Friday 27 September 2019

आजपासून विधानसभा निवडणूक महासंग्राम सुरु; उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) कसा भरावा व आवश्यक कागदपत्रे



आजपासून राज्यातील विधानसभा निवडणूक महासंग्राम सुरु होत आहे. 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. भाजप-शिवसेना युतीचे जागावाटपाचा निर्णय झालेला नसून इच्छुकांची मात्र घालमेल सुरु आहे. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे जागावाटप तयारी पूर्ण झाली आहे मात्र युतीच्या जागावाटपावर उमेदवारी निवडीचा निकष अवलंबून असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिखर बँक घोटाळा प्रकरणी इडीकडून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर दाखल गुन्हा व त्याचे पुरेपूर राजकीयदृष्ट्या आंदोलनात्मक लाभ उठवण्याचा होत असलेला राष्ट्रवादीचा प्रयत्न या राजकीय घडामोडींच्या धामधुमीत आजपासून राज्यातील विधानसभा निवडणूक महासंग्राम सुरु होत आहे. 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.  निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात उमेदवारांसह पाच व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार असून या परिसरात मिरवणूक अथवा शक्ती प्रदर्शन करता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारी सुरुवात होणार आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दाखल झालेल्या अर्जांची 5 ऑक्टोबर रोजी छाननी होणार असून 7 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. माघारीची मुदत संपल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असून दुपारी तीननंतर चिन्हवाटपही केले जाणार आहे. बहुतांश मतदारसंघांत अद्याप पक्षीय उमेदवार निश्चित झालेले नाहीत. काही पक्षांनी काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरणा-यांची संख्या कमी राहण्याची शक्यता असते. शनिवार आणि रविवारी अमावास्या आहे. अनेकांनी अर्ज भरण्यासाठी मुहूर्तही शोधले आहेत. यामुळे सोमवारपासून अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. इच्छुकांना उमेदवारी अर्ज सादर करताना तो परिपूर्ण करावा लागणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर करताना कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात उमेदवाराला त्याच्यासोबत केवळ 4 व्यक्तींनाच निवडणूक कार्यालयात नेता येणार आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज सादर करताना आपल्या प्रतिज्ञापत्रात त्याच्यावरील दाखल व प्रलंबित किंवा सिद्ध असलेल्या फौजदारी गुन्ह्याचा समावेश केलेला आहे, त्यांनी याबाबतची विहित नमुन्यातील माहिती जास्त खपाच्या स्थानिक वृत्तपत्रात मतदानाच्या दिवसापासून दोन दिवस अगोदरपर्यंत किमान तीन वेळा स्वत:हून सर्वांच्या माहितीसाठी स्वखर्चाने प्रसिद्ध करावयाची आहे. त्याचप्रमाणे ज्या राजकीय पक्षाने असे उमेदवार पुरस्कृत केले असतील, त्यांनीही त्यांची विहित पद्धतीने प्रसिद्धी करणे आवश्यक आहे.

परिपूर्ण नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) सादर करावा लागणार-

* उमेदवाराला विहित नमुन्याप्रमाणे परिपूर्ण उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे.
* उमेदवाराचा स्टॅम्प साईज 5 फोटो (छायाचित्र) (2 सें.मी. द 2.5 से.मी.)
*  उमेदवारी अर्जाची मूळ प्रत व झेरॉक्स तीन प्रती
* नमुना 26 मधील परिपूर्ण भरलेले रु. 100 मुद्रांकावरील प्रतिज्ञापत्र
* उमेदवारी पत्रात 1 (भाग 1) (मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्य पक्षाचे उमेदवार) 
* किंवा 10 (भाग 2) (अपक्ष व इतर उमेदवार) सूचकांची मतदार यादीतील अनुक्रमांक यादीचा भाग दर्शविणारी मतदार यादीची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
* नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारांचा सुचक हा त्याच मतदारसंघातील असणे आवश्यक आहे
* अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवारासाठी 10 हजार रुपये 
* अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारासाठी 5 हजार रुपये आहे.
* ही अनामत रक्कम भरल्याची पावती उमेदवारी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
* अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवार असेल तर सक्षम प्राधिका-यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत व साक्षांकित प्रत उमेदवारी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
* उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते काढणे बंधनकारक आहे. बँक खात्याचा तपशील उमेदवारी अर्जासोबत पासबुक झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.
* अशा स्वतंत्र बँक खात्याचा तपशील उमेदवारी अर्जात नमूद करावा लागणार आहे.
* एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.
* उमेदवारी अर्ज परिपूर्ण असल्याची खात्री करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहणार आहे.
* निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांना देण्यात आलेल्या विहित नमुन्यातील खर्चाच्या नोंदवहीमध्ये आपला दैनंदिन खर्च नोंदविणे बंधनकारक आहे.
* भारत निवडणूक आयोगाकडील खर्च निरीक्षक यांनी विहित केलेल्या ठिकाणी व वेळी त्याचप्रमाणे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे प्रतिनिधीस खर्चाच्या नोंदवह्या व इतर कागदपत्रे तपासणीस उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

