बलदेव सिंग राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सिप्झचे विकास आयुक्त असलेले बलदेव सिंग यांची राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. बलदेव सिंग हे केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. राज्याच्या प्रशासनात ही त्यांनी या पूर्वी काम केलेले आहे. सध्या राज्य निवडणूक अधिकारी म्हणून अश्विनी कुमार हे काम पहात होते. आता त्याच्या जागी बलदेव सिंग यांची नियुक्ती केली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्य सरकारने मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागेवर बलदेव सिंग यांची नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात आपल्या कार्यशैलीमुळे अश्वनी कुमार यांच्याबाबत त्यांच्या कार्यालयात नाराजी पसरल्याचे वृत्त होते. आता विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे. निवडणूक यंत्रणा राबवण्याबरोबरच आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर अहवाल मागवणे आदी महत्त्वाची कामे या कार्यालयाकडे असतात. या पाश्र्वभूमीवर अश्वनी कुमार यांच्या जागेवर बलदेव सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बलदेव सिंग हे १९८९ च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.