Tuesday 23 July 2019

महाराष्ट्रात १७ सप्टेंबरला विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता तर मतदान 20 ऑक्टोबरला

ऐननिवडणुकीतील खर्चाला लगाम लावण्यासाठी निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप-सेनेचा भर

152 विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 


सप्टेंबर महिन्याच्या १७ सप्टेंबर २०१९ रोजी अंगारकी चतुर्थीदिनी महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ करीता निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान घेण्यात येऊ शकते. सर्वसाधारण 20 ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान व दिवाळी पूर्वी म्हणजे 23 अथवा २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणी होऊ शकेल. मागील निवडणुकांचा कार्यक्रम पाहिल्यास विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१४ मध्ये महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर २०१४ रोजी घेण्यात आलेल्या होत्या तर मतमोजणी 19 ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आली होती. निवडणूक कार्यक्रम १२ सप्टेंबर २०१४ रोजी जाहीर करण्यात आलेला होता. यावेळी महाराष्ट्रासह हरियाणामधील निवडणुका एकाच वेळी जाहीर करण्यात आलेल्या होत्या  महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबर २०१४ रोजी संपणार होती तत्पुर्वी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. संपूर्ण प्रक्रिया २२ ऑक्टोबर २०१४ रोजी पूर्ण करण्यात आलेली होती. विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ करीता देखील गेल्या वेळी प्रमाणे ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येतील कारण महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपणार आहे. तत्पुर्वी निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे निवडणूक आयोगास क्रमप्राप्त आहे. गेल्या निवडणुकांच्या तारखांच्या पार्श्वभूमीवर यावेळी गणेशोत्सव सांगता १२ सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. या कालावधीत सुरक्षेवर मोठ्याप्रमाणात ताण यंत्रणांवर असतो त्यामुळे गणेशोत्सवानंतर निवडणुका जाहीर  होतील. तर २५ ऑक्टोबर २०१९ पासून दीपावली सण सुरु होणार आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वीच मतदान घेण्यावर आयोगाची मदार असेल. सर्वसाधारण सप्टेंबर महिन्याच्या १७ सप्टेंबर २०१९ रोजी अंगारकी चतुर्थीदिनी महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ करीता निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे. तर २५ सप्टेंबर २०१९ रोजी अधिसूचना काढण्यात येऊ शकते तर नामनिर्देशनपत्र घटस्थापना व नवरात्री कालावधीत भरण्याची मुदत असणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान घेण्यात येऊ शकते. सर्वसाधारण 20 ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान व दिवाळी पूर्वी म्हणजे 23 अथवा २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणी होऊ शकते. 

ऐननिवडणुकीतील खर्चाला लगाम लावण्यासाठी निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप-सेनेचा भर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूकपूर्व प्रचार दौऱ्यांचे आयोजन केले जात असून ऐननिवडणुकीतील खर्चाला लगाम लावण्यासाठी निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप व शिवसेनेचा जास्त भर आहे. निवडणुकीत आदर्श आचारसंहिता लागू होत असल्याने केंद्रित प्रचारावर व निवडणूक खर्चावर मर्यादा येतात. अनेक विभागांच्या परवानगी घ्यावी लागते. राज्य व केद्र स्तरावरील नेत्यांच्या सभांच्या आयोजनात कार्यकर्त्यांचा वेळ खूप वाया जातो. प्रत्यक्ष मतदारांना भेटणे व प्रचारसाहित्य पोहोचवणे जिकरीचे होते म्हणून ऐननिवडणुकीतील खर्चाला लगाम लावण्यासाठी निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप-सेनेने भर दिलेला आहे असे वाटते . विधानसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात उमेदवारांना खर्चाची २८ लाखांची मर्यादा असते. या खर्चात स्टार प्रचारक व राजकीय पक्षांचा प्रचार खर्च समावेश केला जात असल्याने प्रचारावर मर्यादा येतात. यावर मात करण्यासाठी भाजप व शिवसेनेने निवडणूकपूर्व प्रचार दौऱ्यांचे आयोजन केले आहे.   

