Friday 5 July 2019

मराठा आरक्षणानंतरही भाजपच्या मराठा मतांमध्ये ४% घट तर सेनेची ९% वाढली

मराठा समाज आरक्षणाचा शिवसेनेला राजकीय लाभ मराठा मतांमध्ये ९% वृद्धी


आरक्षणानंतरही मराठा मतांचा भाजपपेक्षा शिवसेनेलाच कौल मतदारांनी दिला असून लोकसभेत सेनेला ३९ टक्के तर भाजपला २० टक्के मराठा मते प्राप्त झाल्याचे लोकनीती व सीएसडीएस संस्थेने लोकसभा निवडणुकीनंतर केलेल्या सर्व्हेतील अहवालात म्हंटले आहे. भाजपची मराठा मते ४% घटली असून सेनेची ९% वाढली आहेत.मराठा समाजाला आरक्षण देऊन त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा भाजप प्रयत्न करत असला तरी राज्यातील मोठ्या संख्येने मराठा मतदार गेल्या विधानसभा व यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्याच पाठीशी असल्याचे दिसत आहे. लोकनीती व सीएसडीएस संस्थेने लोकसभा निवडणुकीनंतर केलेल्या सर्व्हेत हे निष्कर्ष समोर आले. अहवालानुसार युतीला मराठा समाजाची एकूण ५९ टक्के मते मिळाली. मात्र, त्यात शिवसेनेने तब्बल ३९% मते मिळवली. २०१४ च्या विधानसभेच्या तुलनेत भाजपची मते ४ टक्क्यांनी घटून २० टक्क्यांवर आली. आता हायकोर्टानेही मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्याने जास्तीत जास्त मराठा मतदान युतीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातही जास्तीत जास्त टक्केवारी आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. मराठा समाज हा काँग्रेसचा हक्काचा मतदार मानला जात असे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडल्यानंतर मराठा समाज त्यांच्या बाजूला गेला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात प्रत्येक वेळी चांगले यश मिळवू शकली. मराठा मतदार गेल्या काही वर्षांपासून भाजप, सेनेकडे वळला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा मते कुणाला तारणार हे विधानसभा निवडणुकीत देखील स्पष्ट होईल. हायकोर्टानेही मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्याने जास्तीत जास्त मराठा मतदान युतीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
इतर जाती-धर्मांनी दिला असा कौल
पक्ष
उच्चवर्णीय
एसटी
मुस्लिम
बौद्ध
भाजप
63%
23%
9%
4%
शिवसेना
21%
12%
4%
2%
राष्ट्रवादी
3%
37%
30%
4%
काँग्रेस
7%
11%
56%
5%
वंचित+इतर
6%
16%
1%
85%

२०१९ लोकसभा : युतीला मराठा कौल (२०१४ विधानसभेच्या तुलनेत २०१९ ची लोकसभा)

  शिवसेना 39% : २०१४ मध्ये ३०% मराठा मते घेतलेल्या सेनेने यंदा ३९ टक्क्यांचा टप्पा गाठला.

  भाजप 20% : मराठा मतांमध्ये यंदा ४ टक्क्यांनी घट झाली आणि २० टक्के मराठा मते मिळाली.

  राष्ट्रवादी 28% : २०१४ च्या तुलनेत १०% मराठा मते वाढून एकूण टक्केवारी २८% वर पोहोचली.

  काँग्रेस 09% : मराठा समाजाने काँग्रेसला ९% मते दिली. २०१४ च्या तुलनेत २% घट झाली.

मुस्लिम मते - (२०१४ आणि २०१९)

२०१४ मध्ये मुस्लिम समाजाने काँग्रेसच्या पारड्यात ५४% मते टाकली होती. २०१९ लोकसभेत काँग्रेसला मुस्लिम समाजाची ५६% मते पडली. ती २०१४ विधानसभच्या तुलनेत २ टक्क्यांनी जास्त आहेत.
Who voted for whom? Lok Sabha elections, 2019
Social group/Locality
Congress
NCP
BJP
Shiv Sena
Others
Rural
15
18
24
26
18
Urban
19
12
33
19
17
Caste Community
7
3
63
21
6
Marathas
9
28
20
39
5
OBCs
14
5
44
31
7
Dalits
13
11
18
12
45
STs
11
37
23
12
16
Muslims
56
30
9
4
1
Buddhists
5
4
4
2
85
Economic Class (only the extreme ends)
Poor
19
17
27
18
18
Rich
11
13
38
21
17

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================







No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.