मदान यांनी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला
नवनियुक्त राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांचे स्वागत करताना आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर
राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून श्री. यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला असून मा. राज्यपाल यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. श्री. मदान 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली. त्याचबरोबर त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी श्री. मदान यांचे स्वागत केले. आयोगातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ज. स. सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ काल (ता. 4) पूर्ण झाला. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवपदी खांदेपालट केली होती. सेवानिवृत्तीला सहा महिने बाकी असतानाच मुख्य सचिव यूपीएस मदान यांना बाजूला करून त्यांच्या जागी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी लागली होती. मदान हे आॅक्टोबरमध्ये सेवानिवृत्त होणार होते, तर मेहता सप्टेंबरमध्ये. मेहता हे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू आहेत. सेवानिवृत्तीला अवघे १७५ दिवस बाकी असताना मुख्य सचिव म्हणून मदान बाजूला झाले. ही राज्याच्या प्रशासकीय इतिहासातील लक्षणीय बाब ठरली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एच. सहारिया सप्टेंबरमध्ये निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी नियुक्ती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मदान यांना दिल्याची चर्चा होती. दरम्यान, अजोय मेहता सप्टेंबर २०१९ मध्ये निवृत्त होणार आहेत, पण दरम्यान सरकार त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देऊ शकते. म्हणजेच निवडणुका होऊन नवी विधानसभा अस्तित्वात येईपर्यंत मेहता हे राज्याचे मुख्य सचिव असणार आहेत. मदान हे 1983 पासून भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. याआधी त्यांनी मुख्य सचिवपदाचीही धुरा देखील सांभाळली आहे. तसेच राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. एमएमआरडीए (MMRDA) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (MHADA) मुख्य कार्यकारी अधिकारी असा प्रदीर्घ अनुभव असणारे अधिकारी आहेत.
विधानसभा निवडणुकांचा राज्य निवडणूक आयोगाचा संबंध नसतो-
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रत्येक राज्यात मुख्य निवडणूक अधिकारी असे सचिव दर्चाचे मुख्य पद असते. व प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याचा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत असतात. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यस्तरीय निवडणूक प्रक्रिया राबविणारी स्वतंत्रपणे कार्यरत असलेली महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आहे या आयोगाचे कार्य केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया राबविणे असे असते. बहुतांश प्रसारमाध्यमांमधून नेहमी या स्वतंत्र यंत्रणेबाबत गल्लत निर्माण करणारे वृत्त प्रसिद्ध केले जाते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या संबंधी वृतंकानात देखील असंबध असे राज्य निवडणूक आयोगाच्या फलकाचे छायाचित्र प्रदर्शित केले जाते अशा वृतंकानामुळे सामान्य जनतेत संभ्रम निर्माण होऊन विनाकारण लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या संबंधी तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे केल्या जातात. तसेच गैरसमजुतीतून अनेक दाव्यांमध्ये राज्य निवडणूक आयोगाचे नाव नमूद केले जाते वास्तविकपणे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा कारभार असतो.निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया: सहारिया
निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने विविध सुधारणा हाती घेतल्या आहेत. या सुधारणांच्या माध्यमातून निर्भय, मुक्त व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केले. राज्य निवडणूक आयोगाच्या 25 वर्षेपूर्तीनिमित्त ‘राज्य निवडणूक आयोग: रौप्यमहोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे प्रकाशन श्री. सहारिया यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यावेळी उपस्थित होत्या. श्री. सहारिया यांचे 'निवडणूक सुधारणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका' या विषयावर यावेळी व्याख्यानही झाले.श्री. सहारिया म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने गेल्या 5 वर्षांच्या काळात व्यापक सुधारणा केल्या आहेत. त्यात उमेदवारांच्या शपथपत्रातील माहितीला व्यापक प्रसिद्धी देणे, उत्पन्नाचे स्रोत जाहीर करणे व त्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्धी देणे, ‘नोटा’ जिंकल्यास फेरनिवडणूक घेणे, खर्चाचा हिशेब न देणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करणे, लोकशाही पुरस्कार आदींचा समावेश आहे. भविष्यात यात निश्चितच आणखी भर घालावी लागेल.आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) जगदीश मोरे आणि पत्रकार सुनील चव्हाण यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. डॉ. बर्वे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संजय तांबट, प्रा. योगेश बोराटे, आयोगाचे कक्ष अधिकारी अतुल जाधव, श्री. मोरे, श्री. चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. श्री. निनाद भोंडे यांनी सूत्रसंचालन केले. राज्य निवडणूक आयोगाच्या 25 वर्षांच्या वाटचालीचा या ग्रंथात आढावा घेण्यात आला आहे.POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook===============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.