Monday, 22 July 2019

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्येत वाढ

विशेष मतदार नोंदणी मोहिमेत 4881 मतदारांचा सहभाग ; 71 हजार जणांकडून ऑनलाइन अर्ज



पुणे-(चंद्रकांत भुजबळ) दुसरया विशेष संक्षिप्त मतदार नोंदणी कार्यक्रमा अंतर्गत दि. 20 व 21 रोजी विशेष मतदार नोंदणीचे अभियान जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे राबविण्यात आले यामध्ये विविध राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. या दोन दिवसांच्या मतदार नोंदणी मोहिमेत ४८८१ मतदारांनी सहभाग घेतला.  लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात सुमारे 68 हजार जणांनी मतदारनोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. यामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये 3 हजारांची भर पडली आहे. या ७१ हजार अर्जांची मतदारनोंदणी अधिकाऱ्यांकडून पाच ऑगस्टपर्यंत तपासणी करण्यात येईल. दावे आणि हरकती 13 ऑगस्टपर्यंत निकाली काढण्यात येतील.  मतदारनोंदणीसाठी येत्या शनिवारी (ता. 27) आणि रविवारी (ता. 28) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 19 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाने 15 जुलैला प्रारूप मतदार यादी जाहीर केली. मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय विशेष संक्षिप्त मतदारनोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. आता 27 आणि 28 जुलैला विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेत नव्याने मतदारनोंदणी, नाव वगळणे, नावामध्ये दुरुस्ती आणि रहिवासी पत्त्यात बदल करण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर अर्ज उपलब्ध करून देण्यात येतील. या मोहिमेत आलेल्या अर्जांची मतदारनोंदणी अधिकाऱ्यांकडून पाच ऑगस्टपर्यंत तपासणी करण्यात येईल. दावे आणि हरकती 13 ऑगस्टपर्यंत निकाली काढण्यात येतील. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून 16 ऑगस्टपर्यंत मतदार याद्यांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर 19 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दुसरया विशेष संक्षिप्त मतदार नोंदणी कार्यक्रमा अंतर्गत दि. 20 व 21 रोजीच्या विशेष मतदार नोंदणी अभियानातील सविस्तर माहिती तपशील उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मोनिका सिंह यांनी जाहीर केलेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये मतदानासाठी पात्र असणाऱ्या ज्या मतदारांची नावे नाहीत, त्यांना यादीमध्ये नावनोंदणी करण्यासाठी शनिवार व रविवारी दि. 20  व 21 जुलै रोजी संधी देण्यात आलेली होती. मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या पात्र नागरिकांना नाव नोंदणीची आणखी एक संधी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने २० व २४ जुलै असे दोन दिवस दुसरया विशेष संक्षिप्त मतदार नोंदणी कार्यक्रमा अंतर्गत विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन केले होते या मोहीमेला नागरीकांनी प्रतिसाद दिलेला आहे. विशेष मतदार नोंदणी मोहिमेत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा क्षेत्रात राबविण्यात आले यामध्ये एकूण 4881 अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जामध्ये विहित अर्ज नमुना ६ नुसार रहिवासी मतदाराचे नाव समाविष्ट करण्याकरिता 4409 अर्ज आले. तर प्राप्त अर्जामध्ये नाव समाविष्ट करण्याबाबतचा कोणत्याही आक्षेपाकरिता विहित अर्ज नमुना ७ नुसार एकूण फॉर्म 232 आक्षेप व हरकत घेणारे अर्ज प्राप्त झाले तर प्राप्त अर्जामध्ये मतदार यादीतील नोंदीमधील कोणत्याही दुरुस्तीकरिता विहित अर्ज नमुना ८ नुसार एकूण फॉर्म 694 मतदार यादीतील तपशीलातील दुरुस्तीसाठी अर्ज प्राप्त झाले तसेच प्राप्त अर्जामध्ये मतदारसंघातील स्थलातंरण विहित अर्ज नमुना ८ अ नुसार एकूण फॉर्म 141 मतदारांनी मतदार यादीतील नाव स्थलांतरित करण्यासाठीचे अर्ज प्राप्त झाले असल्याचे उपलब्ध केलेल्या तपशिलावरून दिसून येत आहे. दरम्यान परदेशस्थ मतदाराचे नाव समाविष्ट करण्याकरिता विहित अर्ज नमुना 6 अ नुसार एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. दुसरया विशेष संक्षिप्त मतदार नोंदणी कार्यक्रमा अंतर्गत दि. 20 व 21 रोजीच्या विशेष मतदार नोंदणी अभियानात पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. या बरोबरच विविध राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. दुसरया विशेष संक्षिप्त मतदार नोंदणी कार्यक्रमाबाबत पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेने मतदारांमध्ये जनजागृती केली. या मोहिमेअंतर्गत मतदारांना नवीन नाव नोंदणी करणे, नाव वगळणीसाठी अर्ज करणे, नावामध्ये दुरुस्ती करणे, पत्तामध्ये बदल करणे, यासाठी अर्ज जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी उपस्थित होते. मतदान केंद्रावर ३१ रोजी प्रसिद्ध करण्‍यात आलेली अंतिम मतदार याद्याही उपलब्‍ध केल्या होत्या. या मोहिमेचा लाभ घेऊन सर्व पात्र मतदारांनी लोकशाहीच्‍या बळकटीकरणासाठी यामध्ये सहभागी होत विशेष मोहीम यशस्‍वी करण्याचे आवाहन जिल्‍हा निवडणूक कार्यालय प्रशासनाने केले होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================





No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.