आगामी विधानसभा निवडणूकीत महायुतीत 32 जागांवर बंडखोरीची शक्यता
37 मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या असंतुष्टांवर भाजपकडून जाळे
लोकसभा निवडणूक निकालाच्या आधारावरच भाजप-सेनेचे 230 प्लस मिशन असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण केवळ 56 विधानसभा मतदारसंघात महाआघाडीला मताधिक्य लोकसभा निवडणुकीत मिळालेले आहे. तर 232 विधानसभा मतदारसंघात महायुतीला मताधिक्य लोकसभा निवडणुकीत मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत भाजप-सेनेचे 230 प्लस जागा मिळतील. 230 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उदिष्ट असल्याचे त्यांच्याकडून वारंवार सांगितले जाते. वास्तविकपणे भाजपने सर्वेक्षण केलेल्या संस्थांचे वेगळेच अंदाज आहेत. या सर्वेक्षणानुसार आगामी विधानसभा निवडणूकीत महायुतीत 32 जागांवर बंडखोरीची शक्यता आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरूद्ध सेना अशी सेनेच्या बहुतांश मतदारसंघात एकमेकाविरुद्ध लढती झालेला होत्या हे पारंपारिक मतदारसंघच जागावाटपाचे कळीचे मुद्दे आहेत. तर या अहवालाच्या पार्श्वभूमीवर 37 मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या असंतुष्टांवर भाजपकडून जाळे टाकले आहे. महाआघाडीतील बंडखोरांना चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मनसेचा सहभाग देखील भाजपने गृहीत धरलेला आहे. मनसेसह वंचितला महाआघाडीत सामावून घेतले तरीही काँग्रेस व राष्ट्रवादी महाआघाडी बहुमत दूरच राहणार असल्याची शक्यता अहवालात वर्तवली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला 232 विधानसभा मतदारसंघात जरी मताधिक्य मिळाले असले तरी उर्वरित 56 विधानसभा मतदारसंघात काही भाजप व सेनेच्या काही विद्यमान आमदार व मंत्र्यांचे देखील मतदारसंघ धोक्यात असल्याचे यांच्या मिशन 230 प्लस वरून दिसून येत आहे. यामध्ये दस्तुरखुद्द राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघाचा देखील समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला 30 हजाराहून जास्त मताधिक्य मिळाले आहे. ज्या लोकसभा क्षेत्रात नगर पंचायत, नगर परिषदा, जिल्हा परिषद, मनपा, 5 आमदार, राज्याचे अर्थमंत्री, आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भाजपचे होते तिथे काँग्रेसने जातीय समीकरण आणि सत्ताधाऱ्यांची गाफील यंत्रणा या जोरावर आश्चर्यकारक विजय मिळविला. 6 विधानसभाक्षेत्रात विद्यमान काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना मिळालेल्या मतांच्या आघाडीचा विचार केला तर वणी आणि आर्णी या विधानसभा क्षेत्रात भाजपला जास्त मताधिक्य आहे. मात्र वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा या विधानसभात धानोरकरांना प्रचंड मताधिक्य मिळालेले आहे. विधानसभा निवडणुकीचा साधारण विचार केला तर भाजपसाठी चंद्रपूर लोकसभेचा निकाल धोक्याची महाघंटा आहे या परीस्थितीकडे मात्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून डोळेझाक केली जात आहे. दरम्यान २०१९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 232 विधानसभा मतदारसंघात महायुतीला मताधिक्य लोकसभा निवडणुकीत मिळाले आहे. तर 56 विधानसभा मतदारसंघात महाआघाडीला मताधिक्य मिळालेले आहे. बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे मतविभाजन होऊन त्याचा लाभ थेट महायुतीला झालेला आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या आधारावर जर बहुजन वंचित आघाडीला महाआघाडीत सामावून घेतले तर 45 विधानसभा मतदारसंघात अधिक प्रमाणात यश व मतांचा फरक लाभात होऊ शकेल. निकालाच्या तुलनात्मकदृष्ट्या विचार केल्यास मनसेसह बहुजन वंचित आघाडीला महाआघाडीत सामावून घेतले तर 101 विधानसभा मतदारसंघात महाआघाडीला यश मिळेल. तर 187 विधानसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळू