Monday 26 November 2018

अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला दिलासा; खासदार पुत्र आणि सुनेचाही अर्ज वैध

औरंगाबाद खंडपीठाकडून सुवेंद्र गांधी व दीप्ती गांधी यांचे अर्ज वैध

महापालिकेच्या ६८ जागांसाठी ३५१ उमेदवार रिंगणात ; अंतिम चित्र बुधवारी स्पष्ट होणार




अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला दिलासा मिळाला असून खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र आणि सून दिप्ती यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज याबाबत निकाल दिला आहे. या निकालामुळे अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. फटक्याच्या आतषबाजीने या निर्णयाचे स्वागत खासदार दिलीप गांधी समर्थक व भाजप कार्यकर्त्यांकडून केले जात आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयात भाजपाचे उमेदवार सुवेंद्र गांधी, दीप्ती गांधी व प्रदीप परदेशी, यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविले आहेत यामुळे भाजपासह खा दिलीप गांधी यांनी दिलासा मिळाला असून आता या उमेदवारांना निवडणूक लढवता येणार आहे. मात्र भाजपचेच सुरेश खरपुडे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. दरम्यान न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून विरोधकांनी कितीही कूट नीतीचे राजकारण केले तरी शेवटी विजय सत्याचाच होतो . आता न्यायालयातील लढाई आहे आता पुढील जिंकली आहे , पुढील काळात जनतेच्या न्यायालयातील लढाई लढून आम्ही ती नक्की जिंकू अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते सुवेंद्र गांधी यांनी दिली आहे.


स्थगिती देण्यास नकार


छाननीत बाद झालेले उमेदवारी अर्ज खंडपीठाने वैध ठरविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी या निर्णयाला तूर्त स्थगिती देण्याची मागणी हरकतदार यांनी घेतली होती मात्र खंडपीठाने ती अमान्य केली. निवडणुकीनंतर जे निवडून येतील त्यांच्या विरोधात याचिका दाखल करा असे निर्देश दिले असल्याचे वकिलांनी सांगितले.

अहमदनगर महानगरपालिका निवडणुक २०१८ मध्ये उमेदवारी अर्ज छाननी नंतर शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी या मुख्य पक्षांच्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले होते. यात भाजपचे ४ तसेच राष्ट्रवादी व सेनेचा प्रत्येकी १ अर्ज आहे. नगरचे भाजप खासदार व भाजप शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांचे चिरंजीव नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचा प्रभाग ११ व त्यांच्या पत्नी दीप्ती गांधी यांचा प्रभाग १२ मधील अर्ज बाद करण्यात आला होता. खासदार गांधी यांच्या बंगल्याच्या अतिक्रमण तक्रारीच्या आक्षेप मुळे हे दोन्ही अर्ज बाद झाले केले होते. याशिवाय सेनेचे उमेदवार व विद्यमान विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांच्यासह योगेश चिपाडे (राष्ट्रवादी), सुरेश खरपुडे (भाजप), प्रदिप परदेशी (भाजप) यांचे अर्ज छाननीत बाद करण्यात आले. यातील परदेशी हे वादग्रस्त अपक्ष उमेदवार श्रीपाद छिंदम याच्या विरोधात उभे होते. छत्रपती शिवाजी महारांज यांच्याबद्दल अपशब्द उच्चारल्याने छिंदम याची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. मात्र, आता त्याच्या विरोधात आता त्यांचा उमेदवार नाही, दरम्यान अर्ज बाद झालेले न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमध्ये भाजपच्या सुवेंद्र गांधी, दिप्ती गांधी, प्रदीप परदेशी, सुरेश खरपुडे या चौघांसह शिवसेनेचे उमेदवार व विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार योगेश चिपाडे, अपक्ष उमेदवार सय्यद सादीक आरिफ यांचा समावेश होता. उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान अनेक हरकती दाखल झाल्या होत्या.  भाजपच्या ४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. यात सुवेंद्र व दीप्ती गांधी यांचा अर्ज बाद झाल्यामुळे भाजप व विशेषत: खासदार दिलीप गांधी यांना हा मोठा धक्का मानला जात होता. अर्ज बाद करण्याच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्यात आली होती. औरंगाबाद खंडपीठाने अखेर त्यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. प्रभाग 11 ड मधील भाजपचे उमेदवार सुवेंद्र गांधी यांच्या विरोधात अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेचे उमेदवार गिरीश जाधव व राष्ट्रवादीचे उमेदवार नज्जू पहिलवान यांनी गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांच्या घरावरील अनधिकृत मोबाईल टॉवर व त्याच्या कराच्या थकबाकीबाबत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय घुले यांनी हरकत नोंदविली होती. सुरेश खरपुडे यांच्या अर्जावर बाळासाहेब बोराटे, संजय घुले यांनी हरकती नोंदविल्या होत्या.  दीप्ती गांधी यांच्या अर्जावर विजय पटवेकर यांनी हरकत नोंदवून घराच्या अतिक्रमणाचा दावा करण्यात आला होता. 


