Saturday 20 July 2019

महाराष्ट्राचे राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्यासह ५ राज्यपालांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपुष्टात येणार

सहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल; आणखी पाच राज्यांत होणार लवकरच बदल 


राज्यसध्याचे राज्यपालनवे राज्यपाल
उत्तर प्रदेशराम नाईक (कार्यकाळ पूर्ण)आनंदीबेन पटेल
पश्चिम बंगालकेसरीनाथ त्रिपाठी (कार्यकाळ पूर्ण)जगदीप धनखर
मध्य प्रदेशआनंदीबेन पटेल (बदली)लालजी टंडन
बिहारलालजी टंडन (बदली)फगु चौहान
त्रिपुराकप्तान सिंह सोलंकी (कार्यकाळ पूर्ण)रमेश बैंस
नागालँडपद्मनाभ आचार्य (कार्यकाळ पूर्ण)आरएन रवी
महाराष्ट्राचे राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्यासह ५ राज्यपालांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपुष्टात येत असल्याने पाच राज्यांत होणार लवकरच बदल होऊन नवे राज्यपाल नियुक्त केले जाणार आहेत. नव्या राज्यपाल नियुक्तीमध्ये शिवसेनेच्या शिफारसीनुसार कोणाची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. सहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल नियुक्त केले असून आनंदीबेन यांच्यावर यूपीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. दरम्यान पुढच्या दोन महिन्यांत आणखी पाच राज्यांच्या राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल के. विद्यासागर राव २९ ऑगस्ट रोजी, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा ३० ऑगस्ट रोजी, कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला ३१ ऑगस्ट रोजी, राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह ३ सप्टेंबरला तर केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम ५ सप्टेंबरला आपला कार्यकाळ पूर्ण करत आहेत.  राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्यांत नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी दोन राज्यांतील राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मध्य प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल आनंदीबेन पटेल व बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांचा समावेश आहे. या दोघांनाही अनुक्रमे उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपसाठी महत्त्वाच्या असलेल्या पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धनखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनातून आज ही माहिती देण्यात आली. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, प. बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी, त्रिपुराचे राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी व नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होत आहे. या चारही राज्यांत नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. बिहार व मध्य प्रदेशमधील विद्यमान राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बिहारची जबाबदारी फगु चौहान यांच्याकडं देण्यात आली आहे. तर, त्रिपुरा व नागालँडची जबाबदारी अनुक्रमे रमेश बैंस व आर. एन. रवी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
=============================
==


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.