पुणे विभागातील 58 विधानसभा मतदारसंघात 1 कोटी 90 लाख 94 हजार 159 मतदार
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी पुणे विभाग सज्ज असून लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदारांनी मतदान करावे असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले आहे. पुणे विभागात 5 जिल्हयांमध्ये 58 विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी 7 विधानसभा मतदार संघ राखीव (SC) आहेत (पुणे जिल्हयातील 206-पिंपरी, 214-पुणे कॅन्टोनमेंट, सातारा जिल्हयातील 255-फलटण, सांगली जिल्हयातील 281-मिरज, कोल्हापूर जिल्हयातील 278-हातकणंगले, सोलापूर जिल्हयातील 254-माळशिरस व 247- मोहोळ). एकूण 58 विधानसभा मतदार संघांपैकी 21 मतदार संघ पुणे जिल्हा, सातारा व सांगली जिल्हा प्रत्येकी 8, कोल्हापूर जिल्हा 10 तर सोलापूर जिल्हा 11 विधानसभा मतदार संघ आहे. पुणे विभागातील 58 विधानसभा मतदार संघात 99,02,677 पुरुष मतदार आणि 91,90,990 स्त्री मतदार आहेत. तसेच 492 तृतीयपंथी मतदार असे एकूण 1,90,94,159 इतके मतदार आहेत. लोकसभा निवडणूक – 2019 वेळी 1,87,15,303 मतदार होते. प्रत्यक्षात 3,78,856 मतदारांची सद्यस्थितीत वाढ झालेली आहे. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा अंतिम दिनांक 04/10/2019 असून मतदारांना मतदार यादीमध्ये आवश्यक ते बदलाचे सर्व फॉर्म क्र. 6, 6अ, 7, 8 व 8अ हे या तारखेपूर्वी 10 दिवस अगोदरपर्यंत जमा करता येतील. या तारखेपर्यंत जमा झालेले अर्ज समावेशनासाठी पात्र राहतील. त्यानंतरच्या अर्जावर नंतर निर्णय घेतला जाईल. पुणे जिल्हयातील 1011 पहिल्या व दुस-या मजल्यावरील मतदान केंद्रांपैकी एकूण 890 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्याचे नियोजन आहे. पक्कया इमारतीत – 480 व तात्पुरत्या स्वरुपातील शेडमध्ये 410 मतदान केंद्रे स्थलांतरीत करण्याचे नियोजन आहे. तसेच फक्त 121 मतदान केंद्रे पहिल्या व दुस-या मजल्यावर अद्यापी असून त्यांना लिफटची सोय आहे. सदर ठिकाणी दिव्यांग व वयस्कर मतदारांना लिफटचा वापर करण्याबाबतचे नियोजन आहे. तसेच कोल्हापूर जिल्हयातील 7 व सोलापूर जिल्हयातील 2 पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्याचे नियोजन आहे. पुणे विभागात विधानसभा मतदार संघ निहाय सर्व 58 निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विधान सभा मतदार संघात किमान 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पूरग्रस्त बाधीत भागातील मतदान केंद्रे यांचे काही ठिकाणी नुकसान झाले असून ती नवीन ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी कार्यालये यांनी मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर केलेले आहेत. कोल्हापूर -61 (पूराने बाधीत झालेली 47, तळमजल्यावर स्थलांतरीत 7 व इतर कारणांमुळे 7, सांगली-40 पैकी पूराने बाधीत झालेली 37 व सातारा-35. सदर स्थलांतराला आयोगाकडून मंजूरीनंतर मतदारांना नवीन ठिकाणांची माहिती होण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रसिध्दी देण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. पुणे विभागात निवडणूक विषयक कामकाजासाठी 1,18,515 इतके अधिकारी आणि कर्मचारी यांची आवश्यकता आहे. तसेच एकूण 1,40,362 अधिकारी/ कर्मचारी उपलब्ध करुन देणेत आले आहेत. तसेच विविध कामांसाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. विभागात 1207 व्हिडिओग्राफर्स, 887 सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केले आहेत. 264 भरारी पथके, 278 एसएसटी म्हणजेच स्थिर पथके, 189 व्हिडिओ सर्व्हायलन्स पथके आणि 70 व्हिडिओ पाहणी पथके तर 73 लेखापथके नियुक्त करण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार त्यात कमी /वाढ केली जाईल. सर्व मतदान केंद्रांवर मा. