहेब दानंवे हे भाजपमध्ये मुक्त प्रवेश देत आहेत. या लोकांवर हत्या, अपहरण, खून, दरोडे यासारखे गुन्हे आहेत. भाजपचं अध:पतन अस्वस्थ करणारं आहे. मतं मिळविण्यासाठी आम्ही गुंडांना प्रवेश देतो असं दानवे सांगतात. अटलजी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, उत्तमराव पाटील यांचा भाजप आज राहिला नाही. धनंजय मुंडेंची विधान परिषदेची निवडणुक असताना विनोद तावडे मुंबई भाजपचे अध्यक्ष होते. मी मतदान केल्यानंतर त्यांचा एकनाथ खडसेंच्या बंगल्यावरून फोन आला. ते म्हणाले तुमचे पैसै कुठे पाठवू, तुम्ही भाजपच्या आमदारांन पैसे दिले का असं विचारून मी त्यांना गप्प केलं. कारण आयुष्यात मी कधीच कुणाचा एक रूपयाही घेतला नाही. गोपीनाथ मुंडेंना मी ही गोष्ट सांगितली होती.विलासराव देशमुख आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असताना त्यांचं सरकार खाली खेचण्याचा भाजपचा डाव होता. राष्ट्रवादाचे वीस आमदार गळालाही लागले होते. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी नावावर एकमत न झाल्याने आणि काही वाचाळ नेत्यांमुळे आमचा डाव फसला. यात माझाही सहभाग होता. त्यानंतरच मला तेलगी प्रकरणात अडकविण्यात आले. या पत्रात सरंक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांच्यावरही त्यांनी अनेक आरोप केले आहेत. अनिल गोटे यांच्या या आरोपांमुळं विरोधी पक्षांना आयतं कोलीत मिळणार असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. 19 नोव्हेंबरला विधानसभा अध्यक्षांना भेटून राजीनामा पत्र सादर करणार असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. आ. अनिल अण्णा गोटें यांनी यापूर्वी  25 जानेवारी 2018 रोजी मा. शरद पवार यांना खुले पत्र लिहिले होते त्यामध्ये त्यांच्यावर अनेक उपरोधात्मकपणे आरोप केलेले होते. अधूनमधून अशा स्वरुपाची खुले पत्र लिहून आपले मत व्यक्त करण्याची त्यांना आवड आहे. खान्देशातील जळगाव आणि धुळे या महापालिका निवडणुका तीन महिन्यांच्या अंतराने होत आहेत. जळगावची प्रभारी म्हणून जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडेच होती. पण निवडणूक प्रमुख म्हणून जळगावचे आमदार आणि महानगर जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. धुळ्यात गोटे यांना विश्वासात घेऊन, काही जागा देऊन एकोपा ठेवता आला असता.जामनेर, जळगावात गिरीश महाजन यांना एवढा टोकाचा विरोध झालेला नव्हता. धुळ्यात स्वपक्षीय लोकप्रतिनिधीचा विरोध ते कसा परतावून लावतात, हे पुढील काळात कळेल. परंतु, भाजपाच्या प्रतिमेला धक्का लावण्यात गोटे यांना यश आले आहे. जनसंघाचे प्रचारक, पत्रकार, शेतकरी नेते, लोकप्रतिनिधी असा राजकीय प्रवास असलेले अनिल गोटे हे मुरब्बी आणि चाणाक्ष राजकारणी आहेत. महापालिका निवडणुकीचे निमित्त करुन भाजपाच्या राज्यस्तरीय नेतृत्वाला त्यांनी आव्हान दिले आहे. धुळे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपामधील दोन गटांमध्ये संघर्ष मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे. यामुळे भाजपत्तेर इतर राजकीय पक्षांची अनुकूल वातावरण निर्मिती होऊ शकलेली नाही. भाजपामधील दोन गटांमध्येच खरी लढत होणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे. भाजपने धुळे महापालिका निवडणुकीची सूत्रे आमदार अनिल गोटे यांच्याऐवजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली. निवडणुकीचे नेतृत्व गोटे यांच्याकडे दिले नाही केवळ या करणातूनच हे राजकीय नाट्य घडत आहे. या राजकीय नाट्यमय घडामोडींचा लाभ देखील भाजपचे दोन्ही गट घेऊ इच्छित आहे. लोकसंग्राम पक्षाची स्थापना यापूर्वीच अनिल गोटे यांनी केली आहे. निवडणुकी देखील लढवल्या आहेत. महापौर होण्यासाठी त्यांना नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी लागेल. विद्यमान आमदार पदाचा राजीनामा देऊन नगरसेवक पदाची निवडणूक लढविणारे कदाचित पहिले आमदार ठरतील असे वाटते. नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्याकडे पत्नी व मुलांचा पर्याय देखील आहे. तो स्वीकारतात काय हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबर 2018 रोजी कळेलच. 

