Thursday, 4 July 2019

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 11 विधानसभा मतदारसंघातून 70 इच्छूकांचे राष्ट्रवादीकडे अर्ज

11 विधानसभा मतदारसंघातून 70 इच्छूकांचे राष्ट्रवादीकडे अर्ज


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले. पिंपरी विधानसभेतून ८, चिंचवड विधानसभेतून ७, भोसरी विधानसभेत ३ या तिन्ही मतदार संघातून एकूण  मतदारसंघातून १८ तर पुणे शहराच्या आठही विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा लढविण्यासाठी शहरातील माजी आमदारासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक; तसेच ५२ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. प्रमुख व मात्तबर नेत्यांनी मात्र अर्ज प्रदेश समितीकडे करणार असल्याने या संख्येत वाढ होणार आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघात आहे. येथे तीव्र इच्छुक असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाही.

कॉंग्रेसमधील इच्छुकांची संख्या घटली

प्रदेश कॉंग्रेस तसेच शहर कॉंग्रेसकडून अर्ज मागविण्यात आल्यानंतर शहरातून केवळ 20 ते 22 जणांचेच अर्ज आलेले असून कोथरूड, हडपसर, पर्वती, वडगावशेरी, खडकवासला मतदारसंघात अतिशय नगण्य प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यातील आठ विधानसभांपैकी चार विधानसभा मध्ये पक्षाकडून निवडणूक लढविण्यास उमेदवारच इच्छूक नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पक्षाकडून 6 जुलै पर्यंत अर्ज करण्याची असलेली मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली असून या वाढीव मुदतीत अर्जांची संख्या वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे. कॉंग्रेसकडून शिवाजीनगर, कॅन्टोंन्मेंट, कसबा या तीन मतदारसंघा उमेदवारीसाठी चुरस असणार आहे. पुण्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून 2014 मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यापूर्वी 2009 मध्ये दोन्ही पक्षांकडून चार जागा लढविण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता आघाडीतील जागा वाट निश्‍चित झालेले नसले तरी, पक्षाकडून सर्व विधानसभांसाठी हे अर्ज मागण्यिात आले होते. मात्र, पक्षाकडे तीनच मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार आहेत. तर इतर ठिकाणी पक्षाला आलेला प्रतिसाद अतिशय नगण्य आहे.

मतदारसंघ आणि इच्छुक उमेदवारांची नावे - 

वडगावशेरी विधानसभा - 

राष्ट्रवादी- बापू पठारे, सुनील टिंगरे, सतीश म्हस्के, भीमराव गलांडे, तबस्सुम इनामदार 

काँग्रेस -  पी ए इनामदार, रमेश सकट, भीवसेन रोकडे आणि  विकास टिंगरे, ज्ञानेश्वर रामभाऊ मोझे, माजी नगरसेवक सुनील मलके, राजू केसरकर.

शिवाजीनगर विधानसभा - 

राष्ट्रवादी- नीलेश निकम, प्रदीप देशमुख, बाळासाहेब रानवडे, दयानंद इरकल 

काँग्रेस -  माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी नगरसेवक दत्तात्रय बहिरट, संजय अगरवाल, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष मनीष आनंद, गोपाल तिवारी, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख, राजू साठे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, नंदलाल धिवार, हुसैन शेख, संदीप मोकाटे. 

कोथरूड विधानसभा - 

राष्ट्रवादी- बंडू केमसे, लक्ष्मी दुधाने, विजय डाकले, संदीप बालवडकर, माणिक दुधाने, बाळासाहेब बराटे, स्वप्नील दुधाने, गणेश घोरपडे 

काँग्रेस -  संदीप मोकाटे,प्राची दुधाणे, विजय खळदकर, मिलिंद पोकळे.

पर्वती विधानसभा - 

राष्ट्रवादी- अश्विनी कदम, संतोष नांगरे, नितीन कदम, शशिकांत तापकीर, अर्चना हनमघर, निखिल शिंदे 

काँग्रेस - नरेंद्र व्यवहारे, मुकेश धिवार, सचिन तावरे, माजी उपमहापौर उल्हास उर्फ आबा बागूल.

