Tuesday, 30 July 2019

चंदगड नगरपंचायतीसह 67 ग्रामपंचायतींसाठी 31 ऑगस्ट रोजी मतदान

चंदगड नगरपंचायतीसह 67 ग्रामपंचायतींसाठी 31 ऑगस्ट रोजी मतदान


नवनिर्मित चंदगड (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच राज्यातील विविध 14 जिल्ह्यांमधील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 31 ऑगस्ट 2019 रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 

चंदगड नगरपंचायतीसाठी 31 ऑगस्ट रोजी मतदान

नवनिर्मित चंदगड (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 ऑगस्ट 2019 रोजी मतदान; तर 3 सप्टेंबर 2019 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. नामनिर्देशनपत्रे 3 ते 14 ऑगस्ट 2019 या कालावधीत दाखल करता येतील. 4, 10, 11 व 12 ऑगस्ट 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 16 ऑगस्ट 2019 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 22 ऑगस्ट 2019 ही नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाच्या निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे मागे घेता येतील. 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 3 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

67 ग्रामपंचायतींसाठी 31 ऑगस्ट रोजी मतदान

राज्यातील विविध 14 जिल्ह्यांमधील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 31 ऑगस्ट 2019 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. 1 ऑक्टोबर 2019 ते 13 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित अशा एकूण 67 ग्रामपंचायतींसाठी या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 9 ते 16 ऑगस्ट 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 19 ऑगस्ट 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 21 ऑगस्ट 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 3 सप्टेंबर 2019 रोजी होईल. सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 6, रायगड- 9, रत्नागिरी- 4, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 25, धुळे- 1, सातारा- 4, सोलापूर- 1, कोल्हापूर- 1, उस्मानाबाद- 3, अकोला- 2, यवतमाळ- 1, वर्धा- 5, आणि चंद्रपूर- 2. एकूण- 67.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================




Monday, 29 July 2019

सलग ११ वेळा निवडणूक जिंकलेले शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांची विधानसभा निवडणूकीतून माघार

आमदार गणपतराव देशमुख यांची सक्रीय राजकारणातून निवृत्ती


महाराष्ट्र विधिमंडळातील जेष्ठ सदस्य आणि तब्बल ५५ वर्षे सांगोला मतदारसंघाचे आमदार गणपतराव देशमुख यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नाहीत. प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.सांगोला मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला असल्याने पक्षातील नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याचे गणपतराव देशमुख यांनी स्पष्ट केले. सांगोल्याचा दुष्काळ हटवण्यासाठी टेंभु म्हैसाळ सहअनेक योजनांचे पाणी आणण्यात आपल्याला यश आले असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. गणपतराव देशमुख यांनी १९६२ साली पहिली निवडणूक लढवली. त्यानंतर आजवर १२ निवडणुकांमध्ये विजय मिळवला. देशमुख यांना आपल्या संसदीय राजकारणाच्या कारकिर्दीत केवळ १९७२ आणि १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले होते. त्यापैकी १९७२ साली झालेल्या पराभवानंतर १९७४ च्या पोटनिवडणुकीत पुन्हा विजयी झाले होते. प्रदिर्घ कारकिर्द असलेले गणपतराव देशमुख आता आगामी विधानसभा लढवणार नसल्याने शेकापमध्ये मोठी अस्वस्थता आहे. सध्या सुरु असलेल्या पक्षबदलावर गणपतराव देशमुख यांनी हे सत्तेसाठी पक्षबदल सुरू असल्याची टीका केली. असे पक्ष बदल करणारे कायमस्वरूपी राहत नसल्याचेही त्यांनी सांगितले. १९६२ पासून सांगोला तालुक्यातील जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली. आता शरीर साथ देत नसल्याने २०१९ च्या निवडणुकीत शेकापकडून नव्या उमेदवाराला संधी देण्याची वेळ आली आहे. संपूर्ण तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची संघटना मजबूत आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल बोलत असताना आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षाने शेकापला मदत केल्याचे गणपतराव देशमुख यांनी स्पष्ट केले़  १९५२ पासून सांगोला हा शेकापचाच बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २०१९ च्या निवडणुकीत शेकापकडे उमेदवारीची मागणी करत असली तरी याबाबत मी वैयक्तिक निर्णय घेऊ शकत नाही. शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीला उमेदवारी द्यायची की नाही? याचा निर्णय घेतील. पन्नास वर्षांहून अधिक काळ जनतेने मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली़ त्याबद्दल जनतेचे आभार. परंतु २०१९ च्या निवडणुकीतही शेतकरी कामगार पक्ष देईल तो उमेदवार मोठ्या मताधिक्क्यांनी विधानसभेत पाठवून पुन्हा एकदा सांगोला हा शेतकरी कामगार पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला आहे हे सिद्ध करून दाखवू असे आवाहन आ.गणपतराव देशमुख यांनी केले आहे. सन २०१९ च्या निवडणुकीत शेकापचा नवीन कार्यक्षम आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाणीव असणारा  उमेदवार मी ठरविणार आहे. उमेदवारांच्या नावावर एकमत न झाल्यास तालुक्यातील प्रत्येक गावातून शेतकरी कामगार पक्षाच्या एका कार्यकर्त्यांचे मतदान घेऊन शेकापचा नवीन उमेदवार ठरविणार असल्याचे आ.देशमुख यांनी जाहीर केले. कोळा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================