महापालिकेच्या ६८ जागांसाठी ३५१ उमेदवार रिंगणात ; अंतिम चित्र बुधवारी स्पष्ट होणार


महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी 130 उमेदवारांनी सोमवारपर्यंत (दि.26) अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे सतरा प्रभागात 68 जागांसाठी तब्बल 351 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, चार प्रभागांमधील अर्ज बाद झालेल्या उमेदवारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याने प्रभाग 8, 9, 11 व 12 या प्रभागांमधील उमेदवारांना माघारीसाठी बुधवारपर्यंत (दि.28) मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे चार प्रभागांचे अंतिम चित्र बुधवारीच स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत 715 अर्ज दाखल झाले आहेत. त्यात अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर प्रशासनाने वैध उमेदवार जाहीर केले होते. त्यापैकी 130 उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर 68 जागांसाठी 351 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, प्रभाग 8, 9, 11 व 12 चार प्रभागांमधील बाद झालेले उमेदवार अपिलासाठी उच्च न्यायालयात गेले असल्याने या प्रभागांमधील उमेदवारांना माघारीसाठी आयोगाने मुदत वाढवून दिली आहे. या चार प्रभागांमध्ये सध्या 87 उमेदवार रिंगणात आहेत. बुधवारपर्यंत माघारीसाठी मुदत असल्याने त्या दिवशी या चार प्रभागांचे चित्र स्पष्ट होणार आहे. उर्वरीत 13 प्रभागांमधील माघारीची मुदत संपुष्टात आली असल्याने या प्रभागांमधील लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. माघार घेण्यात आलेले उमेदवार पुढील प्रमाणे ः प्रभाग 1 अ - सारंग बोरुडे, प्रभाग 1 ब - ज्योती ढवण, पार्वती तागड,  प्रभाग 1 क - वैशाली चव्हाण, मीना चव्हाण,  प्रभाग 1 ड - दिंगबर ढवण, नितीन बारस्कर, विघ्नेश कुलकर्णी, प्रभाग 2 अ - अनिल बुटला,  प्रभाग 2 ब - प्रियंका तवले,   प्रभाग 2 ड - नितीन बारस्कर, रामदास आंधळे, निखील वारे, अशोक शिरसाठ, राहुल सांगळे, सुमित बटुळे, प्रकाश त्र्यंबके, प्रभाग 3 अ - सैय्यद असद, प्रभाग 3 ब - अनिता गाडे, प्रभाग 4 ब - सारिका काळोखे, प्रभाग 4 क - केतन क्षिरसागर, प्रभाग 4 ड - धनंजय गाडे, प्रभाग 5 अ - तायगा शिंदे, प्रभाग 5 ब - सविता गायकवाड, प्रभाग 5 क - गौतमी गेंट्याल, प्रभाग 5 ड - श्रीनिवासा बोज्जा, पंकज राठोड, चेतन शिरसुल, प्रभाग 6 अ - अनिता दळवी, प्रभाग 6 ब - रोहिदास दंडवते, मनोज राऊत, रविंद्र वाकळे, प्रभाग 6 क - सारीका भुतकर, भारती शेट्टी, प्रभाग 6 ड - ज्ञानेश्वर काळे, सचिन पाठक, भरत खाकाळ, प्रभाग 7 अ - वैशाली भाकरे, सोनल बोरुडे, प्रभाग 7 ब - मयुर पाटोळे,  प्रभाग 7 क - मुक्ताबाई कातोरे, प्रभाग 7 ड - शरद बारस्कर, प्रभाग 8 अ - संध्या वाणे, प्रभाग 8 ब - वल्लाकटी अंजली, प्रभाग 8 क - योगेश चिपाडे, प्रभाग 8 ड-  अरविंद शिंदे, विशाल खोटे, महादेव सब्बन, प्रभाग 9 - अ - अश्‍विनी गायकवाड, प्रभाग 9 ब - रुपाली बहिरवाडे, दिपा कसबेकर, लक्ष्मी लखापती, प्रभाग 9 क - यशोदास वाघमारे, रोहित राठोड, स्नेहा छिंदम, प्रभाग 9 ड- राजेंद्र बोगा, धनंजय जाधव, दिनानाथ जाधव, शेख अरिफ, संतोष जाधव,  प्रभाग 10 ब - पठाण शाहिस्ता, कल्पना सैेंदर, प्रभाग 10 क - शेख शमिम, शेख नसिम, शेख सुरय्या, प्रभाग 11 अ -  सय्यद सना, सुवार्ता वाघमारे, प्रभाग 11 ब - अनिकेत रासकर, प्रभाग 11 क - दिपाली मिसाळ, मंगल गुंदेचा, कल्पना भंडारी, शेख रुमाना,  सय्यद आशाबी, प्रभाग 11 ड - सागर बोरा, शेख वाजीद, समिर बोरा, मंगल गट्टाणी, शेख नादीर, प्रभाग 12 अ - गणेश हुच्चे,  प्रभाग 12 ब - निता घुले, शेख तहसिन, निर्मला गिरवले, अनुराधा वालकर, सरोजनी आहीरे, मंगल लोखंडे, प्रभाग 12 क - निता घुले, अनुराधा वालकर, रिजवान चुडीवाले, प्रभाग 12 ड - समिर बोरा, अजय बहिरवाडे, संभाजी कदम, शिवाजी कदम, शेख अबिद,  प्रभाग 13 अ - अभिजीत चिप्पा, रोहन डागवाले, सागर सोनवणे, प्रभाग 13 ब - रुपाली गोटीपामूल, प्रभाग 13 क - शितल भुजबळ, ताराबाई शिंदे, प्रभाग 13 ड - माधुरी लोंढे, प्रभाग 14 क- मनिषा भागानगरे, प्रभाग 15 अ - मयूर बांगरे, प्रभाग 15 ब - गितांजली औरसरकर, मंगल भुजबळ, मोनीका लालबागे, प्रणिता नांगरे, प्रभाग 15 क - गितांजली औरसरकर, वैजयंती खैरे, प्रभाग 15 ड - निलेश बांगरे, ठकाजी नानेकर, शेख नईम, प्रभाग 16 अ - उमाप सुनिल, प्रभाग 16 ब- सविता कराळे, नम्रता कोतकर, अनुराधा कुसुमकर, प्रभाग 16 क - धनंजय जामगावकर, जयद्रथ खकाळ, सय्यद निसार, प्रभाग 16 ड - श्रीकांत चेकटे, महेश गुंड, युवराज कोतकर, कृष्णा लांडे, दिलीप सातपुते, सचिन सातुपुते, सोहम सातपुते, प्रभाग 17 अ - राजकुमार कांबळे,  प्रभाग 17 ब - अलका भाले, अश्‍विनी गुंड, लताबाई शेळके, प्रभाग 17 क- दिलीप भालसिंग, अनिता हुलगे, ठुबे कल्याणी प्रभाग 17 ड - मिलिंद भालसिंंग, राहुल चिपाडे, अभिजीत कोतकर, शरद ठुबे.

