चंदगड नगरपंचायतीसह 67 ग्रामपंचायतींसाठी 31 ऑगस्ट रोजी मतदान
नवनिर्मित चंदगड (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच राज्यातील विविध 14 जिल्ह्यांमधील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 31 ऑगस्ट 2019 रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
चंदगड नगरपंचायतीसाठी 31 ऑगस्ट रोजी मतदान
नवनिर्मित चंदगड (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 ऑगस्ट 2019 रोजी मतदान; तर 3 सप्टेंबर 2019 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. नामनिर्देशनपत्रे 3 ते 14 ऑगस्ट 2019 या कालावधीत दाखल करता येतील. 4, 10, 11 व 12 ऑगस्ट 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 16 ऑगस्ट 2019 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 22 ऑगस्ट 2019 ही नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाच्या निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे मागे घेता येतील. 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 3 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.67 ग्रामपंचायतींसाठी 31 ऑगस्ट रोजी मतदान
राज्यातील विविध 14 जिल्ह्यांमधील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 31 ऑगस्ट 2019 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. 1 ऑक्टोबर 2019 ते 13 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित अशा एकूण 67 ग्रामपंचायतींसाठी या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 9 ते 16 ऑगस्ट 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 19 ऑगस्ट 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 21 ऑगस्ट 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 3 सप्टेंबर 2019 रोजी होईल. सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 6, रायगड- 9, रत्नागिरी- 4, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 25, धुळे- 1, सातारा- 4, सोलापूर- 1, कोल्हापूर- 1, उस्मानाबाद- 3, अकोला- 2, यवतमाळ- 1, वर्धा- 5, आणि चंद्रपूर- 2. एकूण- 67.POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook===============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.