Sunday, 28 July 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नीती, नियत आणि नेतृत्व यामध्ये सरस- खासदार विनय सहस्रबुद्धे

‘अकॅडमिक्स फॉर देवेंद्र’ च्या वतीने ‘थिंकर्स मीट’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या कार्याचे कौतुक

नीती, नियत आणि नेतृत्व या सर्वच गोष्टींमध्ये फडणवीस सरकार आतापर्यंतच्या राज्य सरकारांपेक्षा उजवे ठरले आहे. त्यामुळे सरकारच्या योजनांची आणि कामांची माहिती आपण स्वतःहून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविली पाहिजे.देवेंद्र फडणवीस सरकारने समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी अनेक चांगले उपक्रम राबविले. चांगल्या लोकांचा चांगुलपणा आपण स्वतःहून लोकांसमोर आणून दिला पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि ‘आयसीसीआर’चे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी पुण्यामध्ये केले. ‘अकॅडमिक्स फॉर देवेंद्र’ च्या वतीने पुण्यातील पीवायसी क्लब येथे आयोजित ‘थिंकर्स मीट’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमामध्ये पुण्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ आणि अनुभवी मंडळी उपस्थित होती. अशा पद्धतीने मान्यवरांशी संवाद साधून त्यांच्या सूचना तसेच कल्पना जाणून घेण्याचे कार्यक्रम राज्यात सर्वत्र घेण्यात येणार असून, त्याची सुरुवात पुण्यापासून झाली.‘हा उपक्रम म्हणजे लोकांच्या आकांक्षांची जनसुनवाई आहे. या निमित्ताने राज्याच्या सांस्कृतिक राजधानीतील विचारी सज्जनशक्ती एकत्र आली आहे,’अशा शब्दात कौतुक करून सहस्रबुद्धे म्हणाले, की 2014 साली केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर दोन्ही सरकारांकडून नागरिकांच्या खूप अपेक्षा होत्या. नागरिकांच्या अपेक्षांचे दडपण सरकारवर होते. मात्र, कार्यमग्नता, झोकून देऊन प्रश्न धसास लावण्याची वृत्ती, कार्यनिष्ठा आणि कर्तृत्व यांच्या जोरावर नरेंद्रभाई आणि देवेंद्रजी यांनी सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केला. समान कार्यपद्धती आणि दोन्ही नेत्यांमधील समन्वय यामुळे सर्व अडीअडचणींवर मात करून लोकांच्या अपेक्षांची प्रामाणिकपणे पूर्तता करण्याचा प्रयत्न केंद्रात आणि राज्यातही झाला. त्यामुळेच भारतीय मतदारांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात भरभरून मते दिली आणि नरेंद्रभाईंना पुन्हा एकदा राज्य करण्याची संधी दिली. आता महाराष्ट्राची निवडणूक जवळ आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर अनेक आक्षेप घेण्यात आले. मात्र, देवेंद्रजीं कधीच कोणाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडले नाही. ते फक्त काम करीत राहिले.  प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक वेळी त्यांनी स्वतःला सिद्ध केले. त्यामुळेच देवेंद्रजी आता ख-या अर्थाने, ‘मास लीडर’ बनले आहेत. जलयुक्त शिवारपासून ते समृद्धी महामार्गापर्यंत आणि मेट्रोचे जाळे वेगाने उभारण्यापासून ते गोरगरीबांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यापर्यंत देवेंद्रजींनी अनेक ठिकाणी स्वतः लक्ष घातले. नजीकच्या भविष्याचा विचार न करता दूरदृष्टी ठेवून दीर्घकालीन धोरण आखले आणि त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळेच खऱ्या अर्थाने, ‘महाराष्ट्र पुढे चालला आहे,’ यापुढेही ही वाटचाल अशाच पद्धतीने सुरू राहिली पाहिजे आणि त्यासाठी समाजातील सज्जनशक्ती सक्रिय व्हायला हवी,’ असे ठाम मत सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. फोर्स मोटर्सचे अभय फिरोदिया यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, की इंग्रज गेले आणि भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. नरसिंह राव यांच्या काळात भारताने सोशालिस्ट धर्तीच्या आर्थिक धोरणालाही तिलांजली दिली. आता सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या आड येणाऱ्या सोशालिस्ट मानसिकतेतील नोकरशाहीचा बंदोबस्त व्हायला हवा. नोकरशाहीच्या मनोवृत्तीमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. तसे केले तर भ्रष्टाचार मोडून काढण्याची प्रक्रिया वेगाने पुढे जाईल आणि विकासाला अधिक गती मिळेल. कार्यक्रमात डॉ. के. एल. संचेती, प्राज इंडस्ट्रीजचे प्रमोद चौधरी, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, भरत फाटक, लेखक प्रशांत पोळ, अरुण नहार, धनंजय धोरडे, ‘डिक्की’चे मिलिंद कांबळे आणि ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे लेखक आशिष चांदोरकर यांनी मनोगत व्यक्त केले.विकास काकतकर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील मागील भूमिका विशद केली. तर अनिकेत काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
=============================
==


राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रथमच ‘लोकशाही पुरस्कार’; उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान

लोकसभा आणि विधानसभांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक: उपराष्ट्रपती


महिलांचा सन्मान करणे ही आपली परंपरा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज येथे केले. राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रथमच देण्यात येणारे ‘लोकशाही पुरस्कार’ उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते आज मुंबई येथे प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे होते. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया आणि राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यावेळी उपस्थित होते. सन 2016 आणि 2017 या कालावधीत पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतल्याबद्दल विविध संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये एकूण 14 व्यक्ती व संस्थांचा समावेश आहे.पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन आणि राज्य निवडणूक आयोगाच्या उपक्रमांचे कौतुक करून उपराष्ट्रपती म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राखीव जागा उपलब्ध झाल्यामुळे विविध स्तरातील महिलांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता लोकसभा आणि विधानसभांमध्येही महिलांसाठी राखीव जागांची तरतूद करण्याची गरज आहे.महाराष्ट्राला सामाजिक आणि राजकीय सुधारणांची मोठी परंपरा लाभली आहे. तीच परंपरा आता राज्य निवडणूक आयोग पुढे नेत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात येथे झालेल्या सुधारणांचे इतर राज्यांनीही अनुकरण करावे. आपण संघराज्य व्यवस्था स्वीकारली असून उल्लेखनीय कार्ये आणि ज्ञानाची आपसात देवाण- घेवाण झाली पाहिजे. त्यामाध्यमातून स्थानिक स्वराज्य्‍ा संस्था अधिक मजबूत होऊ शकतील. स्थानिक स्वराज्य संस्थांना चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. आता त्यांच्याकडे 73 व 74 व्या घटना दुरूस्तीनुसार सर्व विषय पूर्णत: सोपविले पाहिजेत, अशीही अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.लोकशाही पुरस्कारांचा देशातील हा पहिला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुलभता आणि एकसूत्रता आणण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या धर्तीवर एकच कायदा करण्यासंदर्भात मसुदा सादर केला आहे. त्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. राज्यात होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात राज्य शासनाने समितीदेखील नियुक्त केली आहे. राज्यात कुठे ना कुठे सातत्याने आचारसंहिता लागू असते. त्याचा परिणाम एकूण प्रशासनावर आणि विकासावर होतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील एकाच वेळी घेण्यासंदर्भात विचारमंथन करण्याची आवश्यकता आहे. श्री. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक चुरशीच्या आणि गुंतागुंतीच्या असतात. विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. काही जणांकडून मात्र या निवडणुकांना दुय्यम स्थान दिले जाते; परंतु समाजातील विविध घटक स्वयंस्फूर्तीने पुढे येतात. त्यामुळे या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडणे शक्य होते. त्यासाठीच विविध व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. तो आज प्रत्यक्षात आला आहे.

पुरस्कार विजेत्या व्यक्ती व संस्थांची गटनिहाय नावे : 

निवडणुकांमध्ये लोकसहभाग वाढविणे- 

1. माथेरान हॉटेल असोसिएशन, 
2. मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ, 
3. महिंद्रा आणि महिंद्रा उद्योग समूह, 
4. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस्, मुंबई विद्यापीठ, मुंबई, 
5. रिसोर्स ॲण्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हल्पमेंट 
6. श्री. संदीप भास्कर जाधव, सोलापूर. 

निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडणे- 

6. डॉ. अभिनव देशमुख, तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचिरोली, 
7. श्रीमती दया अर्जुन डोईफोडे, पोलिस हेड कॉन्सटेबल, कराड 
8. श्री. केशव व्यंकटराव नेटके, तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी, पैठण नगरपरिषद. 

