भाजप व काँग्रेसकडे प्रत्येकी २ तर शिवसेनेकडे एक नगरध्यक्षपद
राज्यभरातील काही नगरपरिषद, नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका व पोटनिवडणुकींची आज मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निकालामध्ये सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या आहेत. ५ नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या एकूण ९० जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक ३९ जागा पटकावल्या आहेत तर त्याखालोखाल ३० जागा कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीने १०, शिवसेना-७, अपक्ष-२, सीपीआय-1, बसप-1 जागांवर विजय मिळवला आहे. तर थेट नगरध्यक्षपद भाजप व काँग्रेसने प्रत्येकी २ तर शिवसेनेने एका ठिकाणी मिळवले आहे. या ५ नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत, सातारा जिल्ह्यातील मलकापूर, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, नागपूर जिल्ह्यातील महादुला आणि गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगरपरिषदेचा समावेश होता.
दरम्यान १० नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या पोटनिवडणुकींमध्ये एकूण १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ६ ठिकाणी बिनविरोध सदस्यांच्या निवडी झाल्या असून ५ ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी नगरपरिषदेच्या ९ अ जागा भाजपने जिंकली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील दुधनी नगरपरिषदेच्या २ ब जागा काँग्रेसने जिंकली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.15 ही जागा अपक्षने जिंकली आहे. तसेच बीड नगरपरिषदेचा ११ अ जागा राष्ट्रवादीने प्राप्त केली आहे तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.१४ करीता झालेला पोट निवडणुकीत शिवसेनेने जागा जिंकली आहे. बिनविरोध पोटनिवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर प्रभाग क्र. ६ अ जागेसाठी काँग्रेस, सातारा जिल्ह्यातील फलटण प्रभाग क्र. १२ अ जागेसाठी राष्ट्रवादी, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा प्रभाग क्र. ८ क जागेसाठी जन सूर्य शक्ती, जळगाव जिल्ह्यातील यावल प्रभाग क्र. 1 अ जागेसाठी काँग्रेस, बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा प्रभाग क्र. १२ ब जागेसाठी अपक्ष, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव प्रभाग क्र. १४ जागेसाठी अपक्ष असे बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये समावेश आहे. अहमदनगरच्या श्रीगोंदा नगरपरिषदेत भाजपने विजय मिळवला. परंतु नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. तर साताऱ्यातील मलकापूर नगरपरिषद निवडणूक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. आपला गड राखण्यात चव्हाण यांना यश मिळाले आहे. रायगडमधील कर्जत नगरपालिकेवर शिवसेना-भाजप युतीने भगवा फडकवला आहे. तर 17 पैकी 11 जागा जिंकत भाजपने नागपूरमधील महादुला नगरपंचायत निवडणूक जिंकली. गडचिरोलीतील आरमोरी नगरपरिषदेवर 17 पैकी 8 जागा जिंकून भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. दुसऱ्या बाजूला बीड नगरपालिकेतील पोटनिवडणूक राष्ट्रवादीने जिंकली आहे. तर सोलापुरातील दुधनी नगरपरिषदेतील पोटनिवडणूक काँग्रेसने जिंकली आहे. बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 ची पोटनिवडणूक राष्ट्रवादीच्या मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन विजयी झाल्या आहेत. तर सोलापूरच्या अक्कलकोटमधील दुधनी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या गुरुशांतप्पा श्रीमंतप्पा परमशेट्टी 432 मतांनी विजयी झाल्या आहेत.
गडचिरोलीमधील आरमोरी नगरपरिषद निकाल
एकूण जागा 17 : भाजप विजयी
भाजप : 8
काँग्रेस : 6
परिवर्तन : 1
शिवसेना : 1
भाकप : 1
नगराध्यक्ष : पवन नारनवरे (भाजप)
आरमोरी नगरपरिषदेवर भाजपचा वरचष्मा
भाजपचे ८ तर काँग्रेसचे ६ नगरसेवक विजयी
नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत भाजपचे पवन दिलीप नारनवरे यांनी ३८२० मते घेऊन परिवर्तन पॅनलचे विजय तुकाराम बगडे (३३२५ मते) यांचा ४९५ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे तेजस श्रीराम मडावी यांना २९४४ मते घेऊन तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदासोबतच नगरसेवकपदांवरही भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले. एकूण १७ पैकी ८ जागी भाजपचे तर ६ जागी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले. काँग्रेस समर्थित भाकपा, तसेच शिवसेना आणि परिवर्तन पॅनलला प्रत्येकी एकाच जागेवर विजय मिळवणे शक्य झाले.
