येरवडा येथील मतदारच ठरविणार वडगावशेरीचा आमदार
वडगावशेरी मतदारसंघातील पठारे, टिंगरे या आडनावाच्या राजकीय घराण्यातील इच्छूकांची मक्तेदारी संपुष्टात आलेली असून यांच्या भागातील मतदारांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात घट झालेली आहे. या मतदारसंघातील येरवडा येथील मतदारच वडगावशेरी विधानसभेचा आमदार ठरविणार असल्याचे मतदारसंख्येवरून स्पष्ट होत आहे. नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील मतदान केंद्र ठिकाणांमध्ये देखील मतदारसंख्येनुसार मोठ्याप्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत. या मतदारसंघात एकूण 417 मतदानकेंद्र असून यापैकी 193 मतदानकेंद्र येरवडा भागातील आहेत. येरवडा या प्रमुख भागातील एकूण मतदारसंख्या 197206 असून नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत 89906 मतदारांनी सहभाग घेतला होता. एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत येरवडा या भागातील मतदारसंख्याच आगामी विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. तेथील मतांच्या राजकारणात वर्चस्व राखणारा उमेदवारच निवडणुकीत बाजी मारेल अशी परिस्थिती आहे. या मतदारसंघातील मतदारसंघातील घट व येरवडा भागातील मतदारसंख्येतील वाढीचा विचार केल्यास सामाजिकदृष्ट्या अनुसूचित जाती व जमाती या सह ओबीसींची संख्या प्रभावशील असून मराठेत्तर उमेदवाराला मतदारसंघ अनुकूल ठरणार नसल्याची राजकीय स्थिती निर्माण झालेली आहे. राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीत या भागातील उमेदवार दिल्यास यश सुकर होऊ शकते. या भागातून सध्या केवळ २ इच्छुकांची नावे चर्चेत आहेत यामध्ये उपमहापौर सिद्धार्थ धेंडे व शिवसेनेचे नगरसेवक संजय भोसले यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आरपीआयचे असलेले उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी पालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविल्याने भाजप देखील त्यांना या मतदारसंघातून संधी देऊ शकते तर शिवसेनेला हा मतदारसंघ जागा वाटपात गेल्यास नगरसेवक संजय भोसले यांना देखील उमेदवारीची संधी मिळू शकते. विमाननगर, चंदननगर, खराडी, वडगावशेरी या भागातील प्रमुख इच्छूक सध्या आखाड पार्टीची खैराती मध्ये दंग आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षमता आणि गर्व या गर्तेत त्यांचे राजकारण गुरफटलेले असल्याने त्यांच्या मस्तवाल दुर्लक्षामुळेच भागातील मतदारसंख्येत घट झालेली असल्याच्या मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत. तर सध्याचे भाजप आमदारांचे कार्य प्रभावी नसल्याने त्यांना पुन्हा पक्षाकडून संधी मिळण्याची शक्यता धूसर मानली जाते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सेना आणि भाजप यांची युती तुटली आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडील एकमेव पर्याय म्हणून विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. ही निवडणूक लढविण्यासाठी जगदीश मुळीक इच्छुकही नव्हते, मात्र, पक्षाला दुसरा पर्याय नसल्याने त्यांना ही निवडणूक लढवावी लागली, त्यावेळेस वडगाव शेरीत राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार बापू पठारे आणि सेनेचे सुनील टिंगरे अशीच लढत वाटत होती, मात्र, मोदी यांच्या लाटेत विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांना आमदारकीची लॉटरी लागली, विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांचा विजय हा त्यांच्या स्वतःसाठी आणि राजकीय कार्यकर्त्यांना अनपेक्षित असाच होता. 2014 च्या विधानसभेला प्रथमच भाजपचा आमदार येथून निवडून आल्यानंतर. 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे 14, शिवसेनेचे 3 नगरसेवक निवडून आले; तर राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक महापालिकेत निवडून आले. या मतदारसंघात 40 टक्के झोपडपट्टी व गुंठेवारीतील बैठी घरे असलेली वसाहत, तर 60 टक्के सोसायट्या आहेत.
वडगावशेरी विधानसभा
मतदारसंघातील प्रमुख भागानुसार मतदारसंख्या व प्रमाण
|
||
मतदारसंघातील प्रमुख भाग
|
मतदारसंख्या
|
मतदारसंख्येचे प्रमाण
|
येरवडा
|
197206
|
44.57
|
खराडी
|
68131
|
13.82
|
वडगावशेरी
|
63314
|
14.35
|
धानोरी
|
51054
|
12.68
|
लोहगांव
|
22079
|
4.82
|
विमाननगर
|
19484
|
4.24
|
कळस
|
15706
|
3.88
|
मांजरी खुर्द तळेरान वाडी
|
3577
|
0.98
|
वडगाव शिंदे
|
2874
|
0.52
|
निरगुडी
|
827
|
0.15
|
444252
|
वडगावशेरी मतदारसंघातील प्रमुख भागानुसार मतदारसंख्या व लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान-
येरवडा या प्रमुख भागातील एकूण मतदारसंख्या 197206 असून नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत 89906 मतदारांनी सहभाग घेतला होता. वडगावशेरी या प्रमुख भागातील एकूण मतदारसंख्या 63314 असून नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत 30177 मतदारांनी सहभाग घेतला होता. खराडी या प्रमुख भागातील एकूण मतदारसंख्या 68131 असून नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत 29333 मतदारांनी सहभाग घेतला होता. धानोरी या प्रमुख भागातील एकूण मतदारसंख्या 51054 असून नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत 26064 मतदारांनी सहभाग घेतला होता. लोहगांव या प्रमुख भागातील एकूण मतदारसंख्या 22079 असून नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत 10706 मतदारांनी सहभाग घेतला होता. विमाननगर या प्रमुख भागातील एकूण मतदारसंख्या 19484 असून नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत 8200 मतदारांनी सहभाग घेतला होता. कळस या प्रमुख भागातील एकूण मतदारसंख्या 15706 असून नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत 7964 मतदारांनी सहभाग घेतला होता. मांजरी खुर्द तळेरानवाडी या प्रमुख भागातील एकूण मतदारसंख्या 3577 असून नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत 2104 मतदारांनी सहभाग घेतला होता. वडगाव शिंदे या प्रमुख भागातील एकूण मतदारसंख्या 2874 असून नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत 1366 मतदारांनी सहभाग घेतला होता. निरगुडी या प्रमुख भागातील एकूण मतदारसंख्या 827 असून नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत 356 मतदारांनी सहभाग घेतला होता.वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची नावे -
राष्ट्रवादी - बापूसाहेब पठारे, सुनील टिंगरे, प्रकाश म्हस्के, सतीश म्हस्के, भीमराव गलांडे, तबस्सुम इनामदार
काँग्रेस - पी ए इनामदार, रमेश सकट, भीवसेन रोकडे आणि विकास टिंगरे
भाजप- जगदीश मुळीक, डॉ.सिद्धार्थ धेंडे, बापूराव कर्णे-गुरुजी, अनिल टिंगरे, महेंद्र गलांडे
शिवसेना- संजय भोसले, अजय भोसले, रघुनाथ कुचिक, सचिन भगत, नितीन भुजबळ
काँग्रेस- रमेश आढाव, संगीता देवकर
रिपब्लिकन पक्ष(आठवले गट)- डॉ. सिद्धार्थ धेंडे, लतिका साठे
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook===============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.