Saturday 21 September 2019

maharashtra vidhansabha election 2019 महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल

विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल


महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील एकूण 8.94 कोटी मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. आजपासून महाराष्ट्र आणि हरियाणात आचारंसहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येतील. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी नवीन सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांवेळी 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तसंच 15 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले होती. 
 केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 ची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात 21 ऑक्टोबरला मतदान होईल. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत याबाबत घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होणार आहे. तर हरियाणाच्या 90 जागांसाठी मतदान होईल. 1.8 लाख ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर निवडणूक प्रक्रिया 2 नोव्हेंबरपर्यंत होणार पूर्ण होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. निवडणुकीत पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच उमेदवारांना आपल्या गुन्हेगारीची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 28 लाखांपेक्षा अधिक खर्च करण्याची परवानगी नाही. निवडणुकीला उभ्या राहिलेल्या उमेदवारांना आपल्या अर्जातील सर्व रकाने भरावे लागणार आहेत. अर्जातील एकही रकामा रिकामा राहिल्यास त्यांच्या अर्ज बाद होईल. तसंच प्रत्येक उमेदवाराला आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही माहिती द्यावी लागणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. 

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात तब्बल २१ लाख मतदार वाढले


लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये २१ लाख १५ हजार ५७५ एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण ८ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ मतदार होते तर आता ३१ ऑगस्टपर्यंत ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ एवढी मतदार नोंदणी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले. जुलै-ऑगस्ट  या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हा कार्यक्रम राबविण्यात आला. सुट्ट्यांच्या दिवशी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले. त्यातून अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातूनही शहरी भागातील मतदार जोडण्यात आले. मार्चमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ४ कोटी ५७ लाख २ हजार ५७९ पुरुष मतदार व ४ कोटी १६ लाख २५ हजार ८१९ महिला मतदार होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी ३१ ऑगस्ट  रोजी प्रकाशित अंतिम मतदारयादीमध्ये पुरुष मतदारामध्ये दहा लाख ३५ हजार २६२ नव्या पुरुष मतदारांची वाढ होवून ती ४ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ एवढी झाली आहे. तर महिला मतदारांमध्ये १० लाख ७९ हजार ९५८ एवढी वाढ होऊन ती आता ४ कोटी २७ लाख ५ हजार ७७७ झाली आहे.लोकसभा निवडणुकीच्या वेळी २ हजार ८६ तृतीयपंथी मतदार होते त्यामध्ये ५०७ मतदार वाढून ते आता २ हजार ५९३ एवढे झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एकूण मतदारांमध्ये २१ लाख १५ हजार ५७५ एवढी वाढ झाली आहे.


विधानसभा निवडणूक कार्यक्रम

* अर्ज भरण्याची तारीख  : 27 सप्टेंबर
* अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर
* अर्ज छाननी : 5 ऑक्टोबर
* अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 7 ऑक्टोबर
* मतदानाची तारीख : 21 ऑक्टोबर
* निकाल : 24 ऑक्टोबर

मतदान आणि निकाल

मतदान - 21 ऑक्टोबर
निकाल- 24 ऑक्टोबर

2014 मधील पक्षीय बलाबल

भाजप - 122 जागा
शिवसेना - 63 जागा
काँग्रेस - 42 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस - 41 जागा
इतर - 20 जागा
एकूण - 288 जागा

2014 च्या विधानसभा निवडणुकीत पटकावलेल्या विभागवार जागा-

पश्चिम महाराष्ट्र (70) – भाजपा 24, शिवसेना 13, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 19, इतर 04
विदर्भ (62) – भाजपा 44, शिवसेना 04, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 01, इतर 03
मराठवाडा (46) – भाजपा 15, शिवसेना 11, काँगेस 09, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 03
कोकण (39) – भाजपा 10, शिवसेना 14, काँगेस 01, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 06
मुंबई (36) – भाजपा 15, शिवसेना 14, काँगेस 05, राष्ट्रवादी काँग्रेस 00, इतर 02
उत्तर महाराष्ट्र (35) – भाजपा 14, शिवसेना 07, काँगेस 07, राष्ट्रवादी काँग्रेस 05, इतर 02
एकूण (288) – भाजपा 122, शिवसेना 63, काँगेस 42, राष्ट्रवादी काँग्रेस 41, इतर 20
================================

