Monday, 23 September 2019

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक अखेर जाहीर

सातारा पोटनिवडणूक विधानसभेसोबतच

माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर रिकाम्या झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. याची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून, विधानसभेसोबत म्हणजेच २१ ऑक्टोबरलाच साताऱ्यात मतदान होणार आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपाशी घरोबा केला. भाजपात जाण्यापूर्वी त्यांनी उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे साताऱ्याची जागा रिकामी झाली होती. उदयनराजे भाजपात गेल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक होणार असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात होता. पण, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना साताऱ्याचा कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यामुळे साताऱ्याची विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्याच्या विधानसभेसोबत २१ ऑक्टोबरला सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २४ ऑक्टोबरला विधानसभा मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे. सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे पोटनिवडणुकीचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सातारा पोटनिवडणुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाचे आदेश सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला मिळाले. त्यानंतर मंगळवारी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची आयोगाने घोषणा केली. आज (२४ सप्टेंबर) अधिसूचना जाहीर करत आयोगाने पोटनिवडणूक विधासभेसोबत घेण्याचे जाहीर केले. राज्यातील स्थानिक सण, महोत्सव, मतदारसंघातील याद्यांचे काम आणि हवामानाची स्थिती पाहता आयोगाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शुक्रवार, २७ नोव्हेंबर या दिवशी राजपत्रित अधिसूचना निघणार असून, ४ ऑक्टोबर या दिवशी नामांकन पत्र भरण्याचा दिवस आहे. तर शनिवारी, ५ ऑक्टोबर या दिवशी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारिख आहे ७ ऑक्टोबर. विधानसभा निवडणुकीसोबतच २१ ऑक्टोबरला सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात येणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी आणि २७ ऑक्टोबरला निकाल घोषित करण्यात येणार आहे. 

सातारा पोटनिवडणुकीसाठी दोन वेगवेगळी स्टिकर असेलेली मतदान यंत्रे

सातारामध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्रच होणार असल्याने मतदारांची गफलत होवू नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर दोन इव्हिएम व व्हीव्हीपॅटची दोन संच राहतील. यामध्ये लोकसभेसाठी असणाऱ्या मतदान यंत्रावर पांढऱ्या रंगाचे स्टिकर लावण्यात येणार असून, विधानसभेसाठी असणाऱ्या यंत्रावर गुलाबी रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहे. सातारामध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्रच होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन इव्हिएम व व्हीव्हीपॅटची दोन संच राहतील. यामध्ये लोकसभेसाठी असणाऱ्या मतदान यंत्रावर पांढऱ्या रंगाचे स्टिकर लावण्यात येणार असून, विधानसभेसाठी असणाऱ्या यंत्रावर गुलाबी रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांची गफलत होणार नाही. तसेच मतदान यंत्रावरील मतपत्रिकेचा रंगही याप्रमाणेच राहणार असून यंत्रावर मोठ्या अक्षरात लोकसभा व विधानसभा असे नमूद करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर एकच मतदार नोंदणी पुस्तिका ठेवण्यात येणार आहे. परंतु विधानसभा व लोकसभेसाठी दोन वेगवेगळ्या मतदार स्लिप असणार आहेत.येथील  निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून १५ हजार अतिरिक्त मनुष्यबळ व अतिरिक्त मतदान यंत्रे उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. ४ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची तारीख असून ५ ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होईल. ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.सातारा लोकसभा मतदारसंघात कोरेगाव, वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण व सातारा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या मतदानसाठी १५ हजार कर्मचाऱ्यांची अतिरिक्त गरज भासणार आहे. तसेच पोटनिवडणुकीसाठी ३५०० बॅलेट युनिट (बीयू), ३००० कंट्रोल युनिट (सीयू) व ३२०० व्हीव्हीपॅट हे जास्तीचे लागणार असून ही सर्व यंत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी संख्येत वाढ करण्यात आली आहे. १२०० मतदार असलेल्या ठिकाणी एक केंद्राध्यक्ष व पाच अधिकारी, तर १२०० पेक्षा अधिक मतदार असलेल्या ठिकाणी एक केंद्राध्यक्ष व सहा कर्मचारी असतील असे शिंदे यांनी सांगितले.
PRESS NOTE
Subject:  Schedule for bye-election to fill one casual vacancy in the 45-Satara Parliamentary Constituency of Maharashtra– Regarding.
There is one vacancy in the 45-Satara Parliamentary Constituency of Maharashtra which needs to be filled up:
Sl.No.
Name of State
Number and Name of Parlimentary Constituency
1.     
Maharashtra
45  - Satara
 After taking into consideration various factors like local festivals, electoral rolls, weather conditions etc., the Commission has decided to hold bye-elections to fill this vacancy as per the programme mentioned as under: -

Poll Events
Schedule
Date of Issue of Gazette Notification
27.09.2019 (FRIDAY)
Last Date of Nominations
04.10.2019 (FRIDAY)
Date for Scrutiny of Nominations
05.10.2019 (SATURDAY)
Last Date for Withdrawal of candidatures
07.10.2019 (MONDAY)
Date of Poll
21.10.2019 (MONDAY)
Date of Counting
24.10.2019 (THURSDAY)
Date before which election shall be completed
27.10.2019 (SUNDAY)
==============================

निवडणूक आयुक्तांच्या पत्नींवर प्राप्तिकराची नजर

 देशाचे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या पत्नी नोवेल सिंघल लवासा यांच्यावर प्राप्तिकर विभागाने पाळत ठेवली आहे. करचुकवेगिरीच्या कथित आरोपाखाली ही पाळत ठेवली जात आहे.  नोवेल सिंघल लवासा या तब्बल १० कपन्यांच्या संचालक मंडळांतील सदस्य संचालक आहेत. त्यांनी भरलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रातील काही तपशीलासंदर्भात प्राप्तिकर विभागाने स्पष्टीकरण मागितले आहे. हा तपशील १० कंपन्याच्या संचालकपदासंदर्भात मागवण्यात आला आहे. नोवेल यांना वैयक्तिक मिळकतीबाबतही अधिक तपशील देण्यास सांगण्यात आले आहे. २०१५ ते २०१७ या काळातील कथित करचुकवेगिरीची तसेच संचालकपदांची चौकशी प्राप्तिकर विभाग करत आहे.  पीएम मोदींची क्लीन चिट यासह अनेक निर्णयांवर निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी नाराजी व्यक्त केली होती या पार्श्वभूमीवर होत असलेली कारवाई राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय बनला आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

====================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

====================================================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.