Wednesday, 18 September 2019

पक्षांतर रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून 5 उमेदवारांची घोषणा

उमेदवारांची नावे जाहीर करण्यात राष्ट्रवादी अग्रसेर

संभाव्य इच्छूक उमेदवारांची सत्ताधारी पक्षांकडून निवडणुकांच्या तोंडावर होणारी पळवापळवी रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीडमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाच उमेदवार जाहीर केले. बीडमध्ये काका-पुतण्याची लढाई पहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. म्हणजे जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी लढाई होईल. तर, महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या परळी मतदारसंघातून पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात लढत पाहायला मिळेल. पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर केली. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेवराई-  विजयसिंह पंडित, केज- नमिता मुंदडा, बीड-  संदीप क्षीरसागर, माजलगाव- प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवारांनी जाहीर केले. एकमेव आष्टी या मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु असे शरद पवारांनी सांगितले. शरद पवारांनी बीडचे उमेदवार जाहीर केल्याने आता बीड जिल्ह्यात रंगतदार लढती होणार आहेत. अन्य पक्षाच्या विद्यमान आमदारांना तिकीट मिळाल्यास नात्यागोत्यातच लढती होण्याची चिन्हं आहेत. बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेली राष्ट्रवादी अस्तित्वाची लढाई लढत आहे. कारण, 2014 ला बीडमध्ये राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला, ते जयदत्त क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने जिल्ह्यातील सर्व सहा जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. 

पहिले पाच उमेदवार जाहीर-

गेवराई – विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी)
माजलगाव – प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)
बीड – संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
केज – नमिता मुंदडा (राष्ट्रवादी)
परळी – धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
आष्टी – 

2014 मध्ये निवडून आलेले विद्यमान आमदार

गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप)
माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप )
बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना)
आष्टी – भीमराव धोंडे (भाजप)
केज – संगिता ठोंबरे (भाजप)
परळी – पंकजा मुंडे (भाजप)

