प्रकाश आंबेडकरांना आव्हान देत लक्ष्मण माने यांची वेगळी चुल
प्रकाश आंबेडकरांना आव्हान देत वंचितमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानें यांनी वेगळी चुल मांडली असून वंचितला दुसरा पर्यायी नवा पक्ष "महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी"ची घोषणा केली आहे. "महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी" असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानें यांनी नव्या पक्षाची स्थापना केल्याने वंचित बहुजन आघाडीची चांगीलीच गोची होणार आहे. येत्या 29 जुलैला पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आघाडीचा पहिला निर्धार मेळावा पार पडणार असून माजी न्यायमूर्ती पीबी सावंत यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या विचारांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. विधानसभेला डाव्या आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचेही लक्ष्मण मानें यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील चूक आता करायची नाही. भाजपचा पराभव करण्याऐवजी त्यांच्याच 12-12 जागा निवडून आल्या, त्यामुळे मला अपराधीपणा वाटत होता. जातीयवादी आणि धार्मिक संघटना बरोबर आम्ही जाणार नाही. भाजप युतीला हरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मातंग, धनगर, रिपब्लिकन ओबीसी संघटनांबरोबर आमची चर्चा सुरू असल्याचेही माने म्हणाले. किरकोळ स्वार्थासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार विक्रीला काढणार नाही. बाबासाहेबांचे आम्ही सारेच वारसदार असल्याचे माने म्हणाले. मुस्लीम बांधवांना जय श्री राम म्हणून मारहाण केली जाते ही आराजकता आहे. उद्या तुमचीही घरे पेटल्याशिवाय राहणार नाहीत, उद्या ही वेळ तुमच्यावर येऊ शकते, असा इशारा मानेंनी दिला. अब्दुल रहमान अंजरिया यांच्या अब्रूनुकसानीच्या दाव्यावर बोलताना, मानेंनी वकिलांशी बोलून नोटीसला उत्तर देणार असल्याचे म्हटले. प्रकाश आंबेडकरांच्या काँग्रेससोबत जाण्याच्या भूमिकेवरही मानेंनी टीका केली. ते म्हणाले, हा बाळासाहेबांचा डावपेचाचा भाग आहे. काँग्रेस कधीच मान्य करणार नाही, अशी मागणी करायची आणि बोलने तोडून टाकायचे, हा विचारसरणीचा नाहीतर डावपेचाचा भाग आहे. वंचित आघाडी भाजपाची बी टीम असल्याचे त्यांच्या वर्तनाने सिद्ध केले आहे. लोकसभेत आमची एकही जागा निवडून आली नाही, याउलट काँग्रेसलाही फायदा झाला नाही, फायदा हा भाजपचा झाला आहे. त्यामुळे लोक बी टीम म्हणाले तर राग यायचे कारण नाही. आकडे सांगतात की तुम्ही तिकडे मदत केली, असेही माने म्हणाले.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook===============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.