शकणार आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या आधारावर अशी परिस्थिती असून महाआघाडीसह भाजप व शिवसेनेत जागा वाटप देखील कळीचा मुद्दा ठरणार आहे. भाजप व सेनेत आगामी विधानसभा निवडणूकीत महायुतीत 32 जागांवर बंडखोरीची शक्यता असून गेल्या विधानसभा निवडणुकीतील मते व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालावरून अशी स्थिती निर्माण होऊ शकते. विरोधकांकडे रणनीतीचा अभाव आहे. पराभवाने प्रमुख पदाधिकारी यांचे खच्चीकरण झालेले असून सत्तांतर होईल असा आशावाद राहिलेला नसल्याचे वातावरण आहे. विरोधक आत्मविश्वासाने निवडणुकीस सामोरे गेले नाही तर भाजप-सेनेचे 230 प्लस मिशनचे उद्धिष्ट साध्य होऊ शकेल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानात राज्यात महायुतीला 2 कोटी 75 लाख 01 हजार 203 मते मिळाली आहेत. तर महाआघाडीला 1 कोटी 90 लाख 16 हजार 523 मते प्राप्त झालेली आहेत. बहुजन वंचित आघाडीला 41 लाख 32 हजार 602 तर इतर पक्ष व अपक्षांना एकूण 33 लाख 04 हजार 193 मते मिळाली आहेत. 48 लाख 8 हजार 766 मतदारांनी नकारात्मक मतदान करून कोणताही उमेदवार लायक नसल्याचे मतदानातून अधोरेखित केले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण 5 कोटी 44 लाख 43 हजार 287 मतदारांनी मतदानात सहभाग घेतला होता. लोकसभा निवडणुकीत मतांचे प्रमाण पाहिल्यास महायुतीचे मतांचे प्रमाण 50.51 टक्के आहे. तर महाआघाडीचे मतांचे प्रमाण 34.93 टक्के आहे. आणि वंचितचे मतांचे प्रमाण 7.59 टक्के आहे. तर नोटाचे मतांचे प्रमाण 0.9 टक्के आहे. तसेच इतरांचे मतांचे प्रमाण 6.07 टक्के आहे.लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर काँग्रेसने राज्यात पक्षीय संघटनेत बदल केले असून नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या बरोबर जातीय समीकरण लक्षात घेऊन 5 कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केले आहेत. महाआघाडीमध्ये राष्ट्रवादीसह इतर पक्षांना कसे सामावून घेतले जाते, जागावाटप कशाप्रकारे होईल यावरच आगामी विधानसभा निवडणुकीतील यशाचे प्रमाण अवलंबून राहणार आहे. राष्ट्रवादीची जागावाटपातील भूमिका आक्रमक राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने नव्या पिढीला न्याय देण्याचे ठरविले असल्याने जुन्या जाणत्यांना घराचा रस्ता दाखविला जाणार असल्याने त्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय वारसदारांच्या दुसरया पिढीतील संघर्ष आता तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचलेला आहे. अट्टाहासाने मावळ लोकसभा मतदारसंघातून युवा नेते पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली परिणाम सर्वासमोर आहेत. पार्थ पवार यांनी निवडणुकीपूर्वी खर तर विधानसभा कामकाज अभ्यास व विधिमंडळ अधिवेशन पाहणी दौरा केला होता मात्र निवडणूक लोकसभेची लढवली. राष्ट्रवादीने नव्या पिढीला न्याय देण्याचे ठरविले असल्याने बारामती विधानसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय ते स्वतः घेतील, राष्ट्रवादीमध्ये कोणावर जबरदस्तीने सांगितले जात नसल्याचे सूचक विधान पार्थ पवार यांच्या निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर त्यांनी दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार इतरत्र अथवा विधानपरिषदेचा मार्ग स्वीकारतील असाही अंदाज कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. कारण दुसरे नातू रोहित पवार हे देखील या वेळी विधानसभा निवडणूक लढविण्यावर ते ठाम आहेत. कर्जत-जामखेड, हडपसर, खडकवासला शिरूर मतदारसंघात त्यांनी चाचपणी केली असून पक्षांतर्गत विरोध टाळण्यासाठी ऐनवेळी मतदारसंघाची निवड जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियातील आभासी नेतृत्व म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. पवार