उमेदवारी निवडीत राजकीय घराण्यांना महत्व राष्ट्रवादीने दिले असून 3 माजी मंत्र्यांच्या घरातील सदस्यांना संधी दिली असून दोन उमेदवारी बड्या नेत्यांच्या पुतण्यांना देऊन कुटुंबात राजकीय स्पर्धात्मक चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्थापित घराण्यांना उमेदवारी निवडीत प्राधान्य देण्याची भूमिका राष्ट्रवादी पक्षाने पहिल्या जाहीर यादीतून अधोरेखित केलेली आहे. केजमधून नमिता मुंदडा या माजीमंत्री विमल मुंदडा यांच्या स्नुषा असून उच्चशिक्षित आहेत. 2014 साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. स्थानिक राजकारणात सोनावणे यांचा त्यांना विरोध आहे. या विरोधामुळेच त्यांचा कल भाजपकडे होता. मुंदडा परिवार पुन्हा भाजपकडे गेल्यास नुकसानीचा अंदाज माहिती असल्याने केज विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी स्पर्धा व संभाव्य पक्षांतर रोखण्यासाठीच नमिता मुंदडा यांची उमेदवारी जाहीर करण्याची घाई केली असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. या मतदारसंघातील विद्यमान आमदारांवर नुकताच गुन्हा दाखल झाल्याने अन्य उमेदवारांना संधी देण्याच्या हालचाली भाजपकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा उमेदवारी जाहीर करण्याचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या अतिशय योग्य असल्याचे मानले जात आहे. दिवंगत लोकनेत्या माजी आरोग्यमंत्री डॉ. विमलताई मुंदडा यांची सून नमिता अक्षय मुंदडा यांनी पॅरिस येथील विद्यापीठातून वास्तू विशारद (आर्किटेक्‍ट) अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी मतदारसंघात विधानसभेची तयारी करतानाच ही पदवी प्राप्त केली आहे. पॅरिस येथील विद्यापीठातून "मास्टर्स इन इंजिनिअरींग ऍन्ड आर्किटेक्‍चर ' या अभ्यासक्रमासाठी जगभरातून 35 तर देशातील दोन विद्यार्थ्यांमध्ये नमिता मुंदडा पात्र ठरल्या होत्या. एकिकडे विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी मतदार संघात तयारी करतानाच महिन्यातील सात दिवस विद्यापीठात बंधनकार असलेली हजेरी पूर्ण करणे असे दुहेरी कसरत त्यांनी पेलली आहे. नमिता मुंदडा यांनी डिझाईनचे केलेल्या कामाचे "इनसाईड आउटसाईड' या स्थापत्य क्षेत्रातील नामांकित जुन्या राष्ट्रीय मासिकाने कौतुकही केलेले आहे. पदवी मिळविण्यासाठी पॅरिस विद्यापीठात महिन्यातले किमान सात दिवस हजेरी आणि आणि इकडे मतदार संघातील कायम जनसंपर्क तुटू न देण्याची किमया त्यांनी पार पाडली आहे. त्यामुळे त्यांना भाजपकडूनही संधीची आशा होती. दरम्यान आक्रमकता दर्शवण्यासाठी बेताल वक्तव्य करून नेतृत्व टिकवण्याची कसोटी करणारे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांची विधानपरिषदेची मुदत २०२२ पर्यंत आहे. दुसऱ्या उमेदवाराला संधी न देता निवडून येण्याची कार्यक्षमता सिद्ध करा असा आदेशच त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना दिला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तर नुकतेच पक्षांतर केलेले मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना रोखून ठेवण्यासाठी त्यांच्या पुतण्याला संदीप क्षीरसागरला बीड मतदारसंघातून उमेदवारी देऊन राजकीय घराण्यांना प्राधान्य दिले आहे. संदीप क्षीरसागर हे उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण पुण्यात झाले आहे. 2004 पासून ते काका जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत राजकारणात सक्रिय झाले. सलग दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य असलेल्या संदीप यांनी शिक्षण आणि आरोग्य सभापती म्हणून काम पाहिले आहे. काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात नगरपालिका निवडणूक लढवत, 20 नगरसेवक निवडून आणले तर तीन जिल्हा परिषद सदस्य आणि सात पंचायत समिती सदस्य त्यांनी निवडून आणले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात आणि काका जयदत्त क्षीरसागर यांच्यात वाद सुरु झाले. तसेच गेवराई व माजलगाव विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्र्यांच्या सदस्यांना उमेदवारीत स्थान देण्यात आलेले आहे. यामध्ये  गेवराईतील विजयसिंह पंडित हे माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांचे चिरंजीव असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. तर माजलगावमधील प्रकाश सोळंके हे माजीमंत्री असून सुंदरराव सोळंके यांचे पुत्र आहेत. कारखानदार असून तीन वेळा आमदार म्हणून काम पाहिले आहे.
========================================

विधानसभा निवडणूक २०१९ करिता आघाडीचे संभाव्य जागा वाटप

[?]  89 कॉंग्रेस संभाव्य जागा निश्चित

[?]  80 राष्ट्रवादी संभाव्य जागा निश्चित

[?]  51 इतर मित्र पक्षांना जागा व नंतर वाटाघाटी (बहुतांश पक्षांतर मतदारसंघ) 

[?]  220 जागांवर दोन्ही पक्षांची सहमती

[?]  68 जागांवर दोन्ही पक्षांचे नेते वाटाघाटी करणार 

[?]  288 एकूण जागा

विधानसभा निवडणूक २०१९ करिता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची संभाव्य जागावाटप यादी-

