Saturday 20 July 2019

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी 19 ऑगस्टला मतदान

युतीला ११ मतांची गरज; तर अपक्ष व एमआयएमने साथ दिली तरच कॉंग्रेसला संधी 


EVENTS                                                                     DATES & DAYS

1 Issue of Notifications                                   25th July, 2019 (Thursday)
2 Last date of making nominations                   01st August, 2019 (Thursday)
3 Scrutiny of nominations                                 02nd August, 2019 (Friday)
5 Last date for withdrawal of candidatures        05th August, 2019 (Monday)
6 Date of poll                                                  19th August, 2019 (Monday)
7 Hours of poll                                                 8.00 a.m. to 4.00 p.m.
8 Counting of Votes                                         22nd August, 2019 (Thursday)
9 Date before which election completed            26th August, 2019 (Monday)
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी 19 ऑगस्टला मतदान घेण्यात येणार असून या निवडणुकीत भाजप-सेना युतीला ११ मते कमी पडत आहेत मात्र मतदारांमध्ये 41 अपक्ष आहेत त्यामुळे त्यामधील सदस्यांना शिवसेनेला चुचकारावे लागणार आहे. सर्व अपक्ष व एमआयएमने साथ दिली तरच कॉंग्रेसला संधी मिळू शकते अशी येथील मतदारांच्या पक्षीय बलाबल स्थितीवरून दिसून येत आहे. या जागेवर काँग्रेसचे सुभाष झांबड आमदार होते त्यांचा कार्यकाल संपल्यामुळे ही निवडणूक होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी दिली होती त्यामुळे पुन्हा त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. सर्व अपक्ष व एमआयएम पक्षाची मोट बांधणारा उमेदवार दिल्यास यश मिळू शकेल मात्र तगडा उमेदवार मिळणे देखील दुरापस्त आहे. औरंगाबाद आणि जालना येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. दि. 25 जुलैपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 1 ऑगस्ट आहे. 19 ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहेत. विधानसभेपूर्वी महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे. यावेळच्या निवडणुकीत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायत सदस्यांची संख्या 657 आहे. मागच्या सहा वर्षांत या निवडणुकीसाठी 189 मतदार वाढले असून नगर पंचायत, पालिका, नगरपालिका सदस्यांची संख्या वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आलेले नगरसेवक, निर्वाचित आणि स्वीकृत सदस्य या निवडणुकीचे मतदार असतात. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार मतपत्रिकेवर मतदान करावे लागते. खर्चाची मर्यादा नसलेल्या या निवडणुकीसाठी एकेक मतदार आणि त्यांच्या मतदानाला किंमत असते. युतीत हा मतदार संघ शिवसेनेकडे तर आघाडीत काँग्रेसकडे आहे. मात्र या मतदार संघात पक्षीय बलाबल पाहिल्यास एमआयएम आणि अपक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर पालिका आणि जिल्हा परिषद सदस्य विधान परिषदेवर आमदार निवडून देतात. या मतदार संघासाठी १९ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. संख्याबळावरून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी ही निवडणूक काहीशी सुकर मानली जाते. परंतु, विजयासाठीच्या आकडा गाठण्यासाठी युतीला देखील काही अपक्षांची गरज भासू शकते. औरंगाबाद-जालना मतदार संघात एकूण काँग्रेसकडे १६७, भाजपकडे १५९, शिवसेनेकडे १३९, राष्ट्रवादी ८३, एमआयएम २७ आणि अपक्ष ४१ मते आहेत. एकूण ६१६ पैकी ३०९ मते विजयासाठी हवे आहेत. या आकडेवारून शिवसेना उमेदवाराला विजयासाठी अपक्षांच्या मतांची गरज भासणार आहे. तर काँग्रेस उमेदवाराला एमआयएम आणि अपक्ष मतांची मोट बांधावी लागणार आहे. त्यामुळे उभय पक्षांकडून शक्तीशाली उमेदवाराचा शोध सुरू आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष झांबड पुन्हा एकदा विधान परिषदेच्या या जागेसाठी काँग्रेसकडून इच्छूक आहेत. मागील निवडणुकीचा अनुभव आणि ही जागा कायम राखण्यासाठी काँग्रेसकडून झांबड यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु, मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील यांचे नावही शर्यतीत आहे.  या जागेसाठी 1 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना उमेदवारी भरता येईल, तसेच 5 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेता येणार आहेत. 19 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत मतदान होईल, तर 22 तारखेला या मतांची मोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 656 मतदार मतदान करणार आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात 17 मतदान केंद्र असणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात 9, तर जालना जिल्ह्यात 8 मतदान केंद्र असतील. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत सामीतीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य या निवडणुकीत मतदान करू शकतात. याआधी या मतदारसंघातून काँग्रेसचे सुभाष झांबड विजयी झाले होते. पण यावेळी शिवसेना-भाजपची सदस्य संख्या जास्त असल्यामुळे या जागेवर युतीचे पारडे जड आहे. युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला असल्यामुळे शिवसेना या जागेसाठी कोणाला उमेदवारी देईल याबाबत उत्सुकता आहे. तर काँग्रेसकडून परत एकदा सुभाष झांबड निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे. सध्या 78 सदस्यीय विधानपरिषदेत भाजपचे 23, शिवसेना 12 आणि रासपचा एक सदस्य आहे. तर युतीला पाठिंबा असणारे इतर 04 सदस्य असा हा आकडा 40 पर्यंत जातो. तर विरोधकांची संख्या 38 आहे. पण औरंगाबाद-जालना निवडणुकीनंतर युतीचा आणखी एक सदस्य वाढण्याची शक्यता आहे.

MR. CHANDRAKANT BHUJBAL

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.