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विविध प्रकारच्या आश्वासीत सुविधा AMF देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत. रॅम्प, पाणी, फर्निचर, वीज, प्रसाधन गृह, सायनेजेस (फलक), शेड, मदतकेंद्र, पाळणाघर इ. पुणे विभागामध्ये एकूण 1,28,518 दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आलेली असून लोकसभेशी तुलना करता (94,292) 34,226 ने वाढ झालेली आहे. जिल्हा परिषद कार्यालयांनी दिव्यांग उन्नत अभियांनातर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण केले आहे. तसेच अपंग कल्याण आयुक्तालयाकडून, दिव्यांग व्यक्तींची सांख्यिकीय माहिती प्राप्त करुन सर्व जिल्हाधिकारी यांना देणेत आलेली आहे. एकूण मतदान स्थळे (PSL) 10,266 असून आजअखेर व्हिल चेअरची उपलब्धता 8,110 आहे. तसेच प्रत्येक मतदार स्थळावर किमान 1 व्हिलचेअर उपलब्ध करुनप देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच दिव्यांगांना मदतीसाठी 17,852 स्वयंसेवक उपलब्ध आहेत. तसेच त्यांना विविध प्रकारच्या आश्वासीत सुविधा (AMF) उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. दिव्यांग व्यक्ती,वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्टयादुर्बल व्यक्ती यांना मतदानासाठी प्रवृत्त करून त्यांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवकांचीनियुक्तीकरण्याचे नियोजन आहे. तसेच गरजेनुरुप वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. निवडणूक कालावधीत आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत सी-व्हिजिल या नव्या मोबाईल निर्मिती मा. भारत निवडणुक आयोगाच्यावतीने करण्यात आली आहे. तक्रारीवर अवघ्या 100 मिनीटात कार्यवाही होणार आहे. तक्रारी नोंदवण्यासाठी नागरिक ´ÖÖ. भारत निवडणुक आयोगाच्या मुख्य वेबसाइटचा वापर करु शकतात. तसेच 1800111950 किंवा राज्य संपर्क केंद्रावर 1950 या क्रमांकावर राष्ट्रीय संपर्क केंद्राला फोन कॉल करु शकतात. नागरिक NGRS व्दारे ही तक्रार दाखल करु शकतात.शस्त्र परवान्याबाबत छाननी करुन जी शस्त्रे जमा करणे आवश्यक असतील, ती जमा करुन घेणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. अवैध मद्यविक्री, वाहतूक यावर छापे टाकून जप्त करणे त्याचप्रमाणे परवानाधारक मद्य विक्री दुकानांमधून विकल्या जाणा-या मद्याच्या खपावर लक्ष ठेवणे तसेच ज्या ठिकाणी खप जादा होत असल्याचे आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल. मतदानाच्या दिवशी आणि तत्पूर्वी 48 तास आधी ड्राय डे म्हणून घोषित केला जातो. निवडणूक संबंधी विविध गुन्हयांसाठी IPC मधील कलम 171 व त्यातील पोट कलमांतर्गत गुन्हे दाखल करणे. संवेदनशील क्षेत्रामध्ये CRPF व पोलीसांचे मार्च काढणे. विविध भरारी पथके व स्थिर पथकांमार्फत निवडणूक काळातील अवैध पैसे, दारु, शस्त्र वाहतुकीची तपासणी करुन नियंत्रण आणणे. CRPC च्या कलम 107, 108, 109, 110 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करणे, बंधपत्र (बाँड) घेणे. अवैध शस्त्र साठा /स्फोटके जप्त करणे. अवैध शस्त्र निर्मिती ठिकाणावर छापे घालून जप्ती करणे. परवानाधारक शस्त्र जमा करण्याकरीता समितीच्या सल्ल्याने शस्त्र परवाने जमा करुन घेणे. शस्त्र जमा करुन घेणे किंवा परवाने रद्द करणे इ. अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करणे. व्हलनरेबल वाडी/ पाडे/ पॉकेट इत्यादी निश्चित करणे, त्या ठिकाणच्या मतदारांचे मनोबल वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांनी अशा ठिकाणांना भेटी देणे आदि. कार्य केले जाणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडून प्रसारित करण्यात येणाऱ्या कोणत्याही माध्यम प्रकारातील जाहिरात मजकूरांचे प्रमाणीकरण करण्यासाठी तसेच या मजकुरावर देखरेख ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समिती (MCMC) स्थापन करण्यात येत आहे. सैन्यातील सर्व्हिस वोटर्स साठी ईटीपीबीएस म्हणजेच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्स्मीटेड पोस्टल बॅलेट सर्व्हीस ही प्रणाली यावेळी नव्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याव्दारे सैन्यातील मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. निवडणूक विषयक कामकाजात असणा-या मतदारांना मतदान करण्यासाठी Election Duty Certificate (EDC) or Postal Ballot (PB) या सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. SVEEP – मा. भारत निवडणूक आयोग आणि मा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पुणेविभागात सिस्टेमॅटीक वोटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्टोरल पार्टीसिपेशन म्हणजेच स्वीप याकार्यक्रमाची अंमलबजावणीकरण्यात येत आहे. VAF (व्होटर अवेअरनेस फोरम)- 981 या द्वारे ज्या मतदार संघात कमी मतदान झाले आहे त्यावर लक्ष