Wednesday 4 September 2019

राज्यात दहा लाख मतदारांची वाढ; पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील मतदारसंख्येत वाढ

चिंचवड, हडपसर मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदार

पुणे शहर आणि जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या वाढली असून, ती ७६ लाख ८६ हजार ६३६ झाली आहे. त्यामध्ये पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये ३० लाख ८२ हजार २१ मतदार हे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. मतदारसंख्येत हडपसर मतदारसंघ सर्वांत जास्त आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी चिंचवड मतदारसंघ हा जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधिक मतदार असलेला ठरला आहे. या मतदारसंघात पाच लाख १६ हजार ८३६ मतदार झाले आहेत. आतापर्यंत पुणे कँन्टोन्मेंट मतदार संघामध्ये सर्वांत कमी मतदारसंख्या होती. सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या हडपसरमध्ये मतदारांची संख्या पाच लाख एक हजार ८३६ झाली आहे. मतदारसंख्येमध्ये खडकवासला मतदारसंघाचे दुसरे स्थान कायम आहे. या मतदारसंघामध्ये चार लाख ८३ हजार ७४८ मतदार झाले आहेत. वडगाव शेरी मतदारसंघानेही तिसरे स्थान कायम राखले आहे. या मतदारसंघात चार लाख ५२ हजार ९६३ मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविले आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघ चौथ्या स्थानावर आहे. या मतदारसंघात चार लाख तीन हजार ४८२ मतदार आहेत. आतापर्यंत सर्वांत कमी मतदारसंख्या असलेल्या पुणे कँन्टोन्मेंट मतदार संघाऐवजी ही जागा कसबा विधानसभा मतदार संघाने घेतली आहे. कसब्यामध्ये दोन लाख ९० हजार ४४२ मतदार झाले आहेत. कसबा मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त झाली आहे. पुरुष मतदार एक लाख ४३ हजार ९९९ असून, महिला मतदार एक लाख ४६ हजार ४३९ आहेत. चार तृतीयपंथी मतदार आहेत. पुणे कँन्टोंन्मेंटमध्ये मतदारसंख्या दोन लाख ९० हजार ७४१ झाली आहे. पर्वती मतदारसंघात तीन लाख ५३ हजार ८७९ मतदार झाले आहेत; तर शिवाजीनगरमध्ये तीन लाख चार हजार ९१० मतदारांची नोंदणी झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी चिंचवड मतदारसंघ हा जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधिक मतदार असलेला ठरला आहे. या मतदारसंघात पाच लाख १६ हजार ८३६ मतदार झाले आहेत. पिंपरी मतदारसंघात तीन लाख ५१ हजार २८५ मतदार आहेत. भोसरी मतदारसंघामध्ये चार लाख ३२ हजार ५१५ मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यामध्ये असलेल्या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघात जास्त मतदार आहे. या मतदारसंघात तीन लाख ८१ हजार २२८ मतदार झाले आहेत. आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वांत कमी म्हणजे दोन लाख ८२ हजार ८३२ मतदार आहेत.
पुणे शहरातील आठ मतदारसंघ
मतदारसंघ
मतदारसंख्या
हडपसर
५०१८३६
खडकवासला
४८३७४८
वडगाव शेरी
४५२९८३
कोथरुड
४०३४८२
पर्वती
३५३८७९
शिवाजीनगर
३०४९१०
पुणे कँटोन्मेंट
२९०७४१
कसबा पेठ
२९०४४२
एकूण मतदार
३०८२०२१
पिंपरी चिंचवड 3 मतदारसंघ
मतदारसंघ
मतदारसंख्या
चिंचवड
516836
पिंपरी
351285
भोसरी
432515
एकूण मतदार
1300636
जिल्ह्यातील दहा मतदारसंघ
मतदारसंघ
मतदारसंख्या
शिरुर
३८१२२८
पुरंदर
३५९८२१
भोर
३५९५२७
मावळ
३४५४००
बारामती
३४१३९२
खेड आळंदी
३२६४५५
इंदापूर
३०४७१३
दौंड
३०३२५३
जुन्नर
२९९३५८
आंबेगाव
२८२८३२
एकूण मतदार
३३०३९७९


* जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या ७६ लाख ८६ हजार ६३६

* पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील मतदार :- ३० लाख ८२ हजार २१

* पुरुष :- ४० लाख १९ हजार ६६४

* महिला :- ३६ लाख ६६ हजार ७४४

* नवीन मतदार :- एक लाख ५४ हजार ८६०

* मतदारयादीतून वगळलेले :- सहा हजार ४५७

* अनिवासी भारतीयांची नोंदणी करण्यात आली असून, ही संख्या ६३३ झाली आहे. तर तृतीयपंथी २२८ इतकी मतदारांची संख्या आहे.

राज्यात दहा लाख मतदारांची वाढ 

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे दहा लाख मतदारांची वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाने १५ जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान मतदार दुरुस्ती याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम राबवला होता. हा कार्यक्रम येत्या सहा सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. निवडणूक आयोग नियमितपणे मतदार दुरुस्ती याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम राबविला जात असतो. यानुसार राबवलेल्या उपक्रमात ऑगस्ट अखेर आठ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ इतके पात्र मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला दहा लाखांपेक्षा जास्त मतदारांची संख्या झाली असून यामध्ये चार कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष तर चार कोटी २७ लाख पाच हजार ७७७ लाख महिला मतदार आहेत. २५९३ तृतीय पंथी मतदार आहेत. मुंबई उपनगरात राज्यात सर्वांत जास्त म्हणजे ५२७, त्यानंतर ठाणे जिल्ह्यात ४६० तर तिसऱ्या क्रमांवर पुणे जिल्ह्यात २२८ असे तृतीय पंथी मतदार आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.