Mr. Chandrakant Bhujbal 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे




====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होईल; तर  मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी होईल. 

निवडणूक कार्यक्रम

·         नामनिर्देशनपत्रे दाखल करणे             : 13 ते 20 नोव्हेंबर 2018
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी                 : 22 नोव्हेंबर 2018
·         उमेदवारी मागे घेणे                           : 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत
·         निवडणूक‍ चिन्ह वाटप                      : 27 नोव्हेंबर 2018
·         मतदान                                           : 9 डिसेंबर 2018
·         मतमोजणी                                      : 10 डिसेंबर 2018
·         निकालाची राजपत्रात प्रसिद्धी             : 13 डिसेंबर 2018 पर्यंत


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

सत्य कहाणी काय आहे? 

धुळे महानगरपालिकेतील ४४ नगरसेवकांनी गैरवर्तवणूक, बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणप्रकरणी अपात्र ठरवून मनपा बरखास्त करण्याची मागणी शहराचे आमदार अनिल गोटे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्या अनुषंगाने याबाबत चौकशी करून सरकारला अभिप्रायासह अहवाल सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागाने आयुक्त सुधाकर देशमुख यांना केली. याबाबत उपकुलसचिव शं. त्र्यं. जाधव यांच्या स्वाक्षरीचे पत्र मनपा प्रशासनास जून 2018 ला प्राप्त झाले होते. महापालिकेच्या दि. ३१ एप्रिल २०१६ रोजीच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अशोभनीय वर्तन करून तत्कालीन आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्यावर हल्ला केला होता. तसेच शहरात दि. १५ मे २०१४ रोजी महापालिकेने तत्कालीन उपमहापौर फारुख शहा हाजी अन्वर शहा यांचे सर्व्हे नं. ५७ ब वरील अतिक्रमण नियमित करण्याबद्दल ठराव केला होता. प्रत्यक्षात अशा ठराव करणे मनपासह सरकारच्या हिताविरुद्ध आहे. तसेच विनापरवानगी संबंधित भुखंड ३६ लाख १८ हजार रुपयात विक्रीसही काढला. यासह देवपूर सर्व्हे नं. २५ येथे जयहिंद ट्रस्टच्या जागेतून दर्शविण्यात आलेला १५ मीटर रुंदीचा डीपी रस्ता शहर विकास योजनेतून वगळण्याचा बेकायदेशीर निर्णय घेतला आहे, असे आमदार गोटे यांनी पत्रात नमूद केले होते. तत्कालीन आयुक्त संगीता धायगुडे यांच्यावरही अशाच प्रकारे हल्ला झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या ४४ सदस्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबतही आमदार गोटेंनी निवेदन दिले होते. या निवेदनानंतर आलेल्या अहवालात नगरसेवकांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ड चे सरळ उल्लंघन केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याची दखल घेत मनपा आयुक्तांनी सरकारला अहवाल देत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे कळविले होते. मात्र, आता पुन्हा नगरविकास विभागाने मनपा आयुक्तांना दिलेल्या पत्रात संबंधित ४४ सदस्यांनी केलेली गैरवर्तवणूक, बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणाबाबत चौकशी करून स्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करावा, असे म्हटले आहे. या प्रकारामुळे सर्ब नगरसेवक गोटे यांच्या विरोधात व भाजप पक्ष श्रेष्ठींच्या आश्रयाला गेलेले आहेत. या प्रकरणाला राजकीय वादाची किनार समजली जाते.  

तेलगी प्रकरणात 4 वर्ष तुरुंगवास भोगलेले आमदार अनिल गोटे जनसंघाचे प्रचारक, पत्रकार, शेतकरी नेते, लोकप्रतिनिधी असा राजकीय प्रवास असलेले हे मुरब्बी आणि चाणाक्ष राजकारणी आहेत. पुण्यातील महाराष्ट्र विद्यालयात 11 वि पर्यंत शिक्षण घेऊन पुढे शासकीय तंत्र विद्यालय कोल्हापूर येथे डी.सी.ई. तांत्रिक शिक्षण घेतले आहे. लोकसंग्राम पक्षाची स्थापना देखील त्यांनी केलेली आहे. महापालिकेच्या माध्यमातून पत्नी हेमा अनिल गोटे यांनी देखील निवडणूक लढवलेली आहे. त्यांना दोन सिद्धार्थ व तेजस अशी दोन मुले आहेत. मुलगा,पत्नी व स्वतः गोटे यांच्या २ कंपन्या ( BULL HITS INFRASTRUCTURE PVT.  व  LOKHANDWALA REALTIES PVT.) अशा आहेत. सध्या दोनही कंपन्या बंद स्वरुपात असल्याचे दर्शवत आहे. तर २०१४ च्या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नी शेती तर स्वतः शेती व व्यवसाय असे नमूद करून स्वतः व पत्नीचे अनुक्रमे उत्पन्न ३० लाख व ४५ लाख २०१३-१४ यावर्षातील नमूद केलेले आहे. दोन्ही मुले अवलंबून नाहीत. त्यांचा उल्लेख टाळण्यात आला आहे. बुल हिट्स इन्फ्रा प्रा.ली या स्वताच्या कंपनीचे कर्ज/देय 1 कोटी 69 लाख असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे. त्यांच्यावर विविध न्यायालयात ७ खटले प्रलंबित आहेत. सध्या धुळे शहर या विधानसभा मतदारसंघातून लोकप्रतिनिधीत्व करीत आहेत.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================
-----------------------------------------