निवडणुकांसंदर्भात अभ्यास आणि प्रत्यक्ष संशोधनाद्वारे ज्ञाननिर्मिती- 

9. गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे.

 निवडणूक प्रक्रियेत संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर-

10. माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन. 

निवडणुकांमध्ये मतदानाचे सर्वाधिक प्रमाण वाढविणे- 

11. बृहन्मुंबई महानगरपालिका. 

निवडणुका सुरळीत पार पाडणे, निवडणूक प्रक्रियेत संगणकाचा वापर करणे आणि मतदानाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ- 

12. श्री. ए. एस. आर. नायक, तत्कालीन जिल्हाधिकारी, गडचिरोली.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
=============================
==







Thursday, 25 July 2019

पंचतारांकित सुविधांसह ३४ मजल्यांचे भव्य न्यू मनोरा "एमएलए टाॅवर"

नवीन आमदार निवासाचे भूमीपूजन

थिएटर, सभागृह, बँक, दुकाने, भोजन कक्ष, योगा कक्ष, वाचनालय, उपहारगृहासह वाहनतळ, दवाखाना आदी. सुविधांसह आमदारांसाठी व अभ्यागतांसाठी वेगवेगळे पंचतारांकित सुविधा असलेले कक्ष असे ३४ मजल्यांचे भव्य न्यू मनोरा "एमएलए टाॅवर" मुंबईमध्ये साकारत आहे. नवीन आमदार निवासाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनोरा आमदार निवास येथील जागेत झाले. या नविन मनोरा आमदार निवास हे ३४ मजली टॉवर असणार असून एकूण बांधकाम ७.७२ लाख चौरस फूटाचे असेल, या आमदार निवासातील सभागृह आसन क्षमता २४० ची असणार आहे तर ,वाहनतळ, दवाखाना, बँक, दुकाने, भोजन कक्ष, योगा कक्ष, वाचनालय, छोटे थिएटर व उपहारगृहाचा समावेश  नव्या मनोरा आमदार निवासात असणार आहेत. आमदारांसाठी व अभ्यागतांसाठी वेगवेगळे कक्षही या मध्ये असणार आहेत. नवीन आमदार निवासाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनोरा आमदार निवास येथील जागेत आज झाले. महाराष्ट्रातील संसदीय कार्यप्रणाली ही वैभवशाली आहे. या वैभवात भर घालणारी मनोरा आमदार निवासाची इमारत उभी राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर,उपसभापती निलम गोऱ्हे, उपाध्यक्ष विजय औटी, विधीमंडळातील प्रतोद राज पुरोहित, विधीमंडळाचे सचिव (कार्यभार) जितेंद्र भोळे, वास्तूविशारद शशी प्रभू, यांच्यासह मंत्री, अधिकारी उपस्थित होते. यावेळी  फडणवीस म्हणाले की, मनोरा आमदार निवास ही वास्तू अनेक इतिहासाचा साक्षीदार होता. अनेकांच्या चांगल्या – वाईट आठवणी याच्याशी जोडल्या गेल्या होत्या. परंतु या आमदार निवासात वारंवार होणाऱ्या छोट्या अपघातामुळे नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. नवीन इमारतीचा सुंदर आणि आवश्यक गोष्टींचा विचार करून आराखडा शशी प्रभू यांनी केला आहे. यामध्ये ८०० पेक्षा जास्त रूम असणार आहेत. आमदार, माजी आमदार यांच्याबरोबर विधानमंडळ येथे येणाऱ्या शिष्टमंडळासाठीही व्यवस्था इथे होणार आहे. एनबीसीसीने कमीत कमी वेळेत आधुनिक तंत्रज्ञान वापरून ही इमारत पूर्ण करावी. याबरोबरच मॅजेस्टिक आमदार निवासाचे पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्याकडेही लक्ष द्यावे.मनोरा आमदार निवासातील आठवणी सांगून सभापती  रामराजे निंबाळकर म्हणाले की, नवीन आमदार निवासाची इमारत अतिशय चांगली होईल. या इमारतीची देखभाल ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. तसेच या माध्यमातून आमदारांना चांगली सेवा देता येईल. या इमारतीत आमदारांकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांचीही सोय व्हावी.विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले की, मनोरा आमदार निवास ची सुसज्ज वास्तू उभी राहत आहे. आमदारांची सध्या पाच वेगवेगळ्या ठिकाणी निवासव्यवस्था होत होती. या इमारतीमध्ये आता सर्वांची एकाच ठिकाणी व्यवस्था होईल. उपसभापती निलम गोऱ्हे यांनी प्रास्ताविक केले. तर उपाध्यक्ष विजय औटी यांनी आभार मानले. तत्पूर्वी आमदार निवास येथील जागेवर मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते कुदळ मारून भूमीपूजन करण्यात आले. यावेळी सभापती श्री. नाईक-निंबाळकर, अध्यक्ष  बागडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, राज्यमंत्री दीपक केसरकर, संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री परिणय फुके आदी उपस्थित होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================