कुटुंबातील सत्ता संघर्षामुळे इतर राजकीयदृष्ट्या निर्णयावर त्याचा विपरीत परिणाम निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर निकालापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचा दुष्काळी दौरा करून सर्व स्थिती जाणून घेतली आहे. त्यांच्या बरोबर एकाच नातूला बरोबर घेतले होते. याबाबत दुजाभाव असल्याच्या शक्यतेची चर्चा सोशल मिडीयावर होती. दुष्काळी पाहणी बरोबरच राजकीय घडामोडींची सूक्ष्मपणे पाहणी केली असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या जागांवर दावा करावयाचा आहे हे त्यांनी निश्चित केले असल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. महाआघाडीत कोणत्या घटकपक्षांना किती व कोणत्या जागा द्याव्यात. मनसेला सोबत घेताना महायुतीच्या प्रबळ जागांवरून किती मते घेऊन मतविभाजनाचा लाभ होऊ शकतो याचा सर्व अभ्यास केला असल्याचे वृत्त असले तरी जागावाटपासह उमेदवारी देण्याच्या निर्णयामुळे असंतुष्टांची कशी समजूत काढतात यावर सर्व राजकीय गणिते अवलंबून आहेत. दरम्यान २००९ च्या लोकसभा निवडणूकीत राज्यातील ४८ मतदारसंघांचे काँगेस २६ आणि राष्ट्रवादी २२ असे मागील लोकसभा निवडणुकीतील जागांचे वाटप झाले होते. त्यावेळी जिल्हा परिषदा, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालावर आधारित अधिक जागांची मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जास्त जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष शेवटी एकत्रीतपणे लढले होते. या वेळी १६ ठिकाणी राष्ट्रवादीला क्रमांक २ च्या मतांवर समाधान मानावे लागले तर कॉंग्रेसला २४ ठिकाणी राष्ट्रवादीला क्रमांक २ च्या मतांवर समाधान मानावे लागले होते. यानंतर मात्र विधानसभा आणि अलीकडेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात यामुळे दोन्ही पक्षांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये आघाडी करण्याचे निश्चित केले आहे. गेल्या २०१४ विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे दोन्ही पक्षांनी निवडणूक लढवली होती यामध्ये काँग्रेसने 42 जागांवर तर राष्ट्रवादीने 41 जागांवर यश संपादन केले होते. इतर जागांवर क्रमांक दोन ची मते प्राप्त केलेला निकष मानून संभाव्य जागा वाटप निश्चित करण्यात आले आहे. क्रमांक दोन ची मते प्राप्त केलेल्या जांगामध्ये ८ मतदारसंघात एकमेकाविरुद्ध चुरशीची लढत झाली होती यामध्ये केवळ 1 इंदापूर येथील विद्यमान आमदार असलेली जागा सोडण्याची प्राथमिकदृष्ट्या तयारी राष्ट्रवादीची आहे. इतर जांगावर क्रमांक 1 व क्रमांक २ ची मते प्राप्त करणार्यांना प्राध्यान्य देण्यावर सहमती दर्शवली आहे. या प्रमाणे 169 जागांवर दोन्ही पक्षांची सहमती झाली असून ऊर्वरित 119 जागांवर इतर मित्र पक्ष व नंतर वाटाघाटी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. 89 कॉंग्रेस संभाव्य जागा निश्चित आहेत तर 80 राष्ट्रवादी संभाव्य जागा निश्चित केलेल्या आहेत यामध्ये 169 दोन्ही पक्षांची सहमती असून 119 जागांबाबत इतर मित्रपक्षांमते जाणून घेतल्यानंतर वाटाघाटी करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीने आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी 50-50 चा फॉर्म्युला वापर करत समसमान जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव दिला आहे. जागावाटपासंबंधी राष्ट्रवादीकडून नवा फॉर्म्युला मांडण्यात आला असून, काँग्रेसला हा फॉर्म्युला मान्य नसल्याचे वृत्त आहे. 