Wednesday, 24 July 2019

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मेळाव्यातील गैरवर्तन व छेडछाडीच्या घटनेची पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल

गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करण्याची सूचना करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांची छेडछाड प्रकरण  

नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित पुण्यात महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला पक्षाचे पदाधिकारी, आमदार, पालिकेतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. या गर्दीत पर्वती मतदारसंघातील पक्षाच्या दोन महिला पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी उभ्या होत्या. यावेळी रांगेत उभ्या असलेल्या महिलांचा पदर ओढणे, त्यांना चिमटे काढण्यासारखे लाजिरवाणे गैरप्रकार घडले. या मेळाव्यातील गैरवर्तन व छेडछाडीच्या घटनेची पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करण्याची सूचना करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. संबधित पिढीत भाजप महिला पदाधिकारी यांनी टाकलेली सोशल मिडीयावरील पोस्ट व घडल्याप्रकाराची माहीती घेऊन पक्षाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या दोन महिला पदाधिकारी यांच्यावरील अशा स्वरुपाच्या घटनेमुळे गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करण्याची सूचना करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाईचे पडसाद आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमटणार आहेत. या घटनेची संबधित सोशल मिडीयावरील पोस्ट मोठ्याप्रमाणात व्हायरल झालेली आहे. या प्रकारामुळे संतप्त भावना व प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्यक्त केल्या जात आहेत. हुल्लडबाजी करणाऱ्यांना शोधण्याचे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांपुढे आव्हान आहे. पुण्याचे नवनियुक्त पालकमंत्री पाटील यांच्याकडे नुकतीच पक्षाची प्रदेशाध्यपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच पुण्यात येत होते. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होणार असल्याने महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला भाजपचे शहरातील आमदार, शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संस्कृती जोपासण्याचे धडे देखील कार्यकर्त्यांना दिले. व्यासपीठावरील मान्यवरांना बसण्यासाठी सोफ्याची व्यवस्था करण्यात आली होती. व्यासपीठाखाली कार्यकर्ते साध्या खुर्च्यांवर बसले होते. चंद्रकांतदादांनी आपण सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आहोत, असे सांगत व्यासपीठावरील सोफा हलवायला लावला आणि तेथे साध्या खुर्च्या मांडण्यात आल्या. नेते आरामदायी सोफ्यावर आणि कार्यकर्ते खुर्चीत, असा प्रकार या मेळाव्यात टाळून त्यांनी उपस्थितांना उपदेश दिले. या तीन वर्षांमध्ये आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे. माझ्याकडे तीन वर्ष आहेत. चांगलं काम केले तर अजून तीन वर्षे भेटतील, असेही त्यांनी सांगितले. यानंतर मात्र तथाकथित अज्ञातांकडून महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी यांच्याशी गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी एकीचा पदर ओढण्याचा प्रयत्न केला तर दुसरया महिलेला चिमटा काढला. गर्दीत हे कृत्य नेमके कुणी केले हे त्यांच्या लक्षात आले नाही. या प्रकाराने या महीला घाबरल्या. तात्काळ काही उपस्थित पदाधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. मात्र, येथे पत्रकार आहेत. उगीच विषय वाढेल, असे त्यांना सांगण्यात आले. या महिलांनी मंगळवारी या घटनेबाबत पक्ष कार्यकर्त्यांच्या व्हॉटस ऍप ग्रुपवर संताप व्यक्त करीत या प्रकाराला वाचा फोडल्याने हा विषय चव्हाट्यावर आला. आपला पक्ष शिस्त पाळणारा आहे. मात्र, या घटनेनंतर पक्षात महिलांच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याची भावना या ग्रुपवर व्यक्त करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यात झालेल्या मेळाव्यात आमच्यासोबत छेडछाड झाली, असा आरोप भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला होता. तसेच हे प्रकरण बाहेर येऊ नये, यासाठीही काहींनी प्रयत्न केल्याचा आरोप या महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. महिलांसोबत गैरवर्तन करणारे निष्पन्न झाल्यास भाजपकडून कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान याप्रकाराबद्दल सदर महिलांकडे पक्षाने खुलासा मागून अधिक चौकशी केली आहे. गर्दीमुळे हुल्लडबाजी करणारे निष्पन्न झाले नसल्याने कोणावर संशय व्यक्त करता येत नाही. गैरकृत्य करणारे पक्षाचे कार्यकर्ते असतीलच असे नाही यामुळे कारवाई कोणावर करणार याबाबत स्थानिक पातळीवरील संघटनेत प्रश्न निर्माण झालेला आहे. पक्ष शिस्तीसाठी संबधित पदाधिकारी यांना समज देण्यात आलेली आहे. तर भविष्यात या घटनेचे परिणाम त्यांना भोगावे लागतील अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत. 

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची संबधित व्हायरल पोस्ट-

'नमस्कार, अतिशय संतापाने मी हा मेसेज ग्रुपवर टाकत आहे .कालच्या शिवशंकर सभागृहात आमच्या बाबतीत जो फालतू प्रकार झाला त्याचा मी जाहीर निषेध करते . काल सभागृहात अध्यक्ष मा .श्री चंद्रकांतदादांना भेटण्यासाठी आम्ही उभे होतो तेव्हा गर्दीत कुणीतरी तरी माझा पदर जोरात मुद्दाम खेचला. ही अतिशय संतापजनक बाब आहे. माझ्याबरोबर असलेल्या दुसऱ्या महिला पदाधिकाऱ्यालाही जोरात चिमटा घेतला. गर्दीत चेहरे आमच्या लक्षात आले नाहीत. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे की होता, असा प्रश्न काल मनात आला. जर महिलांची सुरक्षितता इथे जपली नाही तर काय उपयोग पक्षातील पुरुष पदाधिकाऱ्यांचा? काल आमच्या बाबतीत जे घडले ते इतर कुणाच्या बाबतीत घडू नये म्हणून मी मेसेज टाकत आहे. हा विषय आपले आमदार व सरचिटणीस बाबाशेठ यांच्या कानापर्यंत जावा हे महत्त्वाचे. आपल्या मतदारसंघात महिलांची योग्य दखल घेतलीच पाहिजे. कारण सगळ्या महिला प्रामाणिकपणे काम करतात कशाचीही अपेक्षा न ठेवता. अतिशय खेद वाटतो मला काल जो प्रकार आमच्या बाबतीत झाला तो आपल्याच मतदारसंघात. आम्ही जेव्हा प्रकार तिथे उभे असलेल्या काही मान्यवरांना सांगितला तेव्हा 'जावू दया सोडून दया. पत्रकार आहेत इथं. उगीच विषय वाढेल. पक्षाचे नाव जाईल असे सांगितले गेले. अशा मनोवृत्तीचा मला अतिशय संताप आला आहे..'


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================






No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.