Sunday, 1 September 2019

भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

5 राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रपतींनी रविवारी महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये नवीन राज्यपाल नियुक्त केले. त्यामध्ये राजीव गांधी यांच्या कार्यकाळात शाहबानो प्रकरणी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देणारे आरिफ मोहम्मद खान यांना केरळचे राज्यपाल करण्यात आले आहे. तामिळनाडूत भाजप प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या डॉ. तमिलिसाई सुंदरराजन (58) यांना तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या सर्वात युवा विद्यमान राज्यपाल आहेत. यासोबतच कलराज मिश्र यांना राजस्थान आणि बंडारू दत्तात्रय यांना हिमाचल प्रदेशात पाठवण्यात आले आहे. काँग्रेसमध्ये राहिलेले आरिफ मोहंमद खान कित्येक वर्षांपासून राजकारणापूसन दूर होते. त्यांनी वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे उर्दूमध्ये भाषांतर केले होते. केंद्र सरकारच्या तीन तलाक विरोधी कायदा आणि कलम 370 हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयांचे त्यांनी कौतुक केले होते. ते 1984 च्या राजीव गांधी कॅबिनेटमध्ये मंत्री होते. त्यावेळी त्यांनी शाहबानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संसदेत कायदा बदलण्याचा विरोध केला होता. एवढेच नव्हे, तर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला होता. राष्ट्रपतींनी आता त्यांना केरळच्या राज्यपाल पदावर नियुक्ती दिली आहे.
भगत सिंह कोश्यारी उत्तराखंडचे दिग्गज भाजप नेते आहेत. त्यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी 1977 मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे. उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले. 2001 ते 2002 या कालावधीत ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2001 ते 2007 पर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम पाहिलं. 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते. भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. त्यांनी इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते शिक्षक आणि पत्रकारही होते. १९७५ मध्ये पिथोरागडहून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पीयूष' साप्ताहिकाचे ते संस्थापक तसेच प्रबंध संपादक होते. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==============================
=

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.