2014 च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांसह ज्या जागांवर दोन क्रमांकावर ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या जागा त्या पक्षाला मिळाव्यात, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. तसेच मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा त्या-त्या पक्षाकडे राहतील, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. काँग्रेसच्या या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला 106 आणि राष्ट्रवादीकडे 95 जागा जातील. तर उरलेल्या 87 जागांच्या वाटपावर मित्रपक्षांसह चर्चा होऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी 2009 मधील विधानसभा निवडणूक आव्हानात्मक असल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 174 तर राष्ट्रवादीने 114 जागा लढवल्या होत्या. मात्र, 2014 मध्ये हे दोन्ही पक्ष वेगळे लढले होते आणि त्यांना सत्ता गमवावी लागली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 1999 पासून आघाडी आहे. परंतु, 2014 ची विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी वेग-वेगळी लढवली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसने 25, राष्ट्रवादीने 20 आणि इतर सहकारी पक्षांनी 3 जागांवरून निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीने त्यापैकी 4 आणि काँग्रेसने केवळ एका जागेवरून विजय मिळवला. तत्पूर्वी 2014 च्या लोकसभेत काँग्रेसला केवळ दोन आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. एकूणच राष्ट्रवादीचा निकाल काँग्रेसपेक्षा सरस राहिलेला आहे. शिवसेना-भाजपचा मुकाबला करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभेची निवडणूक समविचारी पक्षांना एकत्र सामावून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीसह, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, जनता दल, रिपब्लिकन पक्षाचे विविध गट यांना स्थानिक पातळीवरील प्रभावाप्रमाणे जागा सोडण्यात येणार आहे. चर्चेपुर्वीच वंचित बहुजन आघाडीने वेगळाच सूर लावलेला आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडी करण्याचा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा मनोदय दिसून येत नाही.
लोकसभा निवडणुकीत 56 विधानसभा मतदारसंघात महाआघाडीला मताधिक्य मिळालेल्या मतदारसंघाची यादी खालीलप्रमाणे-
महाआघाडी मताधिक्य मिळालेले मतदारसंघ
|
|
अ.क्र.
|
विधानसभा मतदारसंघ
|
1
|
1 – अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ
|
2
|
4 – नवापूर विधानसभा मतदारसंघ
|
3
|
5 – साक्री
|
4
|
38 – अमरावती
|
5
|
39 – तिवसा
|
6
|
40 – दर्यापूर
|
7
|
41 – मेळघाट
|
8
|
57 – नागपूर उत्तर
|
9
|
69 – अहेरी
|
10
|
70 – राजुरा
|
11
|
71 – चंद्रपूर
|
12
|
72 – बल्लारपूर
|
13
|
75 – वरोरा
|
14
|
85 – भोकर
|
15
|
86 – नांदेड उत्तर
|
16
|
87 – नांदेड दक्षिण
|
17
|
96 – परभणी
|
18
|
98 – पाथरी
|
19
|
114 – मालेगाव मध्य
|
20
|
122 – दिंडोरी
|
21
|
128 – डहाणू
|
22
|
129 – विक्रमगड
|
23
|
133 – वसई
|
24
|
136 – भिवंडी पश्चिम
|
25
|
137 – भिवंडी पूर्व
|
26
|
149 – मुंब्रा
|
27
|
171 – मानखुर्द शिवाजीनगर
|
28
|
176 – वांद्रे पूर्व
|
29
|
178 – धारावी
|
30
|
184 – भायखळा
|
31
|
186 – मुंबादेवी
|
32
|
189 – कर्जत
|
33
|
192 – अलिबाग
|
34
|
193 – श्रीवर्धन
|
35
|
195 – जुन्नर
|
36
|
196 – आंबेगाव
|
37
|
197 – खेड आळंदी
|
38
|
198 – शिरुर
|
39
|
200 – इंदापूर
|
40
|
201 – बारामती विधानसभा मतदारसंघ
|
41
|
202 – पुरंदर
|
42
|
203 – भोर
|
43
|
216 – अकोले
|
44
|
244 – करमाळा
|
45
|
245 – माढा
|
46
|
247 – मोहोळ
|
47
|
252 – पंढरपूर
|
48
|
253 – सांगोला
|
49
|
256 – वाई
|
50
|
257 – कोरेगाव
|
51
|
259 – कराड
|
52
|
262 – सातारा
|
53
|
280 – शिरोळ
|
54
|
283 – इस्लामपूर
|
55
|
284 – शिराळा
|
56
|
285 – पळूस कडेगाव
|
लोकसभा निवडणुकीत 132 विधानसभा मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळालेल्या मतदारसंघाची यादी खालीलप्रमाणे-
महायुतीला मताधिक्य मिळालेले मतदारसंघ
|
|
अ.क्र.
