"मी अनुभवलेली संसद" खासदार बारणे लिखित पुस्तक प्रकाशनाला शिवसेनेला बगल!
खासदार श्रीरंग बारणे यांना "अनुभवलेल्या संसदेतून" भाजप-राष्ट्रवादीचे आकर्षण वाढले आहे. "मी अनुभवलेली संसद" या त्यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाला शिवसेनेच्या राज्यातील प्रमुखांना डावलण्यात आलेले आहे. ३ जानेवारीला पुस्तकाचे प्रकाशन लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत तर सेनेचे केवळ औपचारिकता म्हणून केंद्रीय मंत्री अनंत गीते, लोकसभा व राज्यसभा नेते म्हणून खासदार संजय राऊत व खासदार अनंतराव आढसूळ यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकले आहे. शिवसेनेतील काही पदाधिकारी यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या भूमिकांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या निवडणूकपूर्वी राजकीय कारकीर्दीत केलेल्या कामांचे फोटो व माहितीपर पुस्तक प्रचारासाठी प्रकाशित केले होते. त्याच धर्तीवर खासदार झाल्यावर कार्य अहवालाचे पुस्तकरुपी प्रकाशन नुकतेच केले. परंतु "मी अनुभवलेली संसद" या अनुभवाचे पुस्तक प्रकाशनाला शिवसेनेला पदाधिका-याना बगल दिल्याचा आरोप पक्षांतर्गत होत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्यास खासदार श्रीरंग बारणे इच्छुक असले तरी युती झाली तरच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेच्या विरोधी त्यांचे मत सेनेतील पदाधिकारी यांना खटकते आहे. मावळ मधून आमदार नीलमताई गो-हे यांचा सेनेकडे पर्याय असल्याचे काही पदाधिका-यांना वाटते. खासदार श्रीरंग बारणे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पूर्वी कट्टर समर्थक होते त्यामुळे त्यांच्यात जुनाच स्नेह आहे. यामुळे त्यांना प्रकाशन कार्यक्रमाला निमंत्रित केले असावे. तर स्थानिक पातळीवर भाजप पदाधिकारी यांचा त्यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध आहे यामुळे भाजप नेतृत्वाशी साधण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे देखील बोलले जात आहे. खासदार श्रीरंग बारणे यांना "अनुभवलेल्या संसदेतून" भाजप-राष्ट्रवादीचे आकर्षण वाढल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र राजकीय चर्चांना उधान आले आहे. दरम्यान भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांना घरातूनच पुन्हा एकदा आव्हान निर्माण झाले आहे. भाजप आमदारांचे प्रतिस्पर्धी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फ्लेक्सबाजी करत “भावी आमदार’ म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यापाठोपाठ आता नवनाथ जगताप हेदेखील विरोधात गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली वेग आला आहे. सर्व राजकीय चढ-उतारामध्ये राजेंद्र व नवनाथ हे दोन्ही चुलतबंधू लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मात्र त्यांच्या विरोधी भूमिका व सेनेतील आकर्षण चर्चेचा विषय झालेला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील राजकीय पदाधिकारी यांना दुस-या राजकीय पक्षांचे आकर्षण वाढल्याने घडामोडींवर चर्चा होत आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
https://imojo.in/prabindia
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्येClick here Pay Now-
https://imojo.in/prabindia
=============0===========0==========0==========