आमदार गणपतराव देशमुख यांची सक्रीय राजकारणातून निवृत्ती
महाराष्ट्र विधिमंडळातील जेष्ठ सदस्य आणि तब्बल ५५ वर्षे सांगोला मतदारसंघाचे आमदार गणपतराव देशमुख यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नाहीत. प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.सांगोला मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला असल्याने पक्षातील नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याचे गणपतराव देशमुख यांनी स्पष्ट केले. सांगोल्याचा दुष्काळ हटवण्यासाठी टेंभु म्हैसाळ सहअनेक योजनांचे पाणी आणण्यात आपल्याला यश आले असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. गणपतराव देशमुख यांनी १९६२ साली पहिली निवडणूक लढवली. त्यानंतर आजवर १२ निवडणुकांमध्ये विजय मिळवला. देशमुख यांना आपल्या संसदीय राजकारणाच्या कारकिर्दीत केवळ १९७२ आणि १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले होते. त्यापैकी १९७२ साली झालेल्या पराभवानंतर १९७४ च्या पोटनिवडणुकीत पुन्हा विजयी झाले होते. प्रदिर्घ कारकिर्द असलेले गणपतराव देशमुख आता आगामी विधानसभा लढवणार नसल्याने शेकापमध्ये मोठी अस्वस्थता आहे. सध्या सुरु असलेल्या पक्षबदलावर गणपतराव देशमुख यांनी हे सत्तेसाठी पक्षबदल सुरू असल्याची टीका केली. असे पक्ष बदल करणारे कायमस्वरूपी राहत नसल्याचेही त्यांनी सांगितले. १९६२ पासून सांगोला तालुक्यातील जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली. आता शरीर साथ देत नसल्याने २०१९ च्या निवडणुकीत शेकापकडून नव्या उमेदवाराला संधी देण्याची वेळ आली आहे. संपूर्ण तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची संघटना मजबूत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल बोलत असताना आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षाने शेकापला मदत केल्याचे गणपतराव देशमुख यांनी स्पष्ट केले़ १९५२ पासून सांगोला हा शेकापचाच बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २०१९ च्या निवडणुकीत शेकापकडे उमेदवारीची मागणी करत असली तरी याबाबत मी वैयक्तिक निर्णय घेऊ शकत नाही. शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीला उमेदवारी द्यायची की नाही? याचा निर्णय घेतील. पन्नास वर्षांहून अधिक काळ जनतेने मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली़ त्याबद्दल जनतेचे आभार. परंतु २०१९ च्या निवडणुकीतही शेतकरी कामगार पक्ष देईल तो उमेदवार मोठ्या मताधिक्क्यांनी विधानसभेत पाठवून पुन्हा एकदा सांगोला हा शेतकरी कामगार पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला आहे हे सिद्ध करून दाखवू असे आवाहन आ.गणपतराव देशमुख यांनी केले आहे. सन २०१९ च्या निवडणुकीत शेकापचा नवीन कार्यक्षम आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाणीव असणारा उमेदवार मी ठरविणार आहे. उमेदवारांच्या नावावर एकमत न झाल्यास तालुक्यातील प्रत्येक गावातून शेतकरी कामगार पक्षाच्या एका कार्यकर्त्यांचे मतदान घेऊन शेकापचा नवीन उमेदवार ठरविणार असल्याचे आ.देशमुख यांनी जाहीर केले. कोळा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook===============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.