Wednesday, 24 July 2019

..आता वंचितला दुसरा पर्यायी नवा पक्ष "महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी" ची घोषणा

प्रकाश आंबेडकरांना आव्हान देत लक्ष्मण माने यांची वेगळी चुल


प्रकाश आंबेडकरांना आव्हान देत वंचितमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानें यांनी वेगळी चुल मांडली असून वंचितला दुसरा पर्यायी नवा पक्ष "महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी"ची घोषणा केली आहे. "महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी" असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानें यांनी नव्या पक्षाची स्थापना केल्याने वंचित बहुजन आघाडीची चांगीलीच गोची होणार आहे. येत्या 29 जुलैला पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आघाडीचा पहिला निर्धार मेळावा पार पडणार असून माजी न्यायमूर्ती पीबी सावंत यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या विचारांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. विधानसभेला डाव्या आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचेही लक्ष्मण मानें यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील चूक आता करायची नाही. भाजपचा पराभव करण्याऐवजी त्यांच्याच 12-12 जागा निवडून आल्या, त्यामुळे मला अपराधीपणा वाटत होता. जातीयवादी आणि धार्मिक संघटना बरोबर आम्ही जाणार नाही. भाजप युतीला हरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मातंग, धनगर, रिपब्लिकन ओबीसी संघटनांबरोबर आमची चर्चा सुरू असल्याचेही माने म्हणाले. किरकोळ स्वार्थासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार विक्रीला काढणार नाही. बाबासाहेबांचे आम्ही सारेच वारसदार असल्याचे माने म्हणाले. मुस्लीम बांधवांना जय श्री राम म्हणून मारहाण केली जाते ही आराजकता आहे. उद्या तुमचीही घरे पेटल्याशिवाय राहणार नाहीत, उद्या ही वेळ तुमच्यावर येऊ शकते, असा इशारा मानेंनी दिला. अब्दुल रहमान अंजरिया यांच्या अब्रूनुकसानीच्या दाव्यावर बोलताना, मानेंनी वकिलांशी बोलून नोटीसला उत्तर देणार असल्याचे म्हटले. प्रकाश आंबेडकरांच्या काँग्रेससोबत जाण्याच्या भूमिकेवरही मानेंनी टीका केली. ते म्हणाले, हा बाळासाहेबांचा डावपेचाचा भाग आहे. काँग्रेस कधीच मान्य करणार नाही, अशी मागणी करायची आणि बोलने तोडून टाकायचे, हा विचारसरणीचा नाहीतर डावपेचाचा भाग आहे. वंचित आघाडी भाजपाची बी टीम असल्याचे त्यांच्या वर्तनाने सिद्ध केले आहे. लोकसभेत आमची एकही जागा निवडून आली नाही, याउलट काँग्रेसलाही फायदा झाला नाही, फायदा हा भाजपचा झाला आहे. त्यामुळे लोक बी टीम म्हणाले तर राग यायचे कारण नाही. आकडे सांगतात की तुम्ही तिकडे मदत केली, असेही माने म्हणाले. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================


भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मेळाव्यातील गैरवर्तन व छेडछाडीच्या घटनेची पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल

गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करण्याची सूचना करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांची छेडछाड प्रकरण  

नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित पुण्यात महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला पक्षाचे पदाधिकारी, आमदार, पालिकेतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. या गर्दीत पर्वती मतदारसंघातील पक्षाच्या दोन महिला पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी उभ्या होत्या. यावेळी रांगेत उभ्या असलेल्या महिलांचा पदर ओढणे, त्यांना चिमटे काढण्यासारखे लाजिरवाणे गैरप्रकार घडले. या मेळाव्यातील गैरवर्तन व छेडछाडीच्या घटनेची पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करण्याची सूचना करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. संबधित पिढीत भाजप महिला पदाधिकारी यांनी टाकलेली सोशल मिडीयावरील पोस्ट व घडल्याप्रकाराची माहीती घेऊन पक्षाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या दोन महिला पदाधिकारी यांच्यावरील अशा स्वरुपाच्या घटनेमुळे गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करण्याची सूचना करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाईचे पडसाद आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमटणार आहेत. या घटनेची संबधित सोशल मिडीयावरील पोस्ट मोठ्याप्रमाणात व्हायरल झालेली आहे. या प्रकारामुळे संतप्त भावना व प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्यक्त केल्या जात आहेत. हुल्लडबाजी करणाऱ्यांना शोधण्याचे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांपुढे आव्हान आहे. पुण्याचे नवनियुक्त पालकमंत्री पाटील यांच्याकडे नुकतीच पक्षाची प्रदेशाध्यपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच पुण्यात येत होते. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होणार असल्याने महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला भाजपचे शहरातील आमदार, शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संस्कृती जोपासण्याचे धडे देखील कार्यकर्त्यांना दिले. व्यासपीठावरील मान्यवरांना बसण्यासाठी सोफ्याची व्यवस्था करण्यात आली होती. व्यासपीठाखाली कार्यकर्ते साध्या खुर्च्यांवर बसले होते. चंद्रकांतदादांनी आपण सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आहोत, असे सांगत व्यासपीठावरील सोफा हलवायला लावला आणि तेथे साध्या खुर्च्या मांडण्यात आल्या. नेते आरामदायी सोफ्यावर आणि कार्यकर्ते खुर्चीत, असा प्रकार या मेळाव्यात टाळून त्यांनी उपस्थितांना उपदेश दिले. या तीन वर्षांमध्ये आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे. माझ्याकडे तीन वर्ष आहेत. चांगलं काम केले तर अजून तीन वर्षे भेटतील, असेही त्यांनी सांगितले. यानंतर मात्र तथाकथित अज्ञातांकडून महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी यांच्याशी गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी एकीचा पदर ओढण्याचा प्रयत्न केला तर दुसरया महिलेला चिमटा काढला. गर्दीत हे कृत्य नेमके कुणी केले हे त्यांच्या लक्षात आले नाही. या प्रकाराने या महीला घाबरल्या. तात्काळ काही उपस्थित पदाधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. मात्र, येथे पत्रकार आहेत. उगीच विषय वाढेल, असे त्यांना सांगण्यात आले. या महिलांनी मंगळवारी या घटनेबाबत पक्ष कार्यकर्त्यांच्या व्हॉटस ऍप ग्रुपवर संताप व्यक्त करीत या प्रकाराला वाचा फोडल्याने हा विषय चव्हाट्यावर आला. आपला पक्ष शिस्त पाळणारा आहे. मात्र, या घटनेनंतर पक्षात महिलांच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याची भावना या ग्रुपवर व्यक्त करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यात झालेल्या मेळाव्यात आमच्यासोबत छेडछाड झाली, असा आरोप भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला होता. तसेच हे प्रकरण बाहेर येऊ नये, यासाठीही काहींनी प्रयत्न केल्याचा आरोप या महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. महिलांसोबत गैरवर्तन करणारे निष्पन्न झाल्यास भाजपकडून कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान याप्रकाराबद्दल सदर महिलांकडे पक्षाने खुलासा मागून अधिक चौकशी केली आहे. गर्दीमुळे हुल्लडबाजी करणारे निष्पन्न झाले नसल्याने कोणावर संशय व्यक्त करता येत नाही. गैरकृत्य करणारे पक्षाचे कार्यकर्ते असतीलच असे नाही यामुळे कारवाई कोणावर करणार याबाबत स्थानिक पातळीवरील संघटनेत प्रश्न निर्माण झालेला आहे. पक्ष शिस्तीसाठी संबधित पदाधिकारी यांना समज देण्यात आलेली आहे. तर भविष्यात या घटनेचे परिणाम त्यांना भोगावे लागतील अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत. 

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची संबधित व्हायरल पोस्ट-

'नमस्कार, अतिशय संतापाने मी हा मेसेज ग्रुपवर टाकत आहे .कालच्या शिवशंकर सभागृहात आमच्या बाबतीत जो फालतू प्रकार झाला त्याचा मी जाहीर निषेध करते . काल सभागृहात अध्यक्ष मा .श्री चंद्रकांतदादांना भेटण्यासाठी आम्ही उभे होतो तेव्हा गर्दीत कुणीतरी तरी माझा पदर जोरात मुद्दाम खेचला. ही अतिशय संतापजनक बाब आहे. माझ्याबरोबर असलेल्या दुसऱ्या महिला पदाधिकाऱ्यालाही जोरात चिमटा घेतला. गर्दीत चेहरे आमच्या लक्षात आले नाहीत. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे की होता, असा प्रश्न काल मनात आला. जर महिलांची सुरक्षितता इथे जपली नाही तर काय उपयोग पक्षातील पुरुष पदाधिकाऱ्यांचा? काल आमच्या बाबतीत जे घडले ते इतर कुणाच्या बाबतीत घडू नये म्हणून मी मेसेज टाकत आहे. हा विषय आपले आमदार व सरचिटणीस बाबाशेठ यांच्या कानापर्यंत जावा हे महत्त्वाचे. आपल्या मतदारसंघात महिलांची योग्य दखल घेतलीच पाहिजे. कारण सगळ्या महिला प्रामाणिकपणे काम करतात कशाचीही अपेक्षा न ठेवता. अतिशय खेद वाटतो मला काल जो प्रकार आमच्या बाबतीत झाला तो आपल्याच मतदारसंघात. आम्ही जेव्हा प्रकार तिथे उभे असलेल्या काही मान्यवरांना सांगितला तेव्हा 'जावू दया सोडून दया. पत्रकार आहेत इथं. उगीच विषय वाढेल. पक्षाचे नाव जाईल असे सांगितले गेले. अशा मनोवृत्तीचा मला अतिशय संताप आला आहे..'