152 विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 

आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांची तयारी अन २२० जागांवर लक्ष्य आणि प्रत्यक्ष 152 विधानसभा मतदारसंघातच प्रचार ही भाजपची रणनीती आहे. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट संपूर्ण महिनाभर 30 जिल्हे व्याप्त महाजनादेश यात्रा काढून 25 दिवसात पूर्ण करून सुमारे 4 हजार 232 किलोमीटर अंतर कापून महाराष्ट्रातील 152 विधानसभा मतदारसंघात तब्बल 104 जाहीर सभा आणि 228 स्वागत सभा घेण्यात येणार आहेत तर 20 पत्रकार परिषदांमध्ये निवडणूकपूर्व प्रचारांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात 'जनआशीर्वाद' यात्रा नुकतीच काढली होती. या यात्रेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून राज्यात महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू केली असून, ती जळगाव येथून सुरू झाली होती. आदित्य ठाकरे युवकांसोबतच शेतकऱ्यांशी यात्रेच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व जनतेच्या मनावर बिंबवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही असाच कार्यक्रम आखला आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील महाजनादेश यात्रा काढणार काढणार आहेत.  'एलईडी'युक्त रथ या यात्रेत वापरला जाईल. यात फडणवीस सरकारने केलेल्या कामाची माहिती चलचित्रांद्वारे दिली जाईल. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दीड ते दोन महिन्यांत आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 1 ते 31 ऑगस्टपर्यंत महाजनादेश यात्रा प्रत्येक जिल्ह्यातून जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून राज्य सरकारने केलेल्या कामासोबत नवीन काही घोषणा करण्याची शक्‍यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागपूर, नंदुरबार, अकोला, वाशीम व धुळे जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्‍ती करून महिनाभरात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्‍यता आहे. पाच जिल्ह्यांत निवडणुका असल्या तरी याचा परिणाम राज्यावर होईल. दरम्यान विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून एक ते नऊ ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा होणार असून, या भागातील एकुण १४ जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदार संघातून १,६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे. यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्ट रोजी सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यांत ही यात्रा १८ जिल्ह्यातल्या ९३ विधानसभा मतदारसंघात २,७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. विदर्भात १ हजार २३२ किलोमीटर तर  एकूण ४४ मतदारसंघात हि यात्रा फिरणार आहे .उत्तर महाराष्ट्रात ६३३ किलोमीटर  म्हणजेच ३४ मतदारसंघात मुख्यमंत्री या यात्रेच्या निमित्ताने निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये जावून सरकारची कामगिरी सांगणार आहेत. मराठवाडात १ हजार ६९ किलोमीटर  म्गणजे २८ मतदारसंघात तर पश्चिम महाराष्ट्रातील ८१२ किलोमीटर  व २९ मतदारसंघात हि यात्रा प्रवास करणार आहे. कोकणात  ६३८ किलोमीटर प्रवास करताना  कोकणातील १५ मतदारसंघ मुख्यमंत्री पिंजून काढणार आहेत. तसेच यात्रेदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यात्रा ज्या जिल्ह्यांतून प्रवास करेल तेथे त्या जिल्ह्यांतील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचे कार्यक्रम-

21 जुलै 2019 - प्रदेश विस्तारित कार्यसमिती
25 जुलै ते 10 ऑगस्ट 2019 - जिल्हयासह शक्ती केंद्र प्रमुख बैठक
9 ऑगस्ट 2019 - सदस्यता अभियान ड्राइव्ह
1 जुलै ते 15 ऑगस्ट - नवमतदार नोंदणी अभियान (युवा मोर्चा)
15 जुलै ते 15 ऑगस्ट - पक्ष विस्तार योजना (सर्व शक्ती केंद्रांपर्यंत)
10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट - विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन
1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट - शक्ती सन्मान महोत्सव (रक्षाबंधन पर्व) (बुथस्तरावर व मंडल स्तरावर राखी संकलन) 16 ऑगस्ट - रक्षाबंधन कार्यक्रम 
1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट - महाजनादेश यात्रा
15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर - विधानसभा स्तरावर नवमतदार संवाद कार्यक्रम
16 ऑगस्ट - स्व. अटलजी स्मृतीदिन (शक्ती केंद्रस्थानी बूथ कार्यकर्ता एकत्रीकरण)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================








No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.