------------------------------

चार प्रभागात अर्ज माघारीसाठी मुदतवाढ

चार प्रभागातील उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी खंडपीठात धाव घेतली होती. त्यांचे अर्ज वैध झाल्यानंतर खंडपीठाच्या निर्देशानुसार तेथे सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या चार प्रभागात मंगळवारी (दि.२७) वैध झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामध्ये पाच जणांचे अर्ज वैध ठरल्याने त्यांच्या नावासह ही यादी मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे अर्ज माघारीसाठी बुधवार (दि.२८) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८, ९, ११ आणि १२ मधील ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. त्यापैकी दहा उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सोमवारी खंडपीठात सुनावणी झाली. त्यामध्ये पाच जणांचे अर्ज वैध ठरले.त्यांच्या नावांसह अंतिम यादी पुन्हा प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यामुळे ही यादी मंगळवारी प्रसिद्ध होईल. उमेदवारांना गुरुवारी सकाळी चिन्हांचे वाटप होईल आणि त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी चिन्हासह प्रसिद्ध होईल.
--------------------------------------------

आणखी ८१ जणांना शहरबंदी

महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर उपद्रवी लोकांना हद्दपार करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आली असून, सोमवारी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ११३जणांना शहरातून हद्दपार केले, तर ३२ जणांना अटी-शर्तींवर शहरात राहता येणार आहे. आतापर्यंत एकूण ६६४ उपद्रवी लोकांचे प्रस्ताव प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सादर झाले होते. आतापर्यंत त्यातील ४११ जणांना हद्दपार करण्यात आले असून १७१ जणांना अटी व शर्तीवर महानगरपालिका निवडणूक काळात शहरात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे़ तिघांची नावे वगळण्यात आली आहेत तर दोघांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