साताऱ्याची पोटनिवडणूक लांबणीवर, देशातील ६४ जागांवर होणार पोटनिवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये शनिवारी महाराष्ट्र विधानसभा, हरियाणा विधानसभा आणि देशातील लोकसभेच्या ६४ जागेवरील पोटनिवडणूकीच्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये महाराष्ट्रामधील साताऱ्यातील पोटनिवडणुकीचा समावेश नाही. साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश करून आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकांनंतर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. दरम्यान साताऱ्याची पोटनिवडणूक मात्र आता लांबणीवर गेली आहे. साताऱ्याची पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत जाहीर करण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात दोन्हीही निवडणूका एकत्र होतील असा सर्वांचा अंदाज होता मात्र तसे झाले नाही.

या राज्यात होणार पोटनिवडणुका –

पोटनिवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या ६४ मतदारसंघांपैकी बिहारमधील एक जागा लोकसभेची तर अन्य ६३ जागा विधानसभेच्या आहेत. अरुणाचल प्रदेश (१), बिहार (५), छत्तीसगड (१), आसाम (४), गुजरात (४), हिमाचल प्रदेश (२), कर्नाटक (१५), केरळ (५), मध्य प्रदेश (१), मेघालय (१), ओडिशा (१), पुद्दुचेरी (१), पंजाब (४), राजस्थान (२), सिक्कीम (३), तामीळनाडू (२), तेलंगणा (१) आणि उत्तर प्रदेश (११) या राज्यांमधील मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२३ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना जारी होणार
३० सप्टेंबर : उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत
१ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
३ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

राज्यात पनवेलमध्ये सर्वाधिक मतदार

राज्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरीत्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असून आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली.  मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर खास भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात ३१ऑगस्टपर्यंत एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंदणी झाली आहे.  सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ५९ लाख १७ हजार ९०१ मतदारांची वाढ झाली आहे. तसेच सन २०११च्या जनगणनेनुसार एक हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण आहे. त्या तुलनेत सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण ८८९ इतके होते. महिलांचे मतदार यादीतील प्रमाण वाढविण्यासाठी आयोगाने राबविलेल्या उपक्रमामुळे हे प्रमाण आता ९१४ असे लक्षणीय सुधारले आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत नाही, त्यांना नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे ४ ऑक्टोबपर्यंत मतदार यादीत  नाव नोंद करता येईल. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ९१ हजार ३२९ मतदान केंद्रे होती. यंदा ९६ हजार ६५४ मतदान केंद्रे असतील. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना सोयीचे व्हावे, यासाठी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील ५ हजारपेक्षा जास्त मतदान केंद्रे तळ मजल्यावर आणण्यात आली आहेत. तसेच मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था, व्हिल चेअर आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील. दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी ‘पीडब्लूडी अ‍ॅप’ची सुविधा देण्यात आली आहे. तसेच विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत ६०.३२ टक्के मतदान झाले होते. यावेळी यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. निवडणुकीसाठी ६ लाख ५० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. निवडणुकीत सी व्हिजिल, सुविधा या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा हा पुरुष आणि महिला मतदारसंख्येत आघाडीवर आहे. तर, तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे. राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष मतदार, ४ कोटी २७ लाख ५ हजार ७७७ महिला आणि २ हजार ५९३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात ५२७ तृतीयपंथी मतदार, ठाणे जिल्ह्यात ४६० आणि पुणे जिल्ह्यात २२८ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. नागरिकांना आचारसंहितेचा कुठे भंग होत असल्याचे दिसून आल्यास सी व्हिजिल या मोबाइल अप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार करता येईल. राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापण्यात आले असून तक्रार निवारणासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. राज्यस्तरावर २४ तास ही सेवा सुरू राहणार आहे. निवडणुकीमध्ये मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एक लाख ८० लाख बॅलेट युनिट, एक लाख ३० हजार कंट्रोल युनिट आणि एक लाख ३५ हजार व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाईल. या सर्व यंत्रणांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील यापूर्वीच्या दोन विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न आहे. त्यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या आणि अद्याप मतदार यादीत नावाची नोंदणी न केलेल्या नव्या मतदारांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसांपर्यंत म्हणजे ४ ऑक्टोबरपर्यंत आपले नाव नोंदविता येईल. यासाठी संबंधितांनी आपल्या नावाची नोंदणी मतदारयादीत करून, लोकशाहीत मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी शनिवारी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. राज्‍यातील मतदारनोंदणीची प्रक्रिया विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्‍हणजे ४ ऑक्‍टोबर २०१९पर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी नोंदणी करणाऱ्यांना निवडणुकीत मतदान करता येईल. त्‍यामुळे ज्‍यांची नोंदणी झालेली नसेल अशा व्यक्‍तींनी आपली नोंदणी करून घ्‍यावी, असे आवाहन बलदेव सिंह यांनी केले. नवीन मतदारांना आपल्या नावाची नोंदणी संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, तहसिलदार कार्यालय येथे करता येईल. नावांबाबत समस्या असल्यास पुन्हा योग्य पुराव्यांच्या आधारे मतदारनोंदणी करून घ्यावी. ऑनलाइन मतदारनोंदणी करण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन सुविधाही उपलब्ध आहे. त्यासाठी www.nvsp.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन बलदेव सिंह यांनी केले आहे.