ठेऊन मतदान वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येतील. इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन म्हणजेच इव्हीएम आणि व्होटर व्हेरिफीएबल पेपर ऑडीट ट्रेल म्हणजेच व्हीव्हीपॅट मशिन बाबत जागृती होण्यासाठी तज्ञ अधिकाऱ्यांमार्फत व्हीव्हीपॅट जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. SVEEP- मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीमध्ये ज्या मतदान केंद्रांवर कमी मतदान झालेले आहे अशा मतदान केंद्रांची माहिती घेण्यात आली आहे. अशा मतदान केंद्रांवर जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी याठिकाणी मतदान जनजागृतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. असे केल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल. नव्याने नोंदणी झालेल्या नव मतदारांसाठी निवडणूक आयोगाकडून EPIC कार्ड प्रशासनामार्फत नवमतदारांपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. विशेषत: सांगली व कोल्हापूर जिल्हयात पुरामुळे बाधीत झालेलया गावांमधील मतदारांना अनुक्रमे सांगली – 4,35,422 व कोल्हापूर -1,56,060 मध्ये डयुप्लिकेट EPIC कार्ड देण्याचे नियोजन आहे. निवडणूक कामकाजात वापरण्यात येणा-या EVM व VVPAT मशिनची वाहतूक करताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्णवेळ देखरेख करण्याकरता सर्व क्षेत्रिय / झोनल ऑफिसर यांच्या वाहनांवर GPS सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच वाहतुकीच्या अनुषंगाने SOP ठरवून देणेच्या सूचना दिलेल्या आहेत. राज्यघटनेने आपल्याला मतदान हा सर्वात मौल्यवान हक्क दिला आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावायलाच हवा. मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या सद्सदविवेक बुद्धीने मतदान करावे.असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी अद्ययावत मतदार यादीनुसार तुलनात्मक तपशील-
18 ते 19 वयोगटातील तरुण मतदारांची 90,782 नव्याने नोंद झालेली असून लोकसभेशी तुलना करता ही वाढ 24% असून एकूण त्या वयोगटातील मतदारांशी तुलना करता हे प्रमाण 43.29 % आहे.तसेच 20 ते 29 वयोगटातील 1,65,072 नव मतदारांची नोंद झालेली असून लोकसभेशी तुलना करता ही वाढ 4.60% असून एकूण त्या वयोगटातील मतदारांशी तुलना करता हे प्रमाण (71.07 %) आहे.
पुणे विभागाचे PER (फोटो इलेक्ट्रोल रोल) मधील फोटोचे प्रमाणे – 98.38 % आहे.
पुणे विभागाचा मतदार यादीचा जेंडर रेशो (पुरुष-स्त्री प्रमाण) -935 आहे.
पुणे विभागातील मतदारांकडे असलेले EPIC ची टक्केवारी 98.51 % आहे.
मतदानासाठी खालीलप्रमाणे ओळखपत्र आवश्यक-
(मतदारांना जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक ओळखपत्र दिले जाते, हे ओळखपत्र नसेल तर)1) पासपोर्ट,
2) वाहन चालक परवाना
3) केंद्र/ राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचा-यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र
4) बँक/ पोस्ट ऑफिसद्वारे जारी केलेल्या फोटोसह पासबुक
5) पॅन कार्ड
6) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड
7) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) जॉब कार्ड
8) श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
9) फोटोसह पेंशन दस्तऐवज
10) खासदारांना / आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र
11) आधार कार्ड
या कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र अथवा ओळखपत्र मतदानासाठी ग्राहय धरले जाईल.
पुणे विभागातील दृष्टिक्षेप-
पुणे विभागात एकूण 10266 मतदान स्थळे (PSL) आहेत.एकूण 20198 मतदान केंद्रे (PS) आहेत.
जिल्हानिहाय मतदान केंद्रे –
पुणे- 7922,
सातारा – 2978,
सांगली – 2435
कोल्हापूर – 3342
सोलापूर – 3521 मतदान केंद्रे आहेत.
विविध कक्ष
1) आचार संहिता अंमलबजावणी कक्ष.2) जिल्हा संपर्क कक्ष.
3) मदत व तक्रार निवारण कक्ष
4) निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष.
5) माध्यम समन्वय कक्ष
असे कक्ष स्थापन करुन या कक्षांमार्फत निवडणूकीचे काम नियोजनबध्द पार पाडले जाते.
Nodal Officer- विविध विषयांबाबत 15 नोडल अधिकारी यांची नियुक्ती-
1) Nodal Officer for Manpower Management2) Nodal Officer for EVM Management
3) Nodal Officer for Transport Management.