|
विधानसभा मतदारसंघ
|
1
|
2 – शहादा
|
2
|
3 – नंदुरबार
|
3
|
6 – धुळे ग्रामीण
|
4
|
7 – धुळे शहर
|
5
|
8 – सिंदखेडा
|
6
|
9 – शिरूर
|
7
|
10 – चोपडा
|
8
|
11 – रावेर
|
9
|
12 – भुसावळ
|
10
|
13 – जळगाव शहर
|
11
|
14 – जळगाव ग्रामीण
|
12
|
15 – अमळनेर
|
13
|
16 – एरंडोल
|
14
|
17 – चाळीसगाव
|
15
|
18 – पाचोरा
|
16
|
19 – जामनेर
|
17
|
20 – मुक्ताईनगर
|
18
|
21 – मलकापूर
|
19
|
22 – बुलढाणा
|
20
|
23 – चिखली
|
21
|
24 – सिंदखेडराजा
|
22
|
25 – मेहकर
|
23
|
26 – खामगाव
|
24
|
27 – जळगाव(जामोद)
|
25
|
28 – अकोट
|
26
|
29 – बाळापूर
|
27
|
30 – अकोला पश्चिम
|
28
|
31 – अकोला पूर्व
|
29
|
32 – मुर्तिजापूर
|
30
|
33 – रिसोड
|
31
|
34 – वाशिम
|
32
|
35 – कारंजा
|
33
|
36 – धामणगाव रेल्वे
|
34
|
37 – बडनेरा
|
35
|
42 – अचलपूर
|
36
|
43 – मोर्शी
|
37
|
44 – आर्वी
|
38
|
45 – देवळी
|
39
|
46 – हिंगणघाट
|
40
|
47 – वर्धा
|
41
|
48 – काटोल
|
42
|
49 – सावनेर
|
43
|
50 – हिंगणा
|
44
|
51 – उमरेड
|
45
|
52 – नागपूर दक्षिण-पश्चिम
|
46
|
53 – नागपूर दक्षिण
|
47
|
54 – नागपूर पूर्व
|
48
|
55 – नागपूर मध्य
|
49
|
56 – नागपूर पश्चिम
|
50
|
58 – कामठी
|
51
|
59 – रामटेक
|
52
|
60 – तुमसर
|
53
|
61 – भंडारा
|
54
|
62 – साकोली
|
55
|
63 – अर्जुनी मोरगाव
|
56
|
64 – तिरोरा
|
57
|
65 – गोंदिया
|
58
|
66 – आमगाव
|
59
|
67 – आरमोरी
|
60
|
68 – गडचिरोली
|
61
|
73 – ब्रम्हपुरी
|
62
|
74 – चिमुर
|
63
|
76 – वणी
|
64
|
77 – राळेगांव
|
65
|
78 – यवतमाळ
|
66
|
79 – दिग्रस
|
67
|
80 – आर्णी
|
68
|
81 – पुसद
|
69
|
82 – उमरखेड
|
70
|
83 – किनवट
|
71
|
84 – हदगाव
|
72
|
88 – लोह
|
73
|
89 – नायगाव
|
74
|
90 – देगलूर
|
75
|
91 – मुखेड
|
76
|
92 – बसमत
|
77
|
93 – कळमनुरी
|
78
|
94 – हिंगोली
|
79
|
95 – जिंतूर
|
80
|
97 – गंगाखेड
|
81
|
99 – परतूर
|
82
|
100 – घनसावंगी
|
83
|
101 – जालना
|
84
|
102 – बदनापूर
|
85
|
103 – भोकरदन
|
86
|
104 – सिलोड
|
87
|
105 – कणाद
|
88
|
106 – फुलंब्री
|
89
|
107 – औरंगाबाद मध्य
|
90
|
108 – औरंगाबाद पश्चिम
|
91
|
109 – औरंगाबाद पूर्व
|
92
|
110 – पैठण
|
93
|
111 – गंगापूर
|
94
|
112 – विजापूर
|
95
|
113 – नांदगाव
|
96
|
115 – मालेगाव बाह्य
|
97
|
116 – बागलाण
|
98
|
117 – कळवण
|
99
|
118 – चांदवड
|
100
|
119 – येवला
|
101
|
120 – सिन्नर
|
102
|
121 – निफाड
|
103
|
123 – नाशिक पूर्व
|
104
|
124 – नाशिक मध्य
|
105
|
125 – नाशिक पश्चिम
|
106
|
126 – देवळाली
|
107
|
127 – इगतपूरी
|
108
|
130 – पालघर