विधानसभा निवडणूक दृष्टिक्षेपात

* एकूण विधानसभा मतदारसंघ- २८८
* एकूण मतदार- ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११
* सर्वात जास्त मतदार – पनवेल (५ लाख ५४ हजार ८२७ मतदार)
* सर्वात कमी मतदार – – वडाळा-मुंबई (२ लाख ३९ हजार ९३५ मतदार)
*  अपंग मतदार- ३ लाख ६० हजार ८८५
*  मतदान केंद्र- ९६ हजार ६५४
* मतदानासाठी ईव्हीएम- १.८० लाख बॅलेट युनिट, १.३० लाख कंट्रोल युनिट आणि १.३५ लाख व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर
* निवडणुकीसाठी ६ लाख ५० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
=============================

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर

लोकसभा निवडणुकीत पुण्यासारख्या शहरात कमी मतदान झाले. आता विधानसभेच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा जिल्हा प्रशासनाने चंग बांधला आहे. ३० टक्के पेक्षा मतदान कमी झालेल्या केंद्राचा शोध घेण्यात आला आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांपर्यंत स्लिप पोहोचविणे, बदलेल्या मतदान केंद्राची माहिती पोहोचविणे यासारख्या उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदानाचे प्रमाण वाढेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक कमी मतदान पुण्यात झाले. पुण्यात ५४ टक्के मतदान झाले. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यावर आमचा भर आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारापर्यंत मतदान स्लिप वाटप, झोपडपट्टी आणि औद्योगिक वसाहतीपर्यंत बदललेल्या मतदान केंद्रांची माहिती देणे, मतदार यादींची माहिती देण्यावर आम्ही लक्ष देणार आहोत. त्यावरून मतदान वाढविण्यावर आमचा भर राहील. लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारींचे प्रमाण पाहता त्या अत्यल्प होत्या. त्यामुळे त्या तक्रारी सुद्धा येणार नाही असा आमचा विधानसभेत प्रयत्न राहील,' अशी ग्वाही जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली. पुणे जिल्ह्यात ३० टक्क्यांपेक्षा कमी मतदान होणाऱ्या केंद्रांची शहरातील संख्या ८९ आहे, तर ग्रामीण भागात ९ केंद्रे आहेत; तसेच ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होणारी मतदान केंद्रे ग्रामीण भागात असून, त्याची संख्या ४९ एवढी आहे. ९० टक्के मतदान होणारी शहरात मोजकीच ४ ते ५ मतदान केंद्रे आहेत. पुणे शहर व जिल्ह्यात संवेदनशील मतदान केंद्रे १९० आहेत. त्यामध्ये सर्वाधिक केंद्रे शहरात १५१ असून, जिल्ह्यात अशी ३९ केंद्रे आहेत. त्याबाबत स्थानिक पोलिसांमार्फत अधिक माहिती घेतली जाणार आहे. निवडणूक निरीक्षक पुण्यात आल्यानंतर त्यांच्या पाहणीनंतर संख्या वाढू शकते, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. लोकसभेला पुणे पोलिस दलातील ८० टक्के पोलिसांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सुमारे १७५० पोलिस मतदारांचे नावच यादीत आढळले नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे यंदा त्यांची नावे यादीत घेण्यात आली असून, १०० टक्के पोलिस मतदान करतील, असा विश्वास शहर पोलिस दलाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. ८५०० पोलिसांपैकी ७५०० पोलिस निवडणुकीच्या कामासाठी सज्ज आहेत, असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, 'जिल्ह्यातील साडेतीन हजार व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये मोकांतर्गत, खंडणी आणि अन्य अशा प्रकारच्या गुन्हेगारांचा समावेश आहे. अवैध शस्त्रे, अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे.' पुणे शहरात परवानाधारक शस्त्रांच्या तपासणीसाठी समिती स्थापन झाली आहे. शहरात आजमितीला ६५४८ परवानाधारक शस्त्रधारक