Thursday 18 July 2019

मताधिक्यात घट झाल्याने राष्ट्रवादी प्रादेशिक पक्षच राहणार; विधानसभा निवडणुकीत चिन्ह वाटपात फटका बसणार

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्याची निवडणूक आयोगाकडून नोटीस


लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडूनही राष्ट्रवादीसह इतर पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे. आयोगाने अनेक पक्षांना त्यांना दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. मताधिक्यात घट झाल्याने राष्ट्रवादी प्रादेशिक पक्षच राहणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना चिन्ह वाटपात त्याचा फटका बसणार आहे. निवडणुकीत उमेदवारांना चिन्ह वाटपात सर्वप्रथम राष्ट्रीय पक्षाना प्राधान्य देण्यात येते नंतर प्रादेशिक पक्ष व नंतर इतर पक्ष आणि अपक्ष अशाप्रकारे प्राधान्यक्रम असल्याने या निर्णयाचा काही प्रमाणात थेट मतदानावर परिणाम होण्याची शक्यता असते. आधीच पराभवाने खच्चीकरण व आत्मविश्वास ढळल्याने इच्छुकांची संख्या कमी झालेली असून आता या निर्णयामुळे आणखीनच मनोधैर्य खचणार आहे. नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत बसपमुळे बहुतांश मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी व काँग्रेस उमेदवारांना दुसरया व तिसऱ्या क्रमांकावर मतपत्रिकेवर (बॅलेंट पेपर) स्थान मिळाले होते. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला आज (गुरुवार) नोटीस दिली आहे. आयोगाच्या या नोटीशीवर राष्ट्रवादीला 20 दिवसांमध्ये उत्तर द्यावे लागणार आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) या तीन पक्षांना त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेतला जाऊ नये, याचे उत्तर पाच ऑगस्टपर्यंत देण्यास निवडणूक आयोगाने नोटीसद्वारे बजावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह तीन राष्ट्रीय पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) या तीन पक्षांना पाच ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास बजावले आहे. या पक्षांचा  राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्यानंतर भाजप, काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि बहुजन समाजवादी पक्ष (बसप) हे पाचच राष्ट्रीय पक्ष राहतील. राष्ट्रवादीने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला, तर देशभरात राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी घड्याळ हे निवडणूक चिन्ह राखीव राहणार नाही. ज्या राज्यांमध्ये राष्ट्रवादीने 'राज्यस्तरीय पक्षा'चा दर्जा कायम राखला आहे, त्याच ठिकाणी हे चिन्ह अबाधित राहील. 2014 मधील लोकसभा निवडणुकीनंतरही बसप, माकप आणि राष्ट्रवादी यांच्यावर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमवण्याची वेळ आली होती. मात्र केवळ एकाच निवडणुकीच्या निकालांवर निर्णय न घेता निवडणूक आयोगाने दुसरी म्हणजेच 2019 मधील लोकसभा निवडणूकीची संधी दिली होती. मात्र यावेळी कठोर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्याने देशाच्या राजधानीत असलेले शासकीय कार्यालय देखील काढून घेण्याची शक्यता आहे. आयोगाने राष्ट्रवादीला आज नोटीस दिली आहे.  लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्का बसला आहे. महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांच्या फक्त 5 जागा आलेल्या आहेत यामध्ये काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली तर राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. निवडणूक आयोगाने सध्या देशातल्या सात पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा दर्जा दिला होता.राष्ट्रीय पक्षांचा दर्जा तपासण्यासाठी नव्या नियमांनुसार पाच ऐवजी 10 वर्षांच्या कामगिरीचा विचार केला जातो. राष्ट्रवादीचे चार खसादार निवडून आले असले तरी इतर नियमांची पुर्तता करणे पक्षाला शक्य नाही त्यामुळे पक्ष काय उत्तर देतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली की त्या पक्षाला कार्यालयासाठी मोठ्या शहरांमध्ये कमी किंमतीत जागा व देशभर एकच निवडणूक चिन्ह अशा अनेक सुविधा मिळत असतात.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी आवश्यकता-

* निवडणूक आयोग 1968 च्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देते.

* त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार पाहिजे.

* त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांत लोकसभा निवडणुकीत किंवा तेथील विधानसभा निवडणुकांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली पाहिजे.

* चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता पाहिजे.

सध्या हे आहेत सात राष्ट्रीय पक्ष-

भारतीय जनता पक्ष

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

भारतीय कम्युनिस्ट पक्ष

बहुजन समाज पक्ष

तृणमूल काँग्रेस

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)


http://mymarathi.net/feature-slider/election-commission-and-ncp/
================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.