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================






Tuesday, 23 July 2019

महाराष्ट्रात १७ सप्टेंबरला विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता तर मतदान 20 ऑक्टोबरला

ऐननिवडणुकीतील खर्चाला लगाम लावण्यासाठी निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप-सेनेचा भर

152 विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 


सप्टेंबर महिन्याच्या १७ सप्टेंबर २०१९ रोजी अंगारकी चतुर्थीदिनी महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ करीता निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान घेण्यात येऊ शकते. सर्वसाधारण 20 ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान व दिवाळी पूर्वी म्हणजे 23 अथवा २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणी होऊ शकेल. मागील निवडणुकांचा कार्यक्रम पाहिल्यास विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१४ मध्ये महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर २०१४ रोजी घेण्यात आलेल्या होत्या तर मतमोजणी 19 ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आली होती. निवडणूक कार्यक्रम १२ सप्टेंबर २०१४ रोजी जाहीर करण्यात आलेला होता. यावेळी महाराष्ट्रासह हरियाणामधील निवडणुका एकाच वेळी जाहीर करण्यात आलेल्या होत्या  महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबर २०१४ रोजी संपणार होती तत्पुर्वी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. संपूर्ण प्रक्रिया २२ ऑक्टोबर २०१४ रोजी पूर्ण करण्यात आलेली होती. विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ करीता देखील गेल्या वेळी प्रमाणे ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येतील कारण महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपणार आहे. तत्पुर्वी निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे निवडणूक आयोगास क्रमप्राप्त आहे. गेल्या निवडणुकांच्या तारखांच्या पार्श्वभूमीवर यावेळी गणेशोत्सव सांगता १२ सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. या कालावधीत सुरक्षेवर मोठ्याप्रमाणात ताण यंत्रणांवर असतो त्यामुळे गणेशोत्सवानंतर निवडणुका जाहीर  होतील. तर २५ ऑक्टोबर २०१९ पासून दीपावली सण सुरु होणार आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वीच मतदान घेण्यावर आयोगाची मदार असेल. सर्वसाधारण सप्टेंबर महिन्याच्या १७ सप्टेंबर २०१९ रोजी अंगारकी चतुर्थीदिनी महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ करीता निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे. तर २५ सप्टेंबर २०१९ रोजी अधिसूचना काढण्यात येऊ शकते तर नामनिर्देशनपत्र घटस्थापना व नवरात्री कालावधीत भरण्याची मुदत असणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान घेण्यात येऊ शकते. सर्वसाधारण 20 ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान व दिवाळी पूर्वी म्हणजे 23 अथवा २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणी होऊ शकते. 

ऐननिवडणुकीतील खर्चाला लगाम लावण्यासाठी निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप-सेनेचा भर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूकपूर्व प्रचार दौऱ्यांचे आयोजन केले जात असून ऐननिवडणुकीतील खर्चाला लगाम लावण्यासाठी निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप व शिवसेनेचा जास्त भर आहे. निवडणुकीत आदर्श आचारसंहिता लागू होत असल्याने केंद्रित प्रचारावर व निवडणूक खर्चावर मर्यादा येतात. अनेक विभागांच्या परवानगी घ्यावी लागते. राज्य व केद्र स्तरावरील नेत्यांच्या सभांच्या आयोजनात कार्यकर्त्यांचा वेळ खूप वाया जातो. प्रत्यक्ष मतदारांना भेटणे व प्रचारसाहित्य पोहोचवणे जिकरीचे होते म्हणून ऐननिवडणुकीतील खर्चाला लगाम लावण्यासाठी निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप-सेनेने भर दिलेला आहे असे वाटते . विधानसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात उमेदवारांना खर्चाची २८ लाखांची मर्यादा असते. या खर्चात स्टार प्रचारक व राजकीय पक्षांचा प्रचार खर्च समावेश केला जात असल्याने प्रचारावर मर्यादा येतात. यावर मात करण्यासाठी भाजप व शिवसेनेने निवडणूकपूर्व प्रचार दौऱ्यांचे आयोजन केले आहे.   