आहेत. त्यापैकी किती शस्त्रे ताब्यात घेण्याची गरज आहे याचा आढावा घेण्यात येणार आहे. शहरात २११५ व्यक्तींवर एका महिन्यापासून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. ज्या व्यक्तींना संरक्षण देण्यात येत आहे, त्यापैकी खासदार, मंत्री यांचे संरक्षण वगळता इतरांचे संरक्षण काढण्यात येईल. विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदान करण्यासाठी पैशांचे मोठ्या प्रमाणात वाटप होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पैशाच्या व्यवहारांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. विविध संवेदनशील मतदान केंद्राच्या भागात नाकाबंदी सुरू राहील; तसेच फिरत्या पथकांच्या माध्यमातून पैशांची, तसेच अवैध दारूची देवाणघेवाण आणि वाहतूक करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले जाईल. संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. लोकसभेला पैसे वाटपाचे २ ते ३ प्रकार झाले होते. आता पैशांचे व्यवहार रोखण्यासाठी १० लाखांपेक्षा अधिक रकमेचे बँकेत हस्तांतर होत असल्यास त्यांच्यावर नजर ठेवली जाणार आहे.
पुणे शहर जिल्ह्यातील मतदारसंख्या
वयोगट
मतदार
१८ ते १९
११३६०६
२० ते २९
१३२६५४०
३० ते ३९
१९६६८५२
४० ते ४९
१६९९९२१
५० ते ५९
११६१५८२
६० ते ६९
७५१५३०
७० ते ७९
४२८१७१
८० पेक्षा अधिक
२३८४३४
एकूण मतदारसंख्या
७६८६६३६
पुणे शहर जिल्ह्यातील मतदारसंख्या
अ.क्र.
संघ क्र.
मतदारसंघ
संख्या
1
195
 जुन्नर
299358
2
196
 आंबेगाव
282832
3
197
 खेड आळंदी
326455
4
198
 शिरुर
381228
5
199
 दौंड
303253
6
200
 इंदापूर
304713
7
201
 बारामती
341392
8
202
 पुरंदर
359821
9
203
 भोर
359527
10
204
 मावळ
350000
11
205
 चिंचवड
516836
12
206
 पिंपरी
351285
13
207
 भोसरी
432515
14
208
 वडगाव शेरी
452983
15
209
 शिवाजीनगर
304910
16
210
 कोथरुड
403482
17
211
 खडकवासला
483748
18
212
 पर्वती
353879
19
213
 हडपसर
501836
20
214
 पुणे कॅन्टोन्मेंट
290741
21
215
 कसबा पेठ
290442
एकूण प्रारूप मतदारसंख्या
7691236
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन मतदारसंघांत तेरा लाख 618 मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष मतदार सुमारे 6 लाख 97 हजार 34 तर महिला मतदार सुमारे 6 लाख 3 हजार 525 आहेत. सुमारे 59 तृतीतपंथी मतदार असल्याची नोंद झाली आहे. हे मतदार शहरातील तीन आमदार ठरविणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने नुकतीच अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल 36 हजार नवमतदारांची नावे वाढली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर स्थलांतरित, दुबार आणि मृत मतदार वगळण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदार हे चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात 7 हजार 454 पुरुष, 6 हजार 641 स्त्री व इतर 1 असे 14 हजार 96 मतदार वाढले आहेत. चिंचवडमध्ये दोन लाख 75 हजार 486 पुरुष तर दोन लाख 41 हजार 318 महिला आणि इतर 32 असे एकूण पाच लाख 16 हजार 836 मतदार आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 18 हजार 835 मतदार वाढले आहेत. यामध्ये 10 हजार 73 पुरुष तर 8 हजार 754 स्त्री व इतर 8 अशी नवमतदारांची नोंद झाली आहे. भोसरीत दोन लाख 36 हजार 853 पुरुष तर एक लाख 95 हजार 640 महिला आणि 22 इतर असे चार लाख 32 हजार 515 मतदार आहेत. लोकसभेनंतर  पिंपरी विधानसभा  मतदारसंघात 1 हजार 829 पुरुष, 1 हजार 698 स्त्री असे 3 हजार 527 नवमतदार वाढले आहेत. पिंपरीत एक लाख 84 हजार 713 पुरुष तर एक लाख 66 हजार 567 महिला आणि इतर 6 असे एकूण तीन लाख 51 हजार 285 मतदार आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