4) Nodal Officer for training Management
5) Nodal Officer for Material Management
6) District Nodal Officer for implementing MCC
7) Nodal Officer for Expending Monitoring
8) Nodal Officer for Observers
9) Nodal Officer for law and Order, VM and District- Security Plan
10) Nodal Officer for Ballot paper/ Dummy ballot
11) Nodal Officer for Media/ Communication
12) Nodal Officer for Computarization/ IT.
13) Nodal Officer for SVEEP
14) Nodal Officer for Help-line and Complaints Redressal.
15) Nodal Officer for SMS Monitoring and Communication Plan.
निवडणूक आयोगाने, महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 ची घोषणा दिनांक 21/09/2019 रोजी केली असून राज्यात आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे.
निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
1) निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करणेचा दिनांक 27/09/2019 (शुक्रवार)2) नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 04/10/2019 (शुक्रवार)
3) नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 05/10/2019 (शनिवार)
4) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 07/10/2019 (सोमवार)
5) मतदानाचा दिनांक 21/10/2019 (सोमवार)
6) मतमोजणी दिनांक 24/10/2019. (गुरुवार)
7) निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 27/10/2019 (रविवार)
==================================
आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – नवल किशोर राम
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून या आचारसंहितेचे सर्व विभाग प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज सर्व विभागप्रमुख, नोडल अधिकारी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, रेल्वे, बँकाचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी राम बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्यासह सहायक निवडणूक अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा निवडणूक अधिकारी राम म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घेण्याकरीता आचारसंहितेचा सखोल अभ्यास करावा. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी-व्हीजल या मोबाईल app वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सुविधा व सुचनांचेही प्रत्येकाने पालन करुन ही निवडणूक सर्वांनी एकत्रित मिळून शांततेत पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीची अंमलबजावणी करतांना आदर्श आचार संहितेचे उल्लघंन होणार नाही, याची काळजी घेवून आचार संहितेचे पालन करावे. तसेच निवडणूकीदरम्यान राजकीय पक्षांनी आपले प्रचार कार्य करतांना प्रचाराच्या विविध माध्यमाचा वापर करण्यापूर्वी ते प्रमाणित करुन घ्यावे. प्रचारावर होणाऱ्या सर्व खर्चाचे विवरण सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले. राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल बँका, तसेच सहकारी बँका निवडणूक काळात भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणेच आर्थिक व्यवहार होतील. यावर विशेष लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले की, बँकांनी उमेदवारांची खाती प्राध्यान्यक्रमाने उघडून घेवून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 10 लाखापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहाराची माहिती महाव्यवस्थापक, आयकर विभाग यांच्याकडे नोंदवावी. बँकांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करतांना सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. यावेळी विविध विभागाचे प्रमुख, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, बँकाचे अधिकारी, नोडल अधिकारी, विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणुका
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांना आपापल्या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत. निवडणुकीची अधिसूचना येत्या शुक्रवारी (दि. २७) प्रसिद्ध झाल्यानंतर चार ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी पाच ऑक्टोबरला होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सात ऑक्टोबरपर्यंत आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून, २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होईपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे काम पाहणार आहेत.विधानसभा मतदारसंघ आणि अधिकारी
वडगाव शेरी - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुखवडगावशेरी - मीनल भांबरे (सहायक निवडणूक निर्णय अधिकारी)
शिवाजीनगर - शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे
शिवाजीनगर - अमर रसाळ (सहायक निवडणूक निर्णय अधिकारी)
कोथरूड - मुद्रांक शुल्क विभागाचे उपअधिकारी प्रकाश अहिरराव
कोथरूड - दीप्ती रिठे (सहायक निवडणूक निर्णय अधिकारी)
खडकवासला - हवेली उप विभागीय अधिकारी सचिन बारावकर
खडकवासला - सुनील कोळी (सहायक निवडणूक निर्णय अधिकारी)
पर्वती - जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड
पर्वती - रंजना ढोकळे (सहायक निवडणूक निर्णय अधिकारी)
हडपसर - जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे
हडपसर - स्मिता पवार (सहायक निवडणूक निर्णय अधिकारी)
पुणे कँटोन्मेंट - भूसंपादन अधिकारी नीता सावंत-शिंदे
पुणे कँन्टोन्मेट - सुरेखा दिवटे (सहायक निवडणूक निर्णय अधिकारी)
कसबा - पुणे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख
कसबा पेठ - तृप्ती कोलते पाटील (सहायक निवडणूक निर्णय अधिकारी)
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध
VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज
भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण
युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विधानसभा मतदारसंघनिहाय कल
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध -
(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.