संघ क्र.
सहमती मतदारसंघ
संभाव्य जागा
२०१४ ची मते
राजकीय सद्यस्थिती
1
Akkalkuwa 
कॉंग्रेस
64410
विद्यमान आमदार
4
Nawapur 
कॉंग्रेस
93796
विद्यमान आमदार
5
Sakri 
कॉंग्रेस
74760
विद्यमान आमदार
6
Dhule Rural
कॉंग्रेस
119094
विद्यमान आमदार
7
Dhule City
राष्ट्रवादी
44852
क्रमांक २ मते
8
Sindkheda
राष्ट्रवादी
50636
क्रमांक २ मते
9
Shirpur 
कॉंग्रेस
98114
विद्यमान आमदार
11
Raver
कॉंग्रेस
55962
क्रमांक २ मते
14
Jalgaon Rural
राष्ट्रवादी
52653
क्रमांक २ मते
16
Erandol
राष्ट्रवादी
55656
विद्यमान आमदार
17
Chalisgaon
राष्ट्रवादी
72374
क्रमांक २ मते
18
Pachora
राष्ट्रवादी
59117
क्रमांक २ मते
19
Jamner
राष्ट्रवादी
67730
क्रमांक २ मते
21
Malkapur
कॉंग्रेस
49019
क्रमांक २ मते
22
Buldhana
कॉंग्रेस
46985
विद्यमान आमदार
23
Chikhli
कॉंग्रेस
61581
विद्यमान आमदार
26
Khamgaon
कॉंग्रेस
64758
क्रमांक २ मते
28
Akot
कॉंग्रेस
38675
क्रमांक २ मते
29
Balapur
कॉंग्रेस
34487
क्रमांक २ मते
30
Akola West
राष्ट्रवादी
26981
क्रमांक २ मते
33
Risod
कॉंग्रेस
70939
विद्यमान आमदार
36
Dhamangaon railway
कॉंग्रेस
70879
विद्यमान आमदार
38
Amravati
कॉंग्रेस
48961
क्रमांक २ मते
39
Teosa
कॉंग्रेस
58808
विद्यमान आमदार
43
Morshi
राष्ट्रवादी
31449
क्रमांक २ मते
44
Arvi 
कॉंग्रेस
75886
विद्यमान आमदार
45
Deoli 
कॉंग्रेस
62533
विद्यमान आमदार
47
Wardha
कॉंग्रेस
37347
क्रमांक २ मते
48
Katol
राष्ट्रवादी
64787
क्रमांक २ मते
49
Savner
कॉंग्रेस
84630
विद्यमान आमदार
50
Hingna
राष्ट्रवादी
60981
क्रमांक २ मते
52
Nagpur South West
कॉंग्रेस
54976
क्रमांक २ मते
53
Nagpur South
कॉंग्रेस
38010
क्रमांक २ मते
54
Nagpur East
कॉंग्रेस
50522
क्रमांक २ मते
55
Nagpur central
कॉंग्रेस
49452
क्रमांक २ मते
56
Nagpur West
कॉंग्रेस
60098
क्रमांक २ मते
58
Kamthi
कॉंग्रेस
86753
क्रमांक २ मते
60
Tumsar
राष्ट्रवादी
45273
क्रमांक २ मते
62
Sakoli
कॉंग्रेस
55413
क्रमांक २ मते
65
Gondiya
कॉंग्रेस
62701
विद्यमान आमदार
70
Rajura
कॉंग्रेस
63945
क्रमांक २ मते
72
Ballarpur
कॉंग्रेस
60118
क्रमांक २ मते
73
Brahmapuri
कॉंग्रेस
70373
विद्यमान आमदार
74
Chimur 
कॉंग्रेस
62222
क्रमांक २ मते
79
Digras
राष्ट्रवादी
41352
क्रमांक २ मते
81
Pusad 
राष्ट्रवादी
94152
विद्यमान आमदार
83
Kinwat
राष्ट्रवादी
60127
विद्यमान आमदार
84
Hadgaon
कॉंग्रेस
65079
क्रमांक २ मते
85
Bhokar
कॉंग्रेस
100781
विद्यमान आमदार
86
Nanded North
कॉंग्रेस
40356
विद्यमान आमदार
89
Naigaon
कॉंग्रेस
71020
विद्यमान आमदार
91
Mukhed
कॉंग्रेस
45490
क्रमांक २ मते
92
Basmath
राष्ट्रवादी
58295
क्रमांक २ मते
93
Kalamnuri
कॉंग्रेस
67104
विद्यमान आमदार
94
Hingoli
कॉंग्रेस
40599
क्रमांक २ मते
95
Jintur
राष्ट्रवादी
106912
विद्यमान आमदार
97
Gangakhed
राष्ट्रवादी
58415
विद्यमान आमदार
98
Pathri
कॉंग्रेस
55632
क्रमांक २ मते