विधानसभा निवडणूक कार्यक्रम

* अर्ज भरण्याची तारीख  : 27 सप्टेंबर
* अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर
* अर्ज छाननी : 5 ऑक्टोबर
* अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 7 ऑक्टोबर
* मतदानाची तारीख : 21 ऑक्टोबर
* निकाल : 24 ऑक्टोबर

मतदान आणि निकाल

मतदान - 21 ऑक्टोबर
निकाल- 24 ऑक्टोबर

2014 मधील पक्षीय बलाबल

भाजप - 122 जागा
शिवसेना - 63 जागा
काँग्रेस - 42 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस - 41 जागा
इतर - 20 जागा
एकूण - 288 जागा

2014 च्या विधानसभा निवडणुकीत पटकावलेल्या विभागवार जागा-

पश्चिम महाराष्ट्र (70) – भाजपा 24, शिवसेना 13, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 19, इतर 04
विदर्भ (62) – भाजपा 44, शिवसेना 04, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 01, इतर 03
मराठवाडा (46) – भाजपा 15, शिवसेना 11, काँगेस 09, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 03
कोकण (39) – भाजपा 10, शिवसेना 14, काँगेस 01, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 06
मुंबई (36) – भाजपा 15, शिवसेना 14, काँगेस 05, राष्ट्रवादी काँग्रेस 00, इतर 02
उत्तर महाराष्ट्र (35) – भाजपा 14, शिवसेना 07, काँगेस 07, राष्ट्रवादी काँग्रेस 05, इतर 02
एकूण (288) – भाजपा 122, शिवसेना 63, काँगेस 42, राष्ट्रवादी काँग्रेस 41, इतर 20
================================
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2019 करिता पुढील आठवड्यात आचारसंहिता व कार्यक्रम जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची जय्यत पूर्वतयारी सुरु केलेली असून उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व माहितीची विचारणा केली जात आहे. विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) कसा भरावा व आवश्यक कागदपत्रे कोणती असतात याबाबत प्राब संस्थेकडून मार्गदर्शन केले जाते. प्रबोधनात्मक उपक्रम म्हणून राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांना सविस्तरपणे माहिती देण्यात येत आहे. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र विहीत नमुना 2 अ मध्ये सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे. सदर प्रस्तावक हा संबंधित लोकसभा मतदारसंघाचा मतदार असावा. स्वतंत्र व मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षाचा उमेदवार असल्यास त्यांना 10 प्रस्तावक असणे आवश्यक आहे. व तो नामनिर्देशनपत्र ज्या लोकसभा मतदारसंघातून भरणार आहे त्या लोकसभा मतदारसंघातील मतदार असणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार विहीत प्रपत्रातील प्रपत्र 26 (भाग-अ, भाग-ब आणि सत्यापन)चे शपथपत्र शपथआयुक्त किंवा प्रथमश्रेणी दंडाधिकारी किंवा लेख प्रमाणक यांच्यासमोर शपथबद्ध करणे आवश्यक आहे. शपथपत्रातील सर्व रकाने भरणे आवश्यक असून, कोणताही रकाना रिक्त ठेवू नये. कोणत्याही बाबींच्या संबंधात कोणताही रकाना न लिहिता रिक्त ठेवू नये. निरंक (Nil) किंवा लागू नाही (Not Applicable)) किंवा माहीत नाही (Not Known) असे त्या रकान्यामध्ये नमूद करावे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार शपथपत्रात भाग ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ई-मेल आयडी, संपर्क दूरध्वनी क्रमांक, समाजमाध्यम खाते असल्यास नमूद करणे आवश्यक आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावयाची आहे, त्या मतदारसंघात उमेदवारांचे नाव नसल्यास ज्या मतदारसंघातील मतदार यादीत उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारसंघातील मतदार यादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशन पत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, मान्यता प्राप्त पक्षाचा उमेदवार असल्यास अ व ब फॉर्म नामनिर्देशन पत्रासोबत किंवा नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या अंतिम दिनांकास दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अमानत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी 25 हजार व अनुसूचित जाती - जमातीसाठी 12 हजार 500 रुपयेप्रमाणे आवश्यक आहे. अनामत रक्कम रोख किंवा रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, शासकीय कोषागार येथे चलनद्वारे भरावी, धनादेश स्वीकारले जाणार नाही. नामनिर्देशन पत्रासोबत रोख रक्कमेची पावती, चलन सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चाचे नियंत्रण सुलभ व्हावे, म्हणून उमेदवाराने नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या किमान एक दिवस अगोदर बँकेत स्वत:चे नावे व फक्त निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे आवश्यक आहे व सदर खाते क्रमांकाची माहिती नामनिर्देशन पत्रासोबत लेखी स्वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. अखेरच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जातात. एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकते. तसेच एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशन पत्र सादर करु शकते. नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवार व इतर जास्तीत - जास्त चार व्यक्ती असे एकूण जास्तीत-जास्त पाच व्यक्ती निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षात हजर राहू शकतात. नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती कमाल तीन वाहनांच्या मर्यादेस अधीन राहून निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परिसरात वाहने आणू शकतात.

विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-

[?] नामनिर्देशन पत्र विहीत नमुना २ अ 

[?] नामनिर्देशन पत्रासोबत विहीत प्रपत्रातील प्रपत्र २६ (भाग-अ, भाग-ब आणि सत्यापन) चे शपथपत्र 

[?] मतदार यादीत उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारसंघातील मतदार यादीची प्रमाणित प्रत

[?] राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, मान्यता प्राप्त पक्षाचा उमेदवार असल्यास अ व ब फॉर्म

[?]  मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र

[?] नामनिर्देशन पत्रासोबत अनामत रोख रक्कमेची पावती, चलन सादर करणे आवश्यक आहे.

[?] बँकेत स्वत:चे नावे फक्त निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे व सदर खाते क्रमांकाची माहिती नामनिर्देशन पत्रासोबत लेखी स्वरुपात देणे आवश्यक आहे.

[?] उमेदवारचे फोटो/रहिवास पुरावा/पॅन कार्ड साक्षांकीत प्रत

[?] उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे.

[?] अपक्ष उमेदवार असल्यास त्यांना १० प्रस्तावक असणे आवश्यक आहे.

[?] एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकते.

[?] एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशन पत्र सादर करु शकते.

[?]  नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवार व इतर जास्तीत - जास्त चार व्यक्ती हजर राहू शकतात.

[?]  नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीना कमाल तीन वाहनांची मर्यादा आहे.

विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-
Assembly Election 2019
LIST OF DOCUMENTS TO BE SUBMITED
1.      Nomination Form 2A
2.      Political Party Form A and Form B
3.      Affidavit - Form 26 (100 Stamp Paper Notarized including Annexures)
4.      Declaration of Candidate / Election Agent for Photo
5.      Deposit Receipt
6.      Election expenditure letter / Xerox copy of Pass Book
7.      Photo – 5 Colour Copies (mention name and Sign overleaf of Photo)
8.      Candidate 2 colours photos in envelope (mention name and sign on envelope and overleaf of photo)
9.      Certify copy of Candidate Voter List Letter
10.   Pan of Candidate
11.   Adhar Card of Candidate
12.   Election Card of Candidate
13.   Copy of All No Due Certificate (Candidate)
14.   Certified copy of Proposer’s in Voters List – 10
15.   ID Proof and Voter Card of Proposer
16.   Appointment of Election Agent Form
17.   Election Agent ID Proof and Residence Proof Copy and Five Photos/ Certify copy of Voter List Letter
18.   Candidate / Election Agent Specimen Form
19.   Name on Ballot Paper letter
20.   Supported documents copies – Not to Attach (Personal Bank details, policy details, liability details)

Check List to be collected after submission of form
1.    Rules Hand book for election commission
2.    Register of Expenditure / Rules / Price List
3.    Polling Agent appointment Form
4.    Officers List of Contacts with Designation
5.    Various permission letter formats
Mr. Chandrakant Bhujbal (Political advisor)
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
निवडणूक खर्चाचे नियंत्रण/देखरेख/समन्वय व विहित नमुन्यात दैनंदिन सादर करणे सल्ला व सेवेसाठी  अथवा अधिक माहितीसाठी प्राब संस्थेशी संपर्क करा- 
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.