====================================================================


Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

====================================================================

विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) कसा भरावा व आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2019 करिता पुढील आठवड्यात आचारसंहिता व कार्यक्रम जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची जय्यत पूर्वतयारी सुरु केलेली असून उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व माहितीची विचारणा केली जात आहे. विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) कसा भरावा व आवश्यक कागदपत्रे कोणती असतात याबाबत प्राब संस्थेकडून मार्गदर्शन केले जाते. प्रबोधनात्मक उपक्रम म्हणून राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांना सविस्तरपणे माहिती देण्यात येत आहे. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र विहीत नमुना 2 अ मध्ये सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे. सदर प्रस्तावक हा संबंधित लोकसभा मतदारसंघाचा मतदार असावा. स्वतंत्र व मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षाचा उमेदवार असल्यास त्यांना 10 प्रस्तावक असणे आवश्यक आहे. व तो नामनिर्देशनपत्र ज्या लोकसभा मतदारसंघातून भरणार आहे त्या लोकसभा मतदारसंघातील मतदार असणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार विहीत प्रपत्रातील प्रपत्र 26 (भाग-अ, भाग-ब आणि सत्यापन)चे शपथपत्र शपथआयुक्त किंवा प्रथमश्रेणी दंडाधिकारी किंवा लेख प्रमाणक यांच्यासमोर शपथबद्ध करणे आवश्यक आहे. शपथपत्रातील सर्व रकाने भरणे आवश्यक असून, कोणताही रकाना रिक्त ठेवू नये. कोणत्याही बाबींच्या संबंधात कोणताही रकाना न लिहिता रिक्त ठेवू नये. निरंक (Nil) किंवा लागू नाही (Not Applicable)) किंवा माहीत नाही (Not Known) असे त्या रकान्यामध्ये नमूद करावे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार शपथपत्रात भाग ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ई-मेल आयडी, संपर्क दूरध्वनी क्रमांक, समाजमाध्यम खाते असल्यास नमूद करणे आवश्यक आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावयाची आहे, त्या मतदारसंघात उमेदवारांचे नाव नसल्यास ज्या मतदारसंघातील मतदार यादीत उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारसंघातील मतदार यादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशन पत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, मान्यता प्राप्त पक्षाचा उमेदवार असल्यास अ व ब फॉर्म नामनिर्देशन पत्रासोबत किंवा नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या अंतिम दिनांकास दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अमानत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी 25 हजार व अनुसूचित जाती - जमातीसाठी 12 हजार 500 रुपयेप्रमाणे आवश्यक आहे. अनामत रक्कम रोख किंवा रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, शासकीय कोषागार येथे चलनद्वारे भरावी, धनादेश स्वीकारले जाणार नाही. नामनिर्देशन पत्रासोबत रोख रक्कमेची पावती, चलन सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चाचे नियंत्रण सुलभ व्हावे, म्हणून उमेदवाराने नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या किमान एक दिवस अगोदर बँकेत स्वत:चे नावे व फक्त निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे आवश्यक आहे व सदर खाते क्रमांकाची माहिती नामनिर्देशन पत्रासोबत लेखी स्वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. अखेरच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जातात. एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकते. तसेच एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशन पत्र सादर करु शकते. नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवार व इतर जास्तीत - जास्त चार व्यक्ती असे एकूण जास्तीत-जास्त पाच व्यक्ती निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षात हजर राहू शकतात. नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती कमाल तीन वाहनांच्या मर्यादेस अधीन राहून निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परिसरात वाहने आणू शकतात.

विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-

[?] नामनिर्देशन पत्र विहीत नमुना २ अ 

[?] नामनिर्देशन पत्रासोबत विहीत प्रपत्रातील प्रपत्र २६ (भाग-अ, भाग-ब आणि सत्यापन) चे शपथपत्र 

[?] मतदार यादीत उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारसंघातील मतदार यादीची प्रमाणित प्रत

[?] राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, मान्यता प्राप्त पक्षाचा उमेदवार असल्यास अ व ब फॉर्म

[?]  मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र

[?] नामनिर्देशन पत्रासोबत अनामत रोख रक्कमेची पावती, चलन सादर करणे आवश्यक आहे.

[?] बँकेत स्वत:चे नावे फक्त निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे व सदर खाते क्रमांकाची माहिती नामनिर्देशन पत्रासोबत लेखी स्वरुपात देणे आवश्यक आहे.

[?] उमेदवारचे फोटो/रहिवास पुरावा/पॅन कार्ड साक्षांकीत प्रत

[?] उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे.

[?] अपक्ष उमेदवार असल्यास त्यांना १० प्रस्तावक असणे आवश्यक आहे.

[?] एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकते.

[?] एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशन पत्र सादर करु शकते.

[?]  नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवार व इतर जास्तीत - जास्त चार व्यक्ती हजर राहू शकतात.

[?]  नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीना कमाल तीन वाहनांची मर्यादा आहे.

विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-
Assembly Election 2019
LIST OF DOCUMENTS TO BE SUBMITED
1.      Nomination Form 2A
2.      Political Party Form A and Form B
3.      Affidavit - Form 26 (100 Stamp Paper Notarized including Annexures)
4.      Declaration of Candidate / Election Agent for Photo
5.      Deposit Receipt
6.      Election expenditure letter / Xerox copy of Pass Book
7.      Photo – 5 Colour Copies (mention name and Sign overleaf of Photo)
8.      Candidate 2 colours photos in envelope (mention name and sign on envelope and overleaf of photo)
9.      Certify copy of Candidate Voter List Letter
10.   Pan of Candidate
11.   Adhar Card of Candidate
12.   Election Card of Candidate
13.   Copy of All No Due Certificate (Candidate)
14.   Certified copy of Proposer’s in Voters List – 10
15.   ID Proof and Voter Card of Proposer
16.   Appointment of Election Agent Form
17.   Election Agent ID Proof and Residence Proof Copy and Five Photos/ Certify copy of Voter List Letter
18.   Candidate / Election Agent Specimen Form
19.   Name on Ballot Paper letter
20.   Supported documents copies – Not to Attach (Personal Bank details, policy details, liability details)

Check List to be collected after submission of form
1.    Rules Hand book for election commission
2.    Register of Expenditure / Rules / Price List
3.    Polling Agent appointment Form
4.    Officers List of Contacts with Designation
5.    Various permission letter formats
Mr. Chandrakant Bhujbal (Political advisor)
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
निवडणूक खर्चाचे नियंत्रण/देखरेख/समन्वय व विहित नमुन्यात दैनंदिन सादर करणे सल्ला व सेवेसाठी  अथवा अधिक माहितीसाठी प्राब संस्थेशी संपर्क करा- 
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
=========================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.