99
Partur
कॉंग्रेस
42577
क्रमांक २ मते
100
Ghansawangi
राष्ट्रवादी
98030
विद्यमान आमदार
101
Jalna
कॉंग्रेस
44782
क्रमांक २ मते
103
Bhokardan
राष्ट्रवादी
62847
क्रमांक २ मते
104
Sillod
कॉंग्रेस
96038
विद्यमान आमदार
105
Kannad
राष्ट्रवादी
60981
क्रमांक २ मते
106
Phulambri
कॉंग्रेस
69683
क्रमांक २ मते
110
Paithan
राष्ट्रवादी
41952
क्रमांक २ मते
112
Vaijapur
राष्ट्रवादी
53114
विद्यमान आमदार
113
Nandgaon
राष्ट्रवादी
69263
विद्यमान आमदार
114
Malegaon central
कॉंग्रेस
75326
विद्यमान आमदार
116
Baglan 
राष्ट्रवादी
68434
विद्यमान आमदार
118
Chandvad
कॉंग्रेस
43785
क्रमांक २ मते
119
Yevla
राष्ट्रवादी
112787
विद्यमान आमदार
121
Niphad 
राष्ट्रवादी
74265
क्रमांक २ मते
122
Dindori 
राष्ट्रवादी
68284
विद्यमान आमदार
127
Igatpuri 
कॉंग्रेस
49128
विद्यमान आमदार
135
shahapur
राष्ट्रवादी
56813
विद्यमान आमदार
136
Bhiwandi West
कॉंग्रेस
39157
क्रमांक २ मते
139
Murbad
राष्ट्रवादी
59313
क्रमांक २ मते
141
Ulhasnagar
राष्ट्रवादी
43760
विद्यमान आमदार
145
Mira Bhayandar
राष्ट्रवादी
59176
क्रमांक २ मते
149
Mumbra-Kalwa
राष्ट्रवादी
86533
विद्यमान आमदार
150
Airoli
राष्ट्रवादी
76444
विद्यमान आमदार
151
Belapur
राष्ट्रवादी
53825
क्रमांक २ मते
155
Mulund
कॉंग्रेस
28543
क्रमांक २ मते
159
Dindoshi
कॉंग्रेस
36749
क्रमांक २ मते
160
Kandivali East
कॉंग्रेस
31239
क्रमांक २ मते
162
Malad West
कॉंग्रेस
56574
विद्यमान आमदार
164
Versova
कॉंग्रेस
22784
क्रमांक २ मते
165
Andheri West
कॉंग्रेस
34982
क्रमांक २ मते
168
Chandivali
कॉंग्रेस
73141
विद्यमान आमदार
172
Anushakti Nagar
राष्ट्रवादी
38959
क्रमांक २ मते
177
Vandre West
कॉंग्रेस
47868
क्रमांक २ मते
178
Dharavi 
कॉंग्रेस
47718
विद्यमान आमदार
180
Wadala
कॉंग्रेस
38540
विद्यमान आमदार
182
Worli
राष्ट्रवादी
37613
क्रमांक २ मते
186
Mumbadevi
कॉंग्रेस
39188
विद्यमान आमदार
189
Karjat
राष्ट्रवादी
57013
विद्यमान आमदार
191
Pen
कॉंग्रेस
60496
क्रमांक २ मते
193
Shrivardhan
राष्ट्रवादी
61038
विद्यमान आमदार
194
Mahad
कॉंग्रेस
73152
क्रमांक २ मते
196
Ambegaon
राष्ट्रवादी
120235
विद्यमान आमदार
197
Khed alandi
राष्ट्रवादी
70489
क्रमांक २ मते
198
Shirur
राष्ट्रवादी
81638
क्रमांक २ मते
199
Daund
राष्ट्रवादी
76304
क्रमांक २ मते
200
Indapur
राष्ट्रवादी
94227
विद्यमान आमदार
201
Baramati
राष्ट्रवादी
150588
विद्यमान आमदार
202
Purandar
कॉंग्रेस
73749
क्रमांक २ मते
203
Bhor
कॉंग्रेस
78602
विद्यमान आमदार
204
Maval 
राष्ट्रवादी
67318
क्रमांक २ मते
209
Shivajinagar
कॉंग्रेस
34413
क्रमांक २ मते
211
Khadakwasala
राष्ट्रवादी
48505
क्रमांक २ मते
215
Kasba peth
कॉंग्रेस
31322
क्रमांक २ मते
216
Akole 
राष्ट्रवादी
67696
विद्यमान आमदार
217
Sangamner
कॉंग्रेस
103564
विद्यमान आमदार
218
Shirdi
