Thursday 22 November 2018

अहमदनगर महानगरपालिका निवडणुक ; भाजपला धक्का! खासदार पुत्र आणि सुनेचाही अर्ज बाद

खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी व सून दीप्ती गांधी यांचे अर्ज बाद 

वादग्रस्त अपक्ष उमेदवार श्रीपाद छिंदम याच्या विरोधातील भाजप उमेदवाराचाही अर्ज बाद 


अहमदनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननी दरम्यान बड्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र गांधी व स्नुषा दिप्ती गांधी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या ४ नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. तर, शिवेसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक व एका अपक्षाचाही समावेश आहे. शुक्रवारी (दि.२३) पहाटे अडीच वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निकाल जाहीर केला आहे.
अहमदनगर महानगरपालिका निवडणुक २०१८ मध्ये उमेदवारी अर्ज छाननी नंतर शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी या मुख्य पक्षांच्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले गेले. यात भाजपचे ४ तसेच राष्ट्रवादी व सेनेचा प्रत्येकी १ अर्ज आहे. नगरचे भाजप खासदार व भाजप शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांचे चिरंजीव नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचा प्रभाग ११ व त्यांच्या पत्नी दीप्ती गांधी यांचा प्रभाग १२मधील अर्ज बाद झाला. खासदार गांधी यांच्या बंगल्याच्या अतिक्रमण तक्रारीच्या आक्षेप मुळे हे दोन्ही अर्ज बाद झाले. याशिवाय सेनेचे उमेदवार व विद्यमान विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांच्यासह योगेश चिपाडे (राष्ट्रवादी), सुरेश खरपुडे (भाजप), प्रदिप परदेशी (भाजप) यांचे अर्ज छाननीत बाद करण्यात आले. यातील परदेशी हे वादग्रस्त अपक्ष उमेदवार श्रीपाद छिंदम याच्या विरोधात उभे होते. छत्रपती शिवाजी महारांज यांच्याबद्दल अपशब्द उच्चारल्याने छिंदम याची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. मात्र, आता त्याच्या विरोधात आता त्यांचा उमेदवार नाही, दरम्यान अर्ज बाद झालेले न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमध्ये भाजपच्या सुवेंद्र गांधी, दिप्ती गांधी, प्रदीप परदेशी, सुरेश खरपुडे या चौघांसह शिवसेनेचे उमेदवार व विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार योगेश चिपाडे, अपक्ष उमेदवार सय्यद सादीक आरिफ यांचा समावेश आहे. तर महापौर सुरेखा कदम, संभाजी कदम यांच्या अर्जावरील हरकती फेटाळून ते अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान अनेक हरकती दाखल झाल्या होत्या. त्यातील प्रभाग ८, ९, १०, ११ व १२ या प्रभातील प्रमुख दिग्गजांच्या अर्जावरील हरकतींचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. उत्सुकता लागलेल्या या ३ प्रभागातील मातब्बर उमेदवारांचा निर्णय ऐकण्यासाठी जुनी महापालिका आवारात मोठी गर्दी होती. पहाटे अडीच वाजता वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. शिवसेना व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक अर्ज बाद झाला असला तरी भाजपच्या ४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यात सुवेंद्र व दीप्ती गांधी यांचा अर्ज बाद झाल्यामुळे भाजप व विशेषत: खासदार दिलीप गांधी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. महापौर सुरेखा कदम, संभाजी कदम यांच्या अर्जावरील हरकती फेटाळून ते अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान अनेक हरकती दाखल झाल्या होत्या. त्यातील प्रभाग 8, 9, 10, 11 व 12 या प्रभातील प्रमुख दिग्गजांच्या अर्जावरील हरकतींचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. प्रभाग 8 क व 8 ड या दोन जागांवर अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. योगेश चिपाडे यांच्या अर्जाला विशाल खोटे यांनी आक्षेप घेतला आहे. तर प्रभाग 11 ड मधील भाजपचे उमेदवार सुवेंद्र गांधी यांच्या विरोधात अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेचे उमेदवार गिरीश जाधव व राष्ट्रवादीचे उमेदवार नज्जू पहिलवान यांनी गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली आहे. विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांच्या घरावरील अनधिकृत मोबाईल टॉवर व त्याच्या कराच्या थकबाकीबाबत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय घुले यांनी हरकत नोंदविली होती. सुरेश खरपुडे यांच्या अर्जावर बाळासाहेब बोराटे, संजय घुले यांनी हरकती नोंदविल्या होत्या. त्यांच्याकडे मालमत्ता कराची थकबाकी असल्याचे तसेच मंगल कार्यालयांचे बांधकाम अनधिकृतपणे केल्याचा दावा यात करण्यात आला होता.महापौर सुरेखा कदम यांच्या अर्जावर पंकज गांधी व रिजवाना चुडीवाला यांनी हरकत घेतली होती. हॉटेल पांचाली ही त्यांची कौटुंबिक मालमत्ता असून त्यावर अनधिकृत टॉवर व त्याची थकबाकी असल्याचा दावा करण्यात आला होता. संभाजी कदम यांच्या अर्जावरही संध्या घोलप यांनी हरकत नोंदविली आहे. तर दीप्ती गांधी यांच्या अर्जावर विजय पटवेकर यांनी हरकत नोंदवून घराच्या अतिक्रमणाचा दावा करण्यात आला होता.या सर्व हरकतींवर गुरुवारी सायंकाळी सुनावणी झाली. मात्र रात्री उशिरापर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला होता. रात्री ११ वाजता निकाल देणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी वामन कदम यांनी प्रभाग 9 मधील भाजप उमेदवार प्रदीप परदेशी व प्रभाग 10 मधील अपक्ष उमेदवार सय्यद सादिक आरिफ यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्याचा निर्णय दिला. परदेशी यांच्या विरोधात कैलास शिंदे यांनी अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाची तक्रार केली होती. तर सय्यद सादिक यांच्याकडे सुमारे 78 हजारांची मालमत्ता कराची थकबाकी होती व या कारणांमुळे अर्ज बाद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.प्रभाग 8 मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. चिपाडे, प्रभाग 11 मधील भाजप उमेदवार सुवेंद्र गांधी, प्रभाग 12 मधील शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे, भाजपाच्या दीप्ती गांधी व सुरेश खरपुडे यांचे अर्ज बाद झाल्याचा निर्णय निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे यांनी दिला. 


श्रीपाद छिंदमला मोठा फायदा; विरोधातील भाजप उमेदवाराचा अर्ज बाद


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. छिंदमविरोधात उभ्या राहिलेल्या भाजप उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. नगरमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजपच्या 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामध्ये भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांचा देखील समावेश आहे. परदेशी छिंदमविरोधात निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र त्यांचा अर्ज बाद झाल्यामुळे आता त्याचा फायदा छिंदमला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्रीपाद छिंदमला भाजपने उमेदवारी दिली नाही, त्यामुळे त्याने अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



निवडणूक कार्यक्रम

·         नामनिर्देशनपत्रे दाखल करणे             : 13 ते 20 नोव्हेंबर 2018
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी                 : 22 नोव्हेंबर 2018
·         उमेदवारी मागे घेणे                           : 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत
·         निवडणूक‍ चिन्ह वाटप                      : 27 नोव्हेंबर 2018
·         मतदान                                           : 9 डिसेंबर 2018
·         मतमोजणी                                      : 10 डिसेंबर 2018
·         निकालाची राजपत्रात प्रसिद्धी             : 13 डिसेंबर 2018 पर्यंत





















POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे






No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.