भाजपमध्ये जातीचं राजकारण चालत नाही - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा आमदार गोटेंवर पलटवार

‘मला जातीमुळे तिकीट मिळालं नसून मेरीटमुळे मिळालं आहे. भाजपमध्ये जातीचं राजकारण चालत नाही. पण काही विकृत लोकं विनाकारण टीका करतात,’ असं म्हणत सुभाष भामरे यांनी आमदार गोटेंवर निशाणा साधला आहे.आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपांना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार उत्तर दिलं आहे. ‘अनिल गोटे यांनी काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ असा सवाल यावेळी सुभाष भामरे यांनी केला.‘मला जातीमुळे तिकीट मिळालं नसून मेरीटमुळे मिळालं आहे. भाजपमध्ये जातीचं राजकारण चालत नाही. पण काही विकृत लोकं विनाकारण टीका करतात,’ असं म्हणत सुभाष भामरे यांनी आमदार गोटेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आमदार अनिल गोटे यांनी भाजपच्या आमदारांना पत्र लिहून पक्षावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. धुळ्यातल्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्याने संतापलेल्या गोटे यांनी आमदारकी आणि भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीष महाजन यांच्याशी त्यांचा वादही झाला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या सर्व आमदारांना पत्र लिहून अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

मुख्यमंत्र्यांबरोबरील चर्चेनंतर अनिल गोटेंचा राजीनामा मागे

पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढल्या जाव्यात या दोन अटींवर आपण राजीनामा मागे घेतल्याचे आमदार अनिल गोटे यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांशी सुमारे सव्वातीन तास झालेल्या चर्चेत आपल्या दोन अटी मान्य केल्यामुळे राजीनामा मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षणमंत्री सुभाष भामरे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत गोटे यांनी राजीनामा दिला होता. पंरतु, जर पक्षाने दगाफटका केला तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.अंतर्गत वादामुळे अनिल गोटे यांनी राजीनामा दिला होता. नामचीन गुंडांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पक्षात प्रवेश देतात. मते वाढवण्यासाठी गुंडांना प्रवेश दिल्याची वक्तव्ये करतात. भाजपचे केवळ सत्तेसाठी होत असलेले अध:पतन मन अस्वस्थ करणारे आहे. मतांची संख्या वाढ करण्याकरिता आम्ही गुंडांना प्रवेश देतो, असे दानवे सांगतात. गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध संघर्ष यात्रा काढली होती. आज ते हयात असते, तर तुम्ही असे धाडस केले असते का, असा प्रश्न आमदार अनिल गोटे यांनी राजीनामा देताना उपस्थित केला होता.

-------------------------------------------------------------------------------------------------