नगरसेवकपदाचे विजयी व पराभूत उमेदवार
प्रभाग क्रमांक - १ (अ)
विजयी - गीता भुवनेश्वर सेलोकर (भाजप) - ६६१
पराभूत - रोशनी राकेश बैस (काँग्रेस) - ५२९
प्रभाग क्रमांक - १ (ब)
विजयी - भारत श्यामराव बावणथडे (भाजपा) - ७२९
पराभूत - लाकेश कृष्णराव गारोदे (काँग्रेस) - ५७१
प्रभाग क्रमांक - २ (अ)
विजयी - मिथून माणिकराव मडावी (भाजपा) - ६७१
पराभूत - रवींद्र मारोती नैताम (काँग्रेस) - ६३३
प्रभाग क्रमांक - २ (ब)
विजयी - सुनिता भोजराज चांदेवार (भाजपा) - ४८०
पराभूत ज्योती सुनील खोब्रागडे (शिवसेना) - ३६७
प्रभाग क्रमांक - ३ (अ)
विजयी - निर्मला अनिल किरमे (काँग्रेस) - ४८०
पराभूत - ज्योती दीपक निंबेकर (भाजपा) - ४२१
प्रभाग क्रमांक - ३ (ब)
विजयी - हैदर हुसेनभाई पंजवानी (भाजपा) - ४१४
पराभूत - प्रमोद यादवराव सोमनकर (काँग्रेस) - ३४०
प्रभाग क्रमांक - ४ (अ)
विजयी - सिंधू कवडूजी कापकर (भाकप) - ५४६
पराभूत - पुष्पा अशोक वाघ (भाजपा) - ५३३
प्रभाग क्रमांक - ४ (ब)
विजयी - मिलिंद मोरेश्वर खोब्रागडे (काँग्रेस) - ५४८
पराभूत - पंकज जयकृष्ण खरवडे (भाजपा) - ४१६
प्रभाग क्रमांक - ५ (अ)
विजयी - प्रशांत गंगाधर सोमकुंवर (शिवसेना) - ५९०
पराभूत - जगदिश चंद्रभान मेश्राम (भाकप) - ४१८
प्रभाग क्रमांक - ५ (ब)
विजयी - दुर्गा संजय लोणारे (काँग्रेस) - ५६४
पराभूत - भाग्यश्री राजू कंकटवार (भाजप) - ८९३
प्रभाग क्रमांक - ६ (अ)
विजयी - उषा भिमराव बारसागडे (काँग्रेस) - ७८७
पराभूत - रसिका वसंत इंदूरकर (भाजपा) - ६०६
प्रभाग क्रमांक - ६ (ब)
विजयी - विलास जगन्नाथ पारधी (भाजपा) - ५०६
पराभूत - माणिक पंढरी भोयर (परिवर्तन पॅनल) - ४४२
प्रभाग क्रमांक - ७ (अ)
विजयी - किर्ती शालिकराम पत्रे (काँग्रेस) - ४७३
पराभूत - लक्ष्मी हरीष मने (शिवसेना) - ४४६
प्रभाग क्रमांक - ७ (ब)
विजयी - प्रशांत मनोहर मोटवानी (काँग्रेस) - ५१०
पराभूत - अभिमन्यू धर्माजी राऊत (भाजपा) - ४८४
प्रभाग क्रमांक - ८ (अ)
विजयी - प्रगती प्रशांत नारनवरे (भाजपा) - ९६८
पराभूत - पुष्पा विनोद घरत (परिवर्तन पॅनल) - ७९६
प्रभाग क्रमांक - ८ (ब)
विजयी - सागर चंद्रशेखर मने (परिवर्तन पॅनल) - ७५१
पराभूत - ज्ञानेश्वर बाळकृष्ण कुकुडकर (काँग्रेस) - ५९१
प्रभाग क्रमांक - ८ (क)
विजयी - सुनिता रेवतीराम मने (भाजपा) - ८७०
पराभूत - स्वाती दिवाकर पोटफोडे (काँग्रेस) - ७१०
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगर परिषद
एकूण जागा 19 : भाजप विजयी
भाजप : 11
काँगेस-राष्ट्रवादी आघाडी : 8
नगराध्यक्ष : शुभांगी पोटे (काँगेस-राष्ट्रवादी आघाडी)
श्रीगोंदा नगरपरिषद निकाल (एकूण जागा – 19) :
प्रभागनिहाय विजयी उमेदवार :
प्रभाग क्रमांक - 1
सतीश मखरे, आघाडी
राजभाऊ लोखंडे,आघाडी
प्रभाग क्रमांक - 2
गणेश भोस ,आघाडी
सुनीता खेतमाळीस,भाजप
प्रभाग क्रमांक - 3
दीपाली औटी ,भाजप
घोडेक संग्राम ,भाजप
प्रभाग क्रमांक - 4
मनोहर पोटे : आघाडी
वनिता क्षीरसागर,भाजप
प्रभाग क्रमांक - 5
शहाजी खेतमाळीस ,भाजप
मनिषा वाळ्के : भाजप
प्रभाग क्रमांक - 6