आणखी ८१ जणांना शहरबंदी कारवाई करण्यात आलेली आहे यांची नावे पुढीलप्रमाणे- ऋषिकेश कोतकर, अशोक शेळके, ऋषिकेश परदेशी, अमर मुदगल, सचिन मुदगल, देविदास कोतकर, आनंद गिते, अभिजित काळे, अरबाज बागवान, नंदू बोराटे, विकास शिंदे, सुदर्शन सुपेकर, बबलू सुभेदार, सागर व्यवहारे, संजय ढापसे, दाणीज शेख, नितीन पवार, आसिफ शेख, महेश बागडे, वाहित कुरेशी, निखिल धनगेकर, मुद्द्या पठाण, भावेश राऊत, अरूण घुले, नितीन गिरवले, अतुल दातरंगे, संकेत उरमुडे, सिल्वर चव्हाण, राम चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, वर्गिस चव्हाण, जितेंद्र ढापसे, फत्ते मोहंमद शेख, राहुल बत्तीन, नरेश कंदे, अनिल पवार, अर्जुन जंगम, शंकर जंगम, महेश देशमाने, शंकर ससे, कबल दाल, जितेश धोत्रे, इम्रान खान, संजय पेटकर, सूर्यकांत बिल्लाडे, शेख छोटू समशोद्दीन, विजय संदलसे, गोरख भुजबळ, शेखर चव्हाण, विश्वास रोहिदिया, राजेश बहिरट, बाळासाहेब हराळे, रावसाहेब अळकुटे, अक्षय पवण, संदीप भागवत, अनिल महाले, आकाश ठोंबरे, लतिफ शेख, अमन शेख, अयाज सय्यद, अल्ताफ शेख, योगेश दळवी, सुनील साठे, संजय देवकुळे, राजेंद्र बोराडे, गोरख भिंगारदिवे, बबन शिंदे, अनिल सौंदर, किरण मकासरे, संतोष सौंदर, शेख मोहसिन मन्सूर, जावेद शेख, रविराज संगत, आशीर्वाद पवने, अभिषेक भागवाने, संजय खताळे, अरूण घुले, राजमहोम्मद नजीर अत्तार, विकास अकोलकर, आवेद सय्यद, सागर गायकवाड, मुन्ना कुरेशी, शहा फैजल बुºहाण सय्यद, संदीप शिंदे, घनश्याम बोडखे, तेजस गुंदेचा, महेश निकम, सुरज सरोदे, आकाश पिश्का, विजय भनगाडे, अमोल सुरसे, बाळासाहेब मुदगल, सागर ठोंबरे, अभिषेक भोसले, हर्षवर्धन कोतकर, सुरज शिंदे, विशाल वालकर, गणेश यादव, ओंकार घोलप, अक्षय धोत्रे, मोहसीन शेख, फुरकान शेख, सुभाष ठाकूर, अक्षय पवार, शामसिंग ठाकूर, संदीप भागवत, विकास सेवक, रमेश भिंगारदिवे.

अटी-शर्तीवर कारवाई करण्यात आलेली आहे यांची नावे पुढीलप्रमाणे- 


अनिल जाधव, एजाज सय्यद, तुषार कोतकर, मोबीन सय्यद, संतोष शिंदे, आसाराम कावरे, अजित कोतकर, अभिजित भगत, अण्णासाहेब शिंदे, मतीन सय्यद, महेश आहेर, विनोद निश्ताने, दिनेश सौंदर, अजय चितळे, प्रशांत ढापसे, कोंडिराम नेटके, गौरव मुनोत, दिगंबर गेंट्याल, खान मेहबूब उस्मान, संदीप आढळे, मुकेश गावडे, किशोर डागवाले, रवींद्र वाकळे, सुभाष कोंदे, मयूर बोचघोळ, वैभव वाघ, गणेश भोसले, गणेश हुच्चे, शिवाजी कदम, संभाजी कदम, योगेश सोनवणे, स्वप्निल शिंदे.
-------------------------------------------------------------------------


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



निवडणूक कार्यक्रम

·         नामनिर्देशनपत्रे दाखल करणे             : 13 ते 20 नोव्हेंबर 2018
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी                 : 22 नोव्हेंबर 2018
·         उमेदवारी मागे घेणे                           : 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत
·         निवडणूक‍ चिन्ह वाटप                      : 27 नोव्हेंबर 2018
·         मतदान                                           : 9 डिसेंबर 2018
·         मतमोजणी                                      : 10 डिसेंबर 2018
·         निकालाची राजपत्रात प्रसिद्धी             : 13 डिसेंबर 2018 पर्यंत





















POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.