|
109
|
131 – बोईसर
|
110
|
132 – नालासोपारा
|
111
|
134 – भिवंडी ग्रामीण
|
112
|
135 – शहापूर
|
113
|
138 – कल्याण पश्चिम
|
114
|
139 – मुरबाड
|
115
|
140 – अंबरनाथ
|
116
|
141 – उल्हासनगर
|
117
|
142 – कल्याण पूर्व
|
118
|
143 – डोंबिवली
|
119
|
144 – कल्याण ग्रामीण
|
120
|
145 – मीरा-भाईंदर
|
121
|
146 – ओवळा-माजीवडा
|
122
|
147 – कोपरी-पाचपाखाडी
|
123
|
148 – ठाणे
|
124
|
150 – ऐरोली
|
125
|
151 – बेलापूर
|
126
|
152 – बोरीवली
|
127
|
153 – दहिसर
|
128
|
154 – मागाठणे
|
129
|
155 – मुलुंड
|
130
|
156 – विक्रोळी
|
131
|
157 – भांडुप
|
132
|
158 – जोगेश्वरी पूर्व
|
133
|
159 – दिंडोशी
|
134
|
160 – कांदिवली पूर्व
|
135
|
161 – चारकोप
|
136
|
162 – मालाड पश्चिम
|
137
|
163 – गोरेगाव
|
138
|
164 – वर्सोवा
|
139
|
165 – अंधेरी पश्चिम
|
140
|
166 – अंधेरी पूर्व
|
141
|
167 – विलेपार्ले
|
142
|
168 – चांदिवली
|
143
|
169 – घाटकोपर पश्चिम
|
144
|
170 – घाटकोपर पूर्व
|
145
|
172 – अनुशक्ती नगर
|
146
|
173 – चेंबुर
|
147
|
174 – कुर्ला
|
148
|
175 – कलिना
|
149
|
177 – वांद्रे पश्चिम
|
150
|
179 – सायन कोळीवाडा
|
151
|
180 – वडाळा
|
152
|
181 – माहिम
|
153
|
182 – वरळी
|
154
|
183 – शिवडी
|
155
|
185 – मलबार हिल
|
156
|
187 – कुलाबा
|
157
|
188 – पनवेल
|
158
|
190 – उरण
|
159
|
191 – पेण
|
160
|
194 – महाड
|
161
|
199 – दौंड
|
162
|
204 – मावळ
|
163
|
205 – चिंचवड
|
164
|
206 – पिपरी
|
165
|
207 – भोसरी
|
166
|
208 – वडगाव शेरी
|
167
|
209 – शिवाजीनगर
|
168
|
210 – कोथरुड
|
169
|
211 – खडकवासला
|
170
|
212 – पर्वती
|
171
|
213 – हडपसर
|
172
|
214 – पुणे कॅन्टोन्मेंट
|
173
|
215 – कसबा पेठ
|
174
|
217 – संगमनेर
|
175
|
218 – शिर्डी
|
176
|
219 – कोपरगाव
|
177
|
220 – श्रीरामपूर
|
178
|
221 – नेवासा
|
179
|
222 – शेवगाव पाथर्डी
|
180
|
223 – राहौरी
|
181
|
224 – पारनेर
|
182
|
225 – अहमदनगर शहर
|
183
|
226 – श्रीगोंदा
|
184
|
227 – कर्जत जामखेड
|
185
|
228 – गेवराई
|
186
|
229 – माजलगाव
|
187
|
230 – बीड
|
188
|
231 – आष्टी
|
189
|
232 – केज
|
190
|
233 – परळी
|
191
|
234 – लातूर ग्रामीण
|
192
|
235 – लातूर शहर
|
193
|
236 – अहमदपूर
|
194
|
237 – उदगीर
|
195
|
238 – निलंगा
|
196
|
239 – औसा
|
197
|
240 – उमरगा
|
198
|
241 – तुळजापूर
|
199
|
242 – उस्मानाबाद
|
200
|
243 – परांडा
|
201
|
246 – बार्शी
|
202
|
248 – सोलापूर शहर उत्तर
|
203
|
249 – सोलापूर शहर मध्य
|
204
|
250 – अक्कलकोट
|
205
|