मनिषा लांडे : भाजप
अशोक खेंड़के : भाजप
प्रभाग क्रमांक - 7
निसार बेपारी : आघाडी
सोनाली घोडके : आघाडी
प्रभाग क्रमांक - 8
ज्योती खेडकर : भाजप
रमेश लढणे : भाजप
प्रभाग क्रमांक - 9
संतोष कोथिंबीरे : आघाडी
सीमा गोरे : आघाडी
छाया गोरे : भाजप
सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषद
एकूण जागा 19 : काँग्रेस विजयी
काँग्रेस : 14
भाजप : 5
नगराध्याक्ष : नीलम येडगे (काँग्रेस)
रायगड जिल्ह्यातील कर्जत नगरपालिका
एकूण जागा 17 : शिवसेना-भाजप युती विजयी
शिवसेना-भाजप-आरपीआय युती : 10 जागा
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : 8 जागा
नगराध्यक्ष : सुवर्णा जोशी (शिवसेना)
नागपूर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत
एकुण जागा 17 : भाजप विजयी
भाजप : 11
काँग्रेस : 4
बसप : 1
अपक्ष : 1
नगराध्यक्ष : राजेश रंगारी (भाजप)
पोटनिवडणूक निकाल
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी नगरपरिषदेच्या ९ अ जागा भाजप
सोलापूर जिल्ह्यातील दुधनी नगरपरिषदेच्या २ ब जागा काँग्रेस
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.15 ही जागा अपक्ष
बीड नगरपरिषदेचा ११ अ जागा राष्ट्रवादी
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.१४ शिवसेना
पोटनिवडणुकांमध्ये बिनविरोध निवड
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर प्रभाग क्र. ६ अ जागेसाठी काँग्रेस
सातारा जिल्ह्यातील फलटण प्रभाग क्र. १२ अ जागेसाठी राष्ट्रवादी
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा प्रभाग क्र. ८ क जागेसाठी जन सूर्य शक्ती
जळगाव जिल्ह्यातील यावल प्रभाग क्र. 1 अ जागेसाठी काँग्रेस
बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा प्रभाग क्र. १२ ब जागेसाठी अपक्ष
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव प्रभाग क्र. १४ जागेसाठी अपक्ष
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
====================================================================
संबधित अधिक माहिती -
#karjat election 2019 कर्जत नगर परिषद निवडणूक निकाल-2019 नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्णा जोशी
कर्जत नगर परिषदेवर युतीचा झेंडा
==============================================
संबधित अधिक माहिती -
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक निकाल-2019 नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी पोटे विजयी
श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी पोटे
==============================================
संबधित अधिक माहिती -
#Malkapur municipal council election 2019 मलकापूर नगरपरिषद निवडणूक निकाल-2019 ; नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या निलम येडगे
मलकापूर नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसची बाजी
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook
================================================