कॉंग्रेस
121459
विद्यमान आमदार
220
Shrirampur 
कॉंग्रेस
57118
विद्यमान आमदार
221
Nevasa
राष्ट्रवादी
79911
क्रमांक २ मते
222
Shevgaon 
राष्ट्रवादी
81500
क्रमांक २ मते
224
Parner
राष्ट्रवादी
45841
क्रमांक २ मते
225
Ahmednagar City
राष्ट्रवादी
49378
विद्यमान आमदार
226
Shrigonda
राष्ट्रवादी
99281
विद्यमान आमदार
228
Georai
राष्ट्रवादी
76383
क्रमांक २ मते
229
Majalgaon
राष्ट्रवादी
75252
क्रमांक २ मते
230
Beed
राष्ट्रवादी
77134
विद्यमान आमदार
231
Ashti
राष्ट्रवादी
114933
क्रमांक २ मते
233
Parli
राष्ट्रवादी
71009
क्रमांक २ मते
234
Latur Rural
कॉंग्रेस
100897
विद्यमान आमदार
235
Latur City
कॉंग्रेस
119656
विद्यमान आमदार
236
Ahmadpur 
राष्ट्रवादी
57951
क्रमांक २ मते
238
Nilanga
कॉंग्रेस
49306
क्रमांक २ मते
239
Ausa
कॉंग्रेस
64237
विद्यमान आमदार
241
Tuljapur
कॉंग्रेस
70701
विद्यमान आमदार
242
Osmanabad
राष्ट्रवादी
88469
विद्यमान आमदार
243
Paranda 
राष्ट्रवादी
78548
विद्यमान आमदार
244
Karmala
राष्ट्रवादी
60417
क्रमांक २ मते
245
Madha
राष्ट्रवादी
97803
विद्यमान आमदार
246
Barshi 
राष्ट्रवादी
97655
विद्यमान आमदार
247
Mohol 
राष्ट्रवादी
62120
विद्यमान आमदार
248
Solapur City North
राष्ट्रवादी
17999
क्रमांक २ मते
249
Solapur City central
कॉंग्रेस
46907
विद्यमान आमदार
250
Akkalkot 
कॉंग्रेस
97333
विद्यमान आमदार
251
Solapur South
कॉंग्रेस
42954
क्रमांक २ मते
252
Pandharpur
कॉंग्रेस
91863
विद्यमान आमदार
254
Malshiras 
राष्ट्रवादी
77179
विद्यमान आमदार
255
Phaltan 
राष्ट्रवादी
92910
विद्यमान आमदार
256
Wai 
राष्ट्रवादी
101218
विद्यमान आमदार
257
Koregaon 
राष्ट्रवादी
95213
विद्यमान आमदार
258
Man 
कॉंग्रेस
75708
विद्यमान आमदार
259
Karad North
राष्ट्रवादी
78324
विद्यमान आमदार
260
Karad South
कॉंग्रेस
76831
विद्यमान आमदार
261
Patan
राष्ट्रवादी
85595
क्रमांक २ मते
262
Satara
राष्ट्रवादी
97964
विद्यमान आमदार
263
Dapoli
राष्ट्रवादी
52907
विद्यमान आमदार
264
Guhagar 
राष्ट्रवादी
72525
विद्यमान आमदार
265
Chiplun
राष्ट्रवादी
69627
क्रमांक २ मते
267
Rajapur 
कॉंग्रेस
37204
क्रमांक २ मते
268
Kankavli
कॉंग्रेस
74715
विद्यमान आमदार
269
Kudal
कॉंग्रेस
60206
क्रमांक २ मते
271
Chandgad 
राष्ट्रवादी
51599
विद्यमान आमदार
272
Radhanagari
राष्ट्रवादी
93077
क्रमांक २ मते
273
Kagal
राष्ट्रवादी
123626
विद्यमान आमदार
274
Kolhapur South
कॉंग्रेस
96961
क्रमांक २ मते
275
Karvir
कॉंग्रेस
107288
क्रमांक २ मते
276
Kolhapur North
कॉंग्रेस
47315
क्रमांक २ मते
279
Ichalkaranji
कॉंग्रेस
78989
क्रमांक २ मते
280
Shirol
राष्ट्रवादी
50776
क्रमांक २ मते
282
Sangli
कॉंग्रेस
66040
क्रमांक २ मते
283
Islampur
राष्ट्रवादी
113045
विद्यमान आमदार
286
Khanapur
कॉंग्रेस
53052
क्रमांक २ मते

 Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.