कसबा पेठ विधानसभा - 

राष्ट्रवादी- गणेश नलावडे, रवींद्र माळवदकर, विशाल गद्रे, वनराज आंदेकर, अशोक राठी, गोरख भिकुले 

काँग्रेस - माजी नगरसेवक विरेंद्र किराड, मुख्तार शेख, काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, बाळासाहेब दाभेकर, योगेश भोकरे, विनय ढेरे, अब्दुलरझाक बागवान, माजी पदाधिकारी गोपाल तिवारी, नगरसेवक रवींद्र धंगेकर, शिवानंद हुल्याळकर, सुशीलकुमार चिखले, माजी महापौर कमल व्यवहारे. 

पुणे कँटोन्मेंट विधानसभा - 

राष्ट्रवादी- शांतीलाल मिसाळ, शैलेंद्र जाधव, अशोक कांबळे 

काँग्रेस - माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह, सदानंद शेट्टी, रवींद्र आरडे, नगरसेवक अविनाश बागवे, शहराध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, मुकेश धिवार , करणसिंग मकवाना, नगरसेविका लता राजगुरू 

हडपसर विधानसभा - 

राष्ट्रवादी- वैशाली बनकर, प्रवीण तुपे, प्रशांत जगताप, गफूर पठाण, बंडू गायकवाड, अशोक कांबळे, योगेश ससाणे, फारुक इनामदार, नंदा लोणकर, लाला गायकवाड, अनिस सुंडके, सुरेश घुले, आनंद अलकुंटे

काँग्रेस - माजीमंत्री बाळासाहेब शिवरकर, शंकर ढावरे, प्रशांत तुपे, अभिजित शिवरकर,  शिवाजी केदारी, प्रशांत सुरसे.

खडकवासला विधानसभा - 

राष्ट्रवादी- दत्ता धनकवडे, दिलीप बराटे, सचिन दोडके, रुपाली चाकणकर, काका चव्हाण, बाबा धुमाळ, भाग्यश्री कामठे

काँग्रेस - श्रीरंग चव्हाण, सचिन बराटे, संग्राम अशोक मोहोळ, निवृत्ती निवंगुणे, अर्चना शाह.

पिंपरी विधानसभा

राष्ट्रवादी- माजी आमदार आण्णा बनसोडे, ऍड गोरक्ष लोखंडे, सुलक्षणा शिलवंत-धर, राजू बनसोडे, संदीपान झोंबाडे, शेखर ओव्हाळ, सुनंदा काटे, गंगाताई धेंडे

चिंचवड विधानसभा - 

राष्ट्रवादी- राजेंद्र जगताप, विशाल वाकडकर, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, मयुर कलाटे, विठ्ठल (नाना)  काटे, प्रशांत शितोळे

भोसरी विधानसभा - 

राष्ट्रवादी- दत्तात्रय (काका) साने, दत्तात्रय जगताप, पंडीत गवळी, माजी आमदार विलास लांडे 

राष्ट्रवादी काँग्रेसकडे भोरसाठी सात इच्छुक

भोर विधानसभा - विक्रम खुटवड, तानाजी मांगडे, शांताराम इंगवले, शंकर मांडेकर, सुनील चांदेरे, सविता दगडे, रविंद्र कंधारे


जुन्नर विधानसभा - अतुल बेनके, तुषार शिवाजी थोरात, विनायक तांबे, 


आंबेगाव विधानसभा - दिलीप वळसे-पाटील, 


खेड - आळंदी  विधानसभा - रामदास ठाकूर, ऋषिकेश पवार, अनिल राक्षे, ज्ञानेश्‍वर भोसले, शांताराम भोसले, ज्ञानबा गवारी-पाटील, विलास कातोरे

शिरूर विधानसभा- अशोक पवार, चंदन सोंडेकर, वसुंधरा उबाळे

दौंड विधानसभा - रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, विरधवल जगदाळे, महेश भागवत, अनंत थोरात

इंदापूर विधानसभा - दत्तात्रय भरणे, अप्पासाहेब जगदाळे, अशोक घोगरे, गणेश झगडे, प्रवीण माने, भाऊसाहेब सपकाळ, वैशाली पाटील

बारामती विधानसभा - अजित पवार

पुरंदर विधानसभा - दिंगंबर दुर्गाडे, विराज धनंजय काकडे, बबनराव टकले, सुदाम इंगळे, संभाजी झेंडे

मावळ विधानसभा - बाबूराव वायकर, सचिन घोटकुले, किशोर भेगडे, बाळासाहेब नेवाळे, विजय पाळेकर, रूपाली दाभाडे, संतोष भेगडे

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.