251 – सोलापूर दक्षिण
|
206
|
254 – माळशिरस
|
207
|
255 – फलटण
|
208
|
258 – माण
|
209
|
260 – कराड दक्षिण
|
210
|
261 – पाटण
|
211
|
263 – दापोली
|
212
|
264 – गुहागर
|
213
|
265 – चिपळूण
|
214
|
266 – रत्नागिरी
|
215
|
267 – राजापूर
|
216
|
268 – कणकवली
|
217
|
269 – कुडाळ
|
218
|
270 – सावंतवाडी
|
219
|
271 – चंदगड
|
220
|
272 – राधानगरी
|
221
|
273 – कागल
|
222
|
274 – कोल्हापूर दक्षिण
|
223
|
275 – करवीर
|
224
|
276 – कोल्हापूर उत्तर
|
225
|
277 – शाहुवाडी
|
226
|
278 – हातकणंगले
|
227
|
279 – इचलकरंजी
|
228
|
281 – मिरज
|
229
|
282 – सांगली
|
230
|
286 – खानापूर
|
231
|
287 – तासगाव-कवठेमहाकाळ
|
232
|
288 – जत
|
वंचित आघाडीला महाआघाडीत सामावून घेतले तर 45 विधानसभा मतदारसंघात महायुतीपेक्षा जास्त मताधिक्य होते अशा मतदारसंघाची यादी खालीलप्रमाणे-
वंचित व महाआघाडीची एकत्रित मते गृहीत धरल्यास महायुतीपेक्षा जास्त मताधिक्य
होते असे मतदारसंघ
|
|
अ.क्र.
|
विधानसभा मतदारसंघ
|
1
|
2 – शहादा
|
2
|
24 – सिंदखेडराजा
|
3
|
25 – मेहकर
|
4
|
26 – खामगाव
|
5
|
29 – बाळापूर
|
6
|
30 – अकोला पश्चिम
|
7
|
34 – वाशिम
|
8
|
35 – कारंजा
|
9
|
37 – बडनेरा
|
10
|
42 – अचलपूर
|
11
|
73 – ब्रम्हपुरी
|
12
|
74 – चिमुर
|
13
|
76 – वणी
|
14
|
81 – पुसद
|
15
|
89 – नायगाव
|
16
|
90 – देगलूर
|
17
|
95 – जिंतूर
|
18
|
97 – गंगाखेड
|
19
|
99 – परतूर
|
20
|
107 – औरंगाबाद मध्य
|
21
|
108 – औरंगाबाद पश्चिम
|
22
|
109 – औरंगाबाद पूर्व
|
23
|
111 – गंगापूर
|
24
|
127 – इगतपूरी
|
25
|
172 – अनुशक्ती नगर
|
26
|
174 – कुर्ला
|
27
|
190 – उरण
|
28
|
191 – पेण
|
29
|
199 – दौंड
|
30
|
213 – हडपसर
|
31
|
214 – पुणे कॅन्टोन्मेंट
|
32
|
229 – माजलगाव
|
33
|
230 – बीड
|
34
|
233 – परळी
|
35
|
235 – लातूर शहर
|
36
|
242 – उस्मानाबाद
|
37
|
246 – बार्शी
|
38
|
255 – फलटण
|
39
|
260 – कराड दक्षिण
|
40
|
264 – गुहागर
|
41
|
281 – मिरज
|
42
|
282 – सांगली
|
43
|
286 – खानापूर
|
44
|
287 – तासगाव-कवठेमहाकाळ
|
45
|
288 – जत
|
महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील-
मागील निवडणूक 20192014/2009 निवडणूक कार्यक्रम/निकाल/मतदानकेंद्र निहाय निकाल
सामाजिक स्थिती/जातीय प्रमाण व निवडणुकीवर होणारा परिणाम/विश्लेषण
राजकीय सद्यस्थिती/आगामी निवडणुकीतील निवडणूकपूर्व जनमत चाचणी कल / सर्वेक्षण
अधिक माहितीसाठी संपर्क-पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
prabindia.blogspot.com
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.