152 विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 

आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांची तयारी अन २२० जागांवर लक्ष्य आणि प्रत्यक्ष 152 विधानसभा मतदारसंघातच प्रचार ही भाजपची रणनीती आहे. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट संपूर्ण महिनाभर 30 जिल्हे व्याप्त महाजनादेश यात्रा काढून 25 दिवसात पूर्ण करून सुमारे 4 हजार 232 किलोमीटर अंतर कापून महाराष्ट्रातील 152 विधानसभा मतदारसंघात तब्बल 104 जाहीर सभा आणि 228 स्वागत सभा घेण्यात येणार आहेत तर 20 पत्रकार परिषदांमध्ये निवडणूकपूर्व प्रचारांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात 'जनआशीर्वाद' यात्रा नुकतीच काढली होती. या यात्रेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून राज्यात महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू केली असून, ती जळगाव येथून सुरू झाली होती. आदित्य ठाकरे युवकांसोबतच शेतकऱ्यांशी यात्रेच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व जनतेच्या मनावर बिंबवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही असाच कार्यक्रम आखला आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील महाजनादेश यात्रा काढणार काढणार आहेत.  'एलईडी'युक्त रथ या यात्रेत वापरला जाईल. यात फडणवीस सरकारने केलेल्या कामाची माहिती चलचित्रांद्वारे दिली जाईल. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दीड ते दोन महिन्यांत आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 1 ते 31 ऑगस्टपर्यंत महाजनादेश यात्रा प्रत्येक जिल्ह्यातून जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून राज्य सरकारने केलेल्या कामासोबत नवीन काही घोषणा करण्याची शक्‍यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागपूर, नंदुरबार, अकोला, वाशीम व धुळे जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्‍ती करून महिनाभरात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्‍यता आहे. पाच जिल्ह्यांत निवडणुका असल्या तरी याचा परिणाम राज्यावर होईल. दरम्यान विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून एक ते नऊ ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा होणार असून, या भागातील एकुण १४ जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदार संघातून १,६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे. यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्ट रोजी सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यांत ही यात्रा १८ जिल्ह्यातल्या ९३ विधानसभा मतदारसंघात २,७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. विदर्भात १ हजार २३२ किलोमीटर तर  एकूण ४४ मतदारसंघात हि यात्रा फिरणार आहे .उत्तर महाराष्ट्रात ६३३ किलोमीटर  म्हणजेच ३४ मतदारसंघात मुख्यमंत्री या यात्रेच्या निमित्ताने निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये जावून सरकारची कामगिरी सांगणार आहेत. मराठवाडात १ हजार ६९ किलोमीटर  म्गणजे २८ मतदारसंघात तर पश्चिम महाराष्ट्रातील ८१२ किलोमीटर  व २९ मतदारसंघात हि यात्रा प्रवास करणार आहे. कोकणात  ६३८ किलोमीटर प्रवास करताना  कोकणातील १५ मतदारसंघ मुख्यमंत्री पिंजून काढणार आहेत. तसेच यात्रेदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यात्रा ज्या जिल्ह्यांतून प्रवास करेल तेथे त्या जिल्ह्यांतील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचे कार्यक्रम-

21 जुलै 2019 - प्रदेश विस्तारित कार्यसमिती
25 जुलै ते 10 ऑगस्ट 2019 - जिल्हयासह शक्ती केंद्र प्रमुख बैठक
9 ऑगस्ट 2019 - सदस्यता अभियान ड्राइव्ह
1 जुलै ते 15 ऑगस्ट - नवमतदार नोंदणी अभियान (युवा मोर्चा)
15 जुलै ते 15 ऑगस्ट - पक्ष विस्तार योजना (सर्व शक्ती केंद्रांपर्यंत)
10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट - विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन
1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट - शक्ती सन्मान महोत्सव (रक्षाबंधन पर्व) (बुथस्तरावर व मंडल स्तरावर राखी संकलन) 16 ऑगस्ट - रक्षाबंधन कार्यक्रम 
1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट - महाजनादेश यात्रा
15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर - विधानसभा स्तरावर नवमतदार संवाद कार्यक्रम
16 ऑगस्ट - स्व. अटलजी स्मृतीदिन (शक्ती केंद्रस्थानी बूथ कार्यकर्ता एकत्रीकरण)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================