Thursday, 25 July 2019

पंचतारांकित सुविधांसह ३४ मजल्यांचे भव्य न्यू मनोरा "एमएलए टाॅवर"

नवीन आमदार निवासाचे भूमीपूजन

थिएटर, सभागृह, बँक, दुकाने, भोजन कक्ष, योगा कक्ष, वाचनालय, उपहारगृहासह वाहनतळ, दवाखाना आदी. सुविधांसह आमदारांसाठी व अभ्यागतांसाठी वेगवेगळे पंचतारांकित सुविधा असलेले कक्ष असे ३४ मजल्यांचे भव्य न्यू मनोरा "एमएलए टाॅवर" मुंबईमध्ये साकारत आहे. नवीन आमदार निवासाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनोरा आमदार निवास येथील जागेत झाले. या नविन मनोरा आमदार निवास हे ३४ मजली टॉवर असणार असून एकूण बांधकाम ७.७२ लाख चौरस फूटाचे असेल, या आमदार निवासातील सभागृह आसन क्षमता २४० ची असणार आहे तर ,वाहनतळ, दवाखाना, बँक, दुकाने, भोजन कक्ष, योगा कक्ष, वाचनालय, छोटे थिएटर व उपहारगृहाचा समावेश  नव्या मनोरा आमदार निवासात असणार आहेत. आमदारांसाठी व अभ्यागतांसाठी वेगवेगळे कक्षही या मध्ये असणार आहेत. नवीन आमदार निवासाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनोरा आमदार निवास येथील जागेत आज झाले. महाराष्ट्रातील संसदीय कार्यप्रणाली ही वैभवशाली आहे. या वैभवात भर घालणारी मनोरा आमदार निवासाची इमारत उभी राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर,उपसभापती निलम गोऱ्हे, उपाध्यक्ष विजय औटी, विधीमंडळातील प्रतोद राज पुरोहित, विधीमंडळाचे सचिव (कार्यभार) जितेंद्र भोळे, वास्तूविशारद शशी प्रभू, यांच्यासह मंत्री, अधिकारी उपस्थित होते. यावेळी  फडणवीस म्हणाले की, मनोरा आमदार निवास ही वास्तू अनेक इतिहासाचा साक्षीदार होता. अनेकांच्या चांगल्या – वाईट आठवणी याच्याशी जोडल्या गेल्या होत्या. परंतु या आमदार निवासात वारंवार होणाऱ्या छोट्या अपघातामुळे नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. नवीन इमारतीचा सुंदर आणि आवश्यक गोष्टींचा विचार करून आराखडा शशी प्रभू यांनी केला आहे. यामध्ये ८०० पेक्षा जास्त रूम असणार आहेत. आमदार, माजी आमदार यांच्याबरोबर विधानमंडळ येथे येणाऱ्या शिष्टमंडळासाठीही व्यवस्था इथे होणार आहे. एनबीसीसीने कमीत कमी वेळेत आधुनिक तंत्रज्ञान वापरून ही इमारत पूर्ण करावी. याबरोबरच मॅजेस्टिक आमदार निवासाचे पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्याकडेही लक्ष द्यावे.मनोरा आमदार निवासातील आठवणी सांगून सभापती  रामराजे निंबाळकर म्हणाले की, नवीन आमदार निवासाची इमारत अतिशय चांगली होईल. या इमारतीची देखभाल ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. तसेच या माध्यमातून आमदारांना चांगली सेवा देता येईल. या इमारतीत आमदारांकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांचीही सोय व्हावी.विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले की, मनोरा आमदार निवास ची सुसज्ज वास्तू उभी राहत आहे. आमदारांची सध्या पाच वेगवेगळ्या ठिकाणी निवासव्यवस्था होत होती. या इमारतीमध्ये आता सर्वांची एकाच ठिकाणी व्यवस्था होईल. उपसभापती निलम गोऱ्हे यांनी प्रास्ताविक केले. तर उपाध्यक्ष विजय औटी यांनी आभार मानले. तत्पूर्वी आमदार निवास येथील जागेवर मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते कुदळ मारून भूमीपूजन करण्यात आले. यावेळी सभापती श्री. नाईक-निंबाळकर, अध्यक्ष  बागडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, राज्यमंत्री दीपक केसरकर, संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री परिणय फुके आदी उपस्थित होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.