धुळे महापालिका निवडणुक ; ३२ गुंड दोन वर्षासाठी हद्दपार

धुळे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी ३२ गुंडांना दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे़. दोन वर्षासाठी हद्दपार केलेल्यामध्ये किरण दादाभाऊ ढिवरे, आकाश प्रकाश येवलेकर, अनिल भाईदास पाटील, रोहित प्रभाकर सोनवणे, सचिन रमेश लोंढे, गौरव संजय इंगळे (सर्व रा़ मोगलाई, भीमनगर, साक्री रोड धुळे), संभा उर्फ समाधान देविदास निकम, रियाज रज्जाक शेख, भटू राजेश माळी, पवन रमेश माळी, कपील सुभाष शिंदे, ललीत ज्ञानेश्वर मराठे, विनोद छगन बेलदार, राकेश सुरेश पिंपळे (सर्व रा़ स्टेशन रोड, धुळे), विक्की उर्फ विक्रम महादेव परदेशी, स्वप्निल उर्फ नंदू महादेव परदेशी, महादेव उर्फ महादू चैत्राम परदेशी, संतोष रविंद्र परदेशी, करण रविंद्र परदेशी, धिरज रामेश्वर परदेशी, योगेश सुभाष अजबे, प्रशांत बाबुराव माने (सर्व रा़ कुंभारखुंट, गल्ली नंबर ५-६ची बोळ, चैनी रोड, धुळे), मंगल गिरधर गुजर, अमोल मधुकर जाधव, सुनील बंडू गवळी, पंकज उर्फ शेरा गणेश सुर्यवंशी (चौधरी), धर्मराज गिरधर गुजर, कार्तिक दिलीप अग्रवाल, आकाश विनोद गुजर, रोशन भटू पारखे, मुकेश मोहन बारी, मोहन चंद्रकांत टकले (सर्व रा़ गल्ली नंबर ५, घड्याळवाली मशिदजवळ, धुळे) यांचा समावेश आहे़.मुंबई पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये दोन वर्षांसाठी या ३२ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे असा प्रस्ताव धुळे शहर आणि आझादनगर पोलीस निरीक्षक यांच्याकडून पाठविण्यात आला होता़ आलेल्या प्रस्तावांची चौकशी करण्याची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती़ चौकशी अहवाल हिरे यांच्याकडून पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्याकडे पाठविण्यात आला होता़ चौकशी अहवाल आणि प्रस्तावावर अंतिम कामकाज होऊन पोलीस अधीक्षकांनी हद्दपारीचा निर्णय घेतला़. 
-----------------------------------------------------------------------------------------------------------



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

Dhule Municipal Corporation Election 2013

Party NameFlagPerformance
Nationalist Congress Party 34
Shivsena (SS) 11
Indian National Congress (INC) 7
Bharatiya Janata Party (BJP) 3
Samajwadi Party (SP) 3
Bahujan Samaj Party (BSP) 1
Loksangram Party1
Independents10

List of Corporators

Ward NoWinner NameParty
1-AChitra DusaneIND
1-BGangadhar MaliSS
2-ASunil SonarNCP
2-BNalinibai WadileNCP
3-ASadashiv PatilINC
3-BShaikh HajrabiINC
4-ASubhash JagtapNCP
4-BKalpana BorseNCP
5-AJyotsna PatilSS
5-BChandrakant KeleNCP
6-AVaibhavi DusaneBJP
6-BKamlesh DewareNCP
7-ARamesh BorseNCP
7-BPratibha ChaudhariBJP
8-AIndubai BorseIND
8-BKailas ChaudhariNCP
9-AAnsari AfzalunnisaNCP
9-BPathan IsmailINC
10-AHira ThakreSS
10-BGulab MahajanIND
11-ASharad WaradeIND
11-BPrabhawati ChaudhariLoksangram
12-AChandrakant SonarNCP
12-BLalita AghavNCP
13-ASanjay GujrathiSS
13-BVaishali LahamageSS
14-AGovind SakhlaNCP
14-BBirbaladevi MandoreBJP
15-AVishwanath KharatSS
15-BBhagwat MuktabaiSS
16-AKumar DiyalaniINC
16-BKashish UdasiNCP
17-ASushila IshiBSP
17-BNarendra PardeshiSS
18-AJitendra ShirsatNCP
18-BChandrakala JadhavNCP
19-AShakuntala JadhavSS
19-BSanjay JadhavSS
20-ASonal ShindeNCP
20-BIndubai WaghNCP
21-AKalpana MaahaleNCP
21-BMaya PardeshiNCP
22-AAqil AnsariINC
22-BMomin AtiabanoINC
23-AAnsari MohammedNCP
23-BJaibunnisa PathanNCP
24-AFaruk ShahNCP
24-BLeena KarankalINC
25-AArshad ShaikhIND
25-BHalimabano AnsariNCP
26-ADipak ShelarNCP
26-BJayashree AhirraoNCP
27-AMohammad PatelSP
27-BJulaha NurunnisaNCP
28-ASayyed SabirSP
28-BShaikh FatemabiSP
29-ADinesh ShardulNCP
29-BManisha MahaleNCP
30-AYamunabai JadhavNCP
30-BSandip PatoleNCP
31-AAmol MasuleNCP
31-BShashikala NavaleNCP
32-ASubhash KhatalIND
32-BAjalkar MadhuriIND
33-ASatish MahaleNCP
33-BSarika AgarwalIND
34-ANana MoreNCP
34-BLata KuwarSS
35-AFeroze ShaikhIND
35-BJulaha RashmiIND

आमदार अनिल गोटे यांचे भाजप आमदारांना लिहिलेले खुले पत्र मूळ प्रत खालीलप्रमाणे- 












====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================


धुळे महापालिकेतील विद्यमान नगरसेवक यादी खालीलप्रमाणे-





====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================













No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.