Friday, 19 July 2019

वंचितचा प्रभाव व मतविभाजन रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून डमी उमेदवार घुसविण्याचा डाव!

बहुजन वंचित आघाडीची स्वबळाचीच तयारी; पहिली यादी 30 जुलैला जाहीर होणार 


काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही इच्छूकांची पाऊले बहुजन वंचित आघाडीकडे वळली आहेत. लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला ज्या विधानसभा मतदारसंघात जास्त मते प्राप्त झालेली आहेत अशा मतदारसंघावर प्रामुख्याने काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छूकांचा डोळा आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छूकांकडून त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांना पुढे केले जात आहे. तर काही मात्तबर वंचितमुळे मतविभाजन होऊ नये यासाठी स्वताचा कार्यकर्ताच डमी उमेदवार म्हणून देण्याची रणनीती आखण्यात येत आहे. नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत ५२ विधानसभा मतदारसंघात प्रभावी मते घेतली आहेत. तर 66 विधानसभा मतदारसंघात किमान 20 हजारहून जास्त मते घेतली आहेत. अशा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसणार आहे. हे गृहीत धरूनच वंचितचा प्रभाव व मतविभाजन रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून डमी उमेदवार घुसविण्याचा डाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा वंचितच्या पदाधिकारी यांचा आरोप आहे.  दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी 30 जुलैला जाहीर होणार आहे. वंचित आघाडी  स्वबळाची तयारी करीत असून महाआघाडीत सामील होण्याची शक्यात धूसर आहे. पहिल्या यादीत विदर्भातील उमेदवारांचा समावेश असणार आहे. विदर्भातील उमेदवारांच्या मुलाखतीही पूर्ण झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूकीची पुर्वतयारी म्हणून इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. 13 ते 16 जुलैपर्यंत विदर्भातील सर्व मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर मराठवाड्यातील मतदारसंघासाठी मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर मुलाखती वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटर्री बोर्ड सदस्य अॅड अण्णाराव पाटील, अशोकभाऊ सोनोने आणि रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतल्या जाणार आहे. मराठवाड्याकरीता मुलाखतींचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -  उस्मानाबाद - 21 जुलै 2019, बीड - 22 जुलै 2019, लातूर - 23 जुलै 2019, नांदेड - 24 जुलै 2019, हिंगोली - 25 जुलै 2019, परभणी - 26 जुलै 2019, औरंगाबाद - 27 जुलै 2019, जालना - दि.28 जुलै 2019 वरील तारखेला प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी सकाळी 10.00 वाजता पासून मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखतीत इच्छुकांना मतदारसंघातील सामाजिकदृष्ट्या जातीय समीकरण विचारले जाते तर राजकीयदृष्ट्या यश कसे मिळू शकते याचा अंदाज व शक्यतेबाबत प्रश्न विचारण्यात येत आहेत. 
     दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मधील निवडणुकीत 52 विधानसभा मतदारसंघात वंचितचा प्रभाव राहिलेला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेला मतदानानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये वंचित आघाडीला असाच कल राहिला तर महाराष्ट्रातील १४ मतदारसंघात यश मिळू शकेल अशा स्वरूपाचे मतदान या निवडणुकीत झालेले आहे. तर महाराष्ट्रातील 52 मतदारसंघात दुसरा व तिसरा क्रमांकावरील मते प्राप्त करू शकेल यामध्ये 30 विधानसभा मतदारसंघात महाआघाडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यास कारणीभूत ठरेल. तर 48 मतदारसंघात स्थानिक पातळीवरील निवडणुकीत महत्वपूर्ण राजकीय घडामोडीस पात्र ठरेल. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीला 66 विधानसभा मतदारसंघात 20 हजार ते 1 लाख मते मिळालेली आहेत. आणि लोकसभा निवडणूक 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीला 78  विधानसभा मतदारसंघात 10 हजार ते 20 हजार मते मिळालेली आहेत.
वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणूक 2019 मध्ये     
20 हजार ते लाख मते मिळालेले 66 विधानसभा मतदारसंघ
मतदारसंघ क्र.
मतदारसंघ नाव
वंचित मते
107
107 – औरंगाबाद मध्य
99450
109
109 – औरंगाबाद पूर्व
92347
286
286 – खानापूर
78024
108
108 – औरंगाबाद पश्चिम
71239
31
31 – अकोला पूर्व
61712
29
29 – बाळापूर
56981
111
111 – गंगापूर
56023
287
287 – तासगाव-कवठेमहाकाळ
54787
288
288 – जत
53083
32
32 – मुर्तिजापूर
52230
74
74 – चिमुर
50989
33
33 – रिसोड
44400
278
278 – हातकणंगले
42325
285
285 – पळूस खडेगाव
40169
28
28 – अकोट
39177
86
86 – नांदेड उत्तर
38795
26
26 – खामगाव
38732
281
281 – मिरज
38506
93
93 – कळमनुरी
38442
27
27 – जळगाव(जामोद)
36688
112
112 – विजापूर
35462
105
105 – कणाद
34263
72
72 – बल्लारपूर
33759
94
94 – हिंगोली
33473
92
92 – बसमत
33348
97
97 – गंगाखेड
32806
282
282 – सांगली
32780
24
24 – सिंदखेडराजा
30552
247
247 – मोहोळ
30145
252
252 – पंढरपूर
29323
84
84 – हदगाव
28670
34
34 – वाशिम
28351
251
251 – सोलापूर दक्षिण
28092
280
280 – शिरोळ
27913
250
250 – अक्कलकोट
27625
89
89 – नायगाव
27530
249
249 – सोलापूर शहर मध्य
27468
73
73 – ब्रम्हपुरी
27283
87
87 – नांदेड दक्षिण
27222
248
248 – सोलापूर शहर उत्तर
26870
98
98 – पाथरी
26829
90
90 – देगलूर
26339
95
95 – जिंतूर
26079
85
85 – भोकर
26020
173
173 – चेंबुर
25146
22
22 – बुलढाणा
24917
123
123 – नाशिक पूर्व
24776
70
70 – राजुरा
24480
126
126 – देओली
24459
30
30 – अकोला पश्चिम
23741
235
235 – लातूर शहर
22654
20
20 – मुक्ताईनगर
22636
82
82 – उमरखेड
22223
242
242 – उस्मानाबाद
22058
99
99 – परतूर
21700
23
23 – चिखली
21658
96
96 – परभणी
21335
88
88 – लोह
21184
100
100 – घनसावंगी
21085
208
208 – वडगाव शेरी
21084
71
71 – चंद्रपूर
21048
232
232 – केज
20908
125
125 – नाशिक पश्चिम
20784
21
21 – मलकापूर
20702
233
233 – परळी
20683
241
241 – तुळजापूर
20412

mr. Chandrakant bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

https://www.esakal.com/maharashtra/wanchit-bahujan-aghadi-first-list-will-be-announced-30th-july-200785

http://mymarathi.net/feature-